तुमचा प्रोग्राम नक्की आहे तरी काय?

स्वत:च्या शरीरावर, स्वत:च्या आयुष्यावर आपले पूर्ण नियंत्रण असणे ही भावनाच काही विशेष असते. तीच भावना, तेच नियंत्रण आपल्याला मिळवून देण्याच्या उद्देशातून बेटरफास्ट लाईफस्टाईलचा जन्म झाला.

बेटरफास्ट लाईफस्टाइल प्रोग्राम‘ हा इंटरमिटंट फास्टिंग’ म्हणजे ‘खंडीत उपास’ म्हणजे दिवसातला विशिष्ट काळ उपास पाळण्यावर आधारित आहे. ह्यात आपल्या शरिराला आवश्यक असणार्‍या सर्व पोषणतत्वांचा समावेश आपल्या रोजच्या खाण्यात असतो. मात्र खाण्यापिण्याचा कालावधी नियंत्रित केला जातो. काही तास उपास तर काही तास खाण्याचे असे हे विभाजन असते. खरे तर हा उपास नसून पचनसंस्थेला दिलेला आराम असतो, ह्या आरामाच्या काळात शरिराला पोटाकडून उर्जा न मिळाल्याने ते शरिरातली इतर ठिकाणची साठवलेली चरबी वापरु लागते. त्यामुळे अतिरिक्त चरबीचा वापर होऊन वजन कमी होऊ लागते. त्यासोबतच शरिरात इतर अनेक चांगले बदल घडू लागतात. ज्यात शरिरातली हानिकारक द्रव्ये, कचरा, घाण, बॅक्टेरिया, व्हायरस, इत्यादी सर्व अनावश्यक घटक उर्जा म्हणून शरिरातल्या पेशी ग्रहण करुन टाकतात. त्यामुळे त्वचा तरुण दिसायला लागते, मूड सुधारतो, हॉर्मोन्समध्ये सुधारणा, इतर काही आजार असतील त्यात सुधारणा होते. उपासाच्या काळात शरिरात अनेक आश्चर्यकारक कामे सुरु होतात जी सर्वसाधारणपणे काही न काही खात राहणार्‍या व्यक्तिंच्या शरिरात घडत नाहीत. कारण निसर्गाने मानवाचे शरिर काही काळ उपास घडेल अशा पद्धतीनेच बनवले आहे. त्यामुळे त्या काळातही आवश्यक ती डागडुजीची कामे शरिरात घडत असतात. ह्या सर्व प्रक्रियेला ‘ऑटोफॅजी’ असे शास्त्रीय भाषेत नाव आहे. त्यासंदर्भात झालेल्या संशोधनाला नुकतेच ‘नोबेल पारितोषिक’ मिळाले आहे. म्हणजे विज्ञानाने आता खंडीत उपासाच्या पद्धतीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यासंदर्भात वेगवेगळ्या आजारांवर (जसे की मधुमेह, उच्चरक्तदाब, पिसिओडी, कॅन्सर इत्यादी) ह्या पद्धतीच्या परिणामांचे जगभर अभ्यास सुरु आहेत.

बेटरफास्ट लाईफस्टाइल प्रोग्राम‘मध्ये खाण्याच्या काळात कितीवेळा, काय व कसे खावे ह्याच्याबद्दल मार्गदर्शन दिले जाते. ह्यामध्ये नेहमी डायटीशियन्स देतात तसा फूडचार्ट नसतो. रुग्णांसाठी दिला जाणारा पारंपरिक पद्धतीचा फुडचार्ट  व वेटलॉससाठीच्या ‘बेटरफास्ट लाईफस्टाइल प्रोग्राम’मध्ये मूलभूत फरक आहे हे लक्षात घ्यावे. कारण आपण कोणत्याही रोगावर उपचार करत नाही आहोत. तर अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी, फॅट लॉस करण्यासाठी आपल्या आहाराचे नियोजन करत आहोत. त्यामुळे ह्यात फुडचार्ट पेक्षा दिलेल्या गाईडलाइन्सचे-कालावधीचे पालन करणे व वेळोवेळी फॉलो-अप डिस्कशनद्वारे आपल्या अडचणी-शंकांचे समाधान करत प्रोग्राम व्यवस्थित फॉलो करतो आहोत की नाही ह्याची खबरदारी घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे महिन्याचा किंवा पंधरा दिवसाचा किंवा आठवड्याचा कागदावर आखलेला फूडचार्ट मिळाला म्हणजे ‘डायटप्लान’ मिळाला ही संकल्पना आपल्या मनातून काढून टाकावी. फूडचार्टपेक्षा आपण गाईडलाइन्सचे पालन करणे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. वजनात किंवा चरबीत फरक पडण्याचे कारण फूडचार्ट नसून उपासाचा कालावधी व गाईडलाइन्स काटेकोर पाळणे, खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये योग्य ती निवड करणे, आपली लाईफस्टाईल सुधारणे हे असते.

हा प्रोग्राम म्हणजे वजन झटपट उतरवण्यासाठीचा जादुई मंत्र नाही. केवळ स्वयंशिस्त व जाणीवपूर्वक बदल यातून वजनावर कायमस्वरुपी नियंत्रण मिळवण्याची ही सहजसोपी पद्धत आहे.

हा प्रोग्राम तीन महिन्याच्या कालावधीचा आहे. ह्यात चार ते सहा टप्पे आहेत. हे टप्पे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.

पहीला टप्पा : ह्यात आपल्याला १२-१२ तासाचे शेड्युल दिले जाते. त्यासोबतच काही गाईडलाइन्स दिल्या जातात. पहिल्या पंधरा दिवसात सर्व गाईडलाइन्स पाळून आपल्याला १२-१२ तासाचे शेड्युल आपल्या दैनंदिन जीवनात तयार करावे लागते. हा काळ आपल्या करंट लाइफस्टाईलकडून फास्टींग लाइफस्टाईलकडे जाण्याचा ब्रिज म्हणजे पूल आहे. हा ब्रिज नसल्यास थेट पुढच्या टप्प्यात जाणे कठीण जाते. ह्या काळात आपल्याला हळूहळू सर्व गाईडलाइन्स अंमलात आणायची सवय करणे अपेक्षित आहे. आपले सर्व मिल्स १२ तासाच्या आत बसवणे व १२ तास पूर्ण उपास करणे अपेक्षित आहे. हा टप्पा खूपच सोपा आहे. पण आपली ठरलेली जीवनशैली अजिबात न बदलता सर्व चांगले फायदे हवे असणार्‍या लोकांना हा टप्पा पूर्ण करणे कठिण जाते असा आमचा अनुभव आहे. परंतु हा टप्पा पूर्ण केल्याशिवाय पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन केले जात नाही.

दुसरा टप्पा: यात आपल्याला १०-१४ तासाचे शेड्युल दिले जाते. पण त्याआधी १२-१२ तासाचे शेड्युल व सर्व गाईडलाइन्स योग्य पद्धतीने पाळल्यावरच आपल्याला पुढील टप्प्याची परवानगी मिळते. कारण योग्य तर्‍हेने फॉलो न करता पुढच्या टप्प्यात जाणे हे पहीला वर्ग पास न करता थेट दहाव्या वर्गात बसण्यासारखे असते. ह्या टप्प्यात आपल्या काही जुन्या सवयी सोडण्याची तयारी करायची असते. नवीन सवयी लावून घ्यायच्या असतात. ह्या सवयी सोडण्यासाठी, नवीन लावून घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी दिला जातो. कारण अचानक एका दिवसात कोणत्याही सवयी मोडत नसतात. अगदी हट्टाने दोन दिवस पाळले तरी चौथ्या दिवशी परत ‘जैसे थे’ होते. त्यानंतर काही बदल करण्याचा मूड संपून जातो. म्हणून हळुहळु कायमस्वरुपी बदल हाच आपल्या प्रोग्रामचा हेतू आहे.

तिसरा टप्पा : ह्यात आपल्याला ८-१६ असे शेड्युल दिले जाते. ह्यात आहाराच्या पद्धतीत दोन किंवा तीन वेळा जेवणे अपेक्षित असते. त्याबद्दल फोनकॉल फॉलो-अपवर मार्गदर्शन केले जाते. हा काळ खरा इंटरमिटंट फास्टींग अंगी बाणवण्याचा आहे. ह्यात शरिराला खंडीत उपासाची सवय झालेली असते. त्यामुळे १६ तासाचा दिर्घ उपास शरिराला काहीही त्रासदायक वाटत नाही. ह्या टप्प्यापर्यंत येईस्तोवर आपल्याला हलकेफुलके आनंदी वाटू लागलेले असते. किमान २ ते ४ किलो वजन कमी झालेले असते. आपला मूड उत्साही असतो. आपल्याला नेहमीपेक्षा खूप कमी खायला लागते हे लक्षात येते. तसेच गोड खाण्याच्या क्रेव्हिंग्स केव्हाच्याच संपल्या हेही ध्यानात येते. अधून मधून अचानक लागणारी भूक कशी असते हेसुद्धा आपण विसरुन गेलेले असता. अशा काळात ८ तासांमध्ये आपले सगळे मिल्स बसवणे फायद्याचे ठरते. शरिराला पूर्ण १६ तास त्याचे विहित डागडुजीचे काम करायला आपण प्रदान करतो.

चौथा टप्पा : ह्यात आपल्याला ८-१६ हेच शेड्युल फॉलो करायचे आहे. आपले जेवण सुधारले आहे, प्रमाण कमी झाले आहे, उत्साह आणि उर्जा वाढली आहे. वजन-चरबी कमी झाली आहे. अशा अवस्थेत आता आपल्याला खाण्यापिण्याचे नीट नियोजन करायचे आहे. सर्व पोषकतत्त्वे असलेले जेवण कोणते व किती खावे हे आपल्याला समजू लागले आहे. त्यानुसार आता कमी वेळा खाऊनही शरीराची गरज कशी भागवल्या जाऊ शकते हे आपल्याला ह्या टप्प्यात शिकायचे आहे.

पाचवा टप्पा : ह्यात आपल्याला फॉलो-अप कॉलनुसार कदाचित ८-१६ किंवा ६-१८ किंवा ४-२० अशा स्वरुपाचा टाइमटेबल फॉलो करायला सांगितला जाऊ शकतो. परंतु हे सर्व कशावर अवलंबून असेल? तर आपण आतापर्यंतचे सर्व टप्पे कशापद्धतीने पूर्ण केले आहेत त्यावर.

सहावा टप्पा: ह्या टप्प्यात आपल्याला आठवड्यातून एक दिवस पूर्ण उपास म्हणजे वाटर फास्टींग सांगितले जाईल. आपली क्षमता वाढलेली असल्यास आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसही वाटरफास्टींग सांगितल्या जाऊ शकते. हे सर्व आपल्या प्रकृती, कामाची पद्धत, आपल्या शरिराची क्षमता आणि आपण आतापर्यंत कसे फॉलो केले आहे ह्यावर अवलंबून आहे. ह्या शेवटच्या टप्प्यात यशस्वीपणे येणार्‍यांना नविन उर्जा, नविन शरीर आणि नविन आयुष्य प्राप्त झाल्याचा अनुभव येतो. चरबी कमी झालेली असते. शक्ती वाढलेली असते. अपचन, गॅसेस ह्याचा त्रास बंद झालेला असतो. झोपेची क्वालिटी सुधारलेली असते. मन प्रसन्न आणि सकारात्मक राहू लागते. आळशीपणा, सुस्तपणा गायब झालेला असतो. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्याने छान वाटू लागते. आपल्या आजारांमध्ये सुधारणा दिसू लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्र-नातेवाईक  स्वतःहून विचारू लागतात की ” तुमच्यात बदल दिसतो आहे, तुम्ही नक्की काय करताय? आम्हाला पण सांगा.”

सर्व टप्पे संपल्यावर आपले जीवनशैली बदलाचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असते. सैन्यभरतीच्या वेळी तरुण कोवळे व नाजूक असतात पण ट्रेनिंग झाल्यावर जसे काटक, मजबूत, लढाऊ सैनिक होतात तसेच आपल्या प्रोग्राममध्ये होते. ह्यानंतर आपली जीवनशैली कशी असावी, आपण काय खाल्ले पाहिजे, कसे व किती खाल्ले पाहिजे ह्याचे पूर्ण ज्ञान आपल्याला झालेले असते. हेच ज्ञान वापरुन आपण आता पुढचे सर्व आयुष्य स्वतःच्या निर्णयानुसार जगायला सज्ज होतो. उपास किती करावा, कधी काय खावे हे स्वतःचे स्वतः ठरवण्याचे पूर्ण नियंत्रण व समज आपल्याला आलेली असते. त्यानंतर आपल्याला आमच्या मदतीची शक्यतो गरज राहत नाही. परंतु जर आपला चरबी घटवण्याचा, वेटलॉसचा गोल तीन महिन्यांपेक्षा जास्त असेल तर आपण पुढेही आमचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आमच्या ग्राहकांना स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनवणे एवढाच बेटरफास्ट लाइफस्टाईल प्रोग्रामचा उद्देश आहे. जेणेकरुन त्यांनी स्वतःच्या शरिराची काळजी घ्यावी. इतर कोणत्याही महागड्या व सततच्या कन्सल्टेशनवर अवलंबून राहू नये. कोणतीही महागडी सप्लिमेंट्स, गोळ्या, औषधी घ्यायची गरज राहू नये. सोशल मीडियातून फिरणाऱ्या मेसेजेसवर अवलंबून राहू नये. आपल्या घरगुती अन्नपदार्थांमधून सर्व आवश्यक पोषकतत्त्वे मिळवावी. जंकफूड, अतिगोड, बेकरी पदार्थांपासून आपोआप सुटका व्हावी. कोणत्याही परिस्थितीत आपण काहीतरी त्याग करतो आहोत असा भाव मनात येऊन डायटचा ताण येऊ नये. अशा सर्व उद्देशांसह हा प्रोग्राम यशस्वी व्हावा अशी आमची अपेक्षा असते. ही अपेक्षा फक्त तुमच्या स्वत:च्याच प्रयत्नांमुळे पूर्णत्वास येऊ शकते. हा प्रोग्राम यशस्वी करणे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. आपल्याला दिलेल्या सर्व गाईडलाइन्स न चुकता फॉलो करायच्या आहेत.

‘तीन महिन्यांनंतर मला कसे वाटेल’ ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच ते कळू शकते. त्यासाठी आपल्याला आपले तीन महिने पूर्ण विश्वासाने आमच्याकडे सोपवायचे आहेत. आयुष्यात फक्त एकदाच तीन महिन्यांसाठी आम्ही सांगतो ते पूर्णपणे विश्वासाने ऐकायचे आणि जसेच्या तसे फॉलो करायचे आहे. जर तुम्हाला काहीही पटले नाही, आवडले नाही, करायला जमले नाही तर परत आपल्या जुन्या लाइफस्टाईलकडे जाण्याचा मार्ग खुला आहेच. परंतु आयुष्यात हा एक वेगळा अनुभव घेतल्याने आयुष्याला जी १८० डिग्रीत कलाटणी मिळेल त्याचा विचार नक्की करायला हवा. ह्या तीन महिन्यांत आपल्याला पूर्ण प्रशिक्षित करण्याची पूर्ण काळजी आम्ही घेणार आहोतच. आपल्यासाठी डेली व्हॉट्सप चॅट सपोर्ट आहे, दर पंधरा दिवसांनी होणारे फोनकॉल डिस्कशन्स आहेत. कोणत्याही बाबतीत कसली शंका आल्यास समाधान करण्यास आमचे लाइफस्टाईल कोच आहेत. त्यामुळे निश्चिंत राहावे व आयुष्य सुंदर निरोगी करावे.

आपल्या वैयक्तिक आहार-आखणीसाठी बेटरफास्ट लाइफस्टाईल कन्ल्टन्सी आपली मदत करायला सदैव तत्पर आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपला आरोग्यपूर्ण वेट लॉस चा प्रवास सुरु करावा.


Share your love