मागच्या वर्षी एक विचित्र केस बेटरफास्टकडे आली होती. संबंधित व्यक्तीने कोणाकडून तरी आयुर्वेदीक औषधे घेतली होती. महिन्याला साडेसहा हजार रुपये त्या औषधींची किंमत होती. ती औषधे घेतल्याने वजन कमी झाले पण जर एक दिवस जरी ते औषध घेतले नाही तर अंगावर भयंकर सूज येत असे आणि पुरळ उठत असत. म्हणजे उतरलेले वजन कायम ठेवण्यासाठी ती औषधे घेत राहणे गरजेचे होते. ती व्यक्ती ह्या टॉर्चरला कंटाळली होती. खरे तर हा एक मेडिकल इशू झाला होता. पण त्या व्यक्तीला हे लक्षात येत नव्हते. बेटरफास्टकडून मार्गदर्शन घेण्यासाठी ती व्यक्ती तयार होती परंतु ती आयुर्वेदिक औषधे नेमकी कोणती आहेत आणि कोण देत आहे ह्याबद्दल मात्र ती सांगायला तयार नव्हती. बेटरफास्टचा प्रोग्राम सुरु केल्यावर पंधरा दिवसात तिच्या अंगावरची सूज कमी होऊन महिनाभरात नाहीशी झाली. ती औषधे बंद करण्यात यश मिळाले. तेव्हा लक्षात आले की औषधे बंद केल्यावर दोन तीन दिवसच ती सूज येत होती. म्हणजे शरीर काहीतरी रिअॅक्शन देत होते. पण एक मोठा काळ औषध घेतले नाही तर मात्र काही परिणाम दिसून येत नव्हता. हा एक प्रकारचा ट्रॅप आहे.
दुसरा प्रकार, कोण्या आयुर्वेदीक डॉक्टरने डायटप्लान दिला, त्यात काय खायचे नाही ह्याची यादी इतकी मोठी होती की फक्त मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकरी इतकेच ऑप्शन ग्राहकाकडे राहीले. त्याने सहा महिन्यात चांगले २० किलो वजन कमी झालेही. पण आहारात कोणतीही प्रोटीन्स नसल्यामुळे नेमकी शरीरातली चरबी कमी झाली की प्रोटीनची गरज शरीराने स्नायूंना खाऊन भागवली हे कळण्याला मार्ग नाही. कारण पुढे ते वजन इतके कमी झाले की डायट बंद करुन परत जास्त खाण्यापिण्याची वेळ आली. या पराक्रमाचा पुढील काळात शरीरावर होणारा परिणाम आणि काँप्लिकेशन्स वजन उतरण्याच्या आनंदात लक्षात येत नाही. वजन कमी झाले म्हणजे नक्की चरबी कमी झाली की स्नायू कमी झाले ह्याकडे लक्ष द्यायचे असते हा बेसिक नियम आहे. पण सहसा असे होत नाही.
तिसरे उदाहरण, एका १०० किलो वजनाच्या स्त्रीला फक्त दिवसातून एकदा काकडी-सफरचंद खायचे आणि दर दोन दिवसांनी जेवायचे असे डायटप्लान कोणीतरी दिला. परिणाम काय झाला? तर हाडे दुखायला लागली, केस गळायला लागले, अशक्तपणा आला. वजन कमी झाले हे खरे पण असा अघोरी डायट बंद केल्यानंतर परत वजन जसेच्या तसे झाले.
वजन घटवण्याकडे प्रत्येक व्यक्ती आपल्या दृष्टीकोनातून पाहतो. त्याला मिळणार्या उपाययोजना वेगवेगळ्या सोर्सेसमधून येतात. हतबलतेतून अधिक माहिती न घेता किंवा आंधळा विश्वास ठेवून सर्रास औषधे घेतली जातात. आयुर्वेदिक औषधाने काही साईड इफेक्ट्स होत नाहीत हा गैरसमजदेखील बर्यापैकी असल्याने शंका नसते. काही विपरित परिणाम झाले तर ते औषधांमुळे न होता तुमच्याच कोणत्यातरी चुकीमुळे झाले आहे असे बिंधास्त ग्राहकांच्या अंगावर ढकलले जाते. अंतिमतः ‘वजन जाऊ दे पण दुष्परिणाम आवर’ अशी परिस्थिती ग्राहकांची होते व त्यातून आणखी नव्या औषधांचा, पंचकर्म वगैरे गोष्टींचा मार्ग दाखवला जातो. जोवर ग्राहक कंटाळून हे सर्व सोडून देत नाही तोवर हे दुष्टचक्र सुरु राहते.
वाढलेले वजन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून चरबी असते. शरीरात अतिरिक्त वाढलेली चरबी कमी करण्याचे’एकमेव’ वैज्ञानिक सूत्र आहे. ते म्हणजे जेवढी उर्जा तुमचे शरीर वापरते त्यापेक्षा कमी उर्जा ग्रहण करणे. आपल्या शरीराला वापरण्यासाठी साठा केलेली उर्जा म्हणजेच चरबी असते. तुम्ही गरजेपेक्षा कमी उर्जा शरीरात घेतली की शरीर उरलेल्या गरजेसाठी ही चरबी वापरते. सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या व्यक्तीची दिवसाला २००० कॅलरीची गरज असेल तर १५०० कॅलरीजचे जेवण घ्यावे. ५०० कॅलरीजची गरज शरीर चरबीतून पूर्ण करते. आणि चरबी कमी होऊ लागली की वजन कमी होऊ लागते. हा साधा फंडा आहे. जगभरातल्या सर्व डायटप्लान्समध्ये यापेक्षा वेगळे काहीही नसते. तमाम औषधे, पावडरी, सप्लीमेंट, नुस्खे आणि बॅरीयाट्रीक शस्त्रक्रियासुद्धा फक्त एवढ्या एका सूत्रावर काम करतात. ते तुम्हाला अन्नग्रहण कमी करायला भाग पाडतात. आता प्रत्येकाची अन्नग्रहणाची एक विशिष्ट सवय असते व ती सहजासहजी कमी करण्याची मानसिकता कोणाचीही होत नाही. ते कष्टाचे आणि कठोर संयमाचे काम आहे. मग सोपा मार्ग म्हणजे मेंदूला भूकेची जाणीवच होऊ न देणे. मेंदूला फसवण्याची क्लृप्ती सहजसोपी असते. आपल्याला भूक लागलीच नाही, किंवा पोट भरल्याची जाणीव झाली की आपोआप जेवण कमी होते. किंवा असे पदार्थ खायला सांगितले जातात की कितीही भूक लागली असेल तरी तुम्ही ते जास्त खाऊच शकत नाही. म्हणजे कितीही द्राविडी प्राणायम केले तरी कॅलरीचे सूत्रच शेवटी काम करत असते. पण मेंदूला फसवण्यासाठी जी औषधे वापरली जातात ती मेंदूतल्या विशिष्ट केंद्रांना भूल देतात. त्यातली रसायने शरीराचे हार्मोनल बॅलन्स बिघडवू लागतात. हे सर्व हळूहळू होत असते त्यामुळे लगेच पकडता येत नाही. त्याचे दूरगामी परिणाम फार उशीरा दिसून येतात. अनेकांना आयुष्यभराची दुखणीसुद्धा मागे लागू शकतात.
बेटरफास्ट प्रोग्राम आपली वैयक्तिक माहिती घेऊन तयार केला जातो. ह्यात हळूहळू जीवनशैली व खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे ह्यावर भर असतो. त्यातून आपसूक आरोग्यात सुधारणा होते व चरबी कमी होऊ लागते. ह्यात कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात कारण ह्यात कोणत्याही प्रकारची औषधी किंवा शरीरावर अत्याचार करणारे अघोरी प्रयोग नाहीत.
तुमचा प्लान निवडा
प्रत्येक प्रोग्राम वैयक्तिक माहितीनुसार तयार केला जातो. आपणास हव्या असलेल्या सुविधांप्रमाणे प्लान निवडा.
Premium
रु. 999
1 month
Personalized Food Chart
4 Follow ups on Phone
Dedicated Personal Coach
coaching & support
Exercise Guidance
Essential
रु. 2499
3 months
Personalized Food Chart
8 Follow ups on Phone
Dedicated Personal Coach
coaching & support
Exercise Guidance
Transform
रु. 4199
6 months
Personalized Food Chart
12 Follow ups on Phone
Dedicated Personal Coach
coaching & support
Exercise Guidance
Please Note: All plans include Food Plan, Exercise Guidance, Special Recipes, Counselling & Troubleshooting, Motivation, Daily Chat Support, Dedicated LifeCoach, free access to useful tips and information in format of Podcast, Videos and Articles.