मानवी शरीरात सुमारे साठ टक्केपेक्षा जास्त पाणी आहे. आपल्या शरीरातल्या अनेक प्रक्रियांमध्ये पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीराचे सर्व व्यवहार सुरळीत चालू राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचे शरीराला व आरोग्याला फायदे काय आहेत ते बघूया.
१. पाण्यामुळे शरीराची काम करण्याची क्षमता वाढते. (Physical Performance)
तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा प्रभाव तुमच्या रोजच्या काम करण्यावर होतो. कष्टाची कामे असोत की बौद्धिक कामे असोत, आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असतेच.
पुरेसे पाणी प्यायले नसल्यास व शरीराला पाणी कमी पडत असल्यास डिहायड्रेशन ही समस्या उद्भवते. ह्यात शरीराचे तापमान नियंत्रण न होणे, कामावर लक्ष केंद्रीत न होणे, निरुत्साह वाटणे, थकल्यासारखे वाटणे अशा घटना घडतात.
व्यायाम व शारीरिक हालचाल करणार्यांनी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
२. पाण्यामुळे बौद्धिक क्षमता प्रभावित होते. (Brain Function and Memory)
आपल्या मेंदूचे कार्य पाण्याच्या शरीरातल्या उपलब्धतेवर खूपच अवलंबून असते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. डिहायड्रेशनमुळे मूड खराब होणे, गोष्टी विसरायला लागणे, स्मरणशक्ती कमी होणे, कामात/अभ्यासात लक्ष न लागणे हे होते.
३. पाण्यामुळे डोकेदुखीपासून (Migraine) आराम मिळू शकतो.
डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास मेंदूचे कार्य प्रभावित होते हे आपण पाहिले. अशाच प्रकारे शरीरात पुरेसे पाणी असल्यास त्यामुळे डोकेदुखी, मायग्रेन ह्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.
रोज किमान दिड ते दोन लिटर पाणी प्यायल्याने मायग्रेनसारख्या डोकेदुखीच्या समस्येत मदत झाल्याचे अनेक संशोधनातून आढळून आले आहे.
आपले डोके दुखत आहे असे वाटल्यास अगदी प्राथमिक उपाय म्हणून दोन ग्लास साधे पाणी पिऊन पाहावे. कदाचित पाण्याची कमतरता असल्यानेच आपले डोके दुखत असते.
४. पाण्यामुळे मुतखडा (Kidney stone) पासून बचाव होऊ शकतो.
पुरेसे पाणी पिणे हे आपल्या किडनीसाठी चांगले असते. भरपूर पाणी प्यायल्याने किडनीचे कार्य चांगल्या प्रकारे होऊन त्यात खनीजखडे (मुतखडे) निर्माण होण्याच्या प्रक्रियेला आळा बसू शकतो. अगदी छोट्या प्रमाणात निर्माण झालेले खडे किडनीतून बाहेर काढण्यासाठी पाणी मदत करु शकते..
५. वजन कमी करण्यात पाणी मदत करते (Weight Loss)
पाण्यामुळे आपल्या चयापचयाला मोठी मदत मिळते. खाल्लेलं अन्न पुरेसे पचले जाणे, शरीरात साठलेल्या चरबीचा योग्य आणि जास्त वापर होणे ह्यासाठी पाण्याची गरज असते. ह्यासाठी पुरेसे पाणी प्यायल्याने वाढलेल्या वजनावर चांगला उपाय होऊ शकतो.
एका संशोधनानुसार असे दिसून आले की ज्यांनी जेवणापूर्वी अर्धा लिटर पाणी प्यायले त्यांच्या वजनात १२ आठवड्यांत इतरांपेक्षा ४४ टक्के जास्त घट दिसून आली. .
वजन कमी करण्यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच जेवणापूर्वी अर्धा लिटर पाणी प्यायल्यास मदत होऊ शकते.
परंतु प्रत्येक व्यक्तीचे वय वजन व प्रकृती वेगवेगळी असल्याने तुम्हाला योग्य असेल असे मार्गदर्शन मिळणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी बेटरफास्ट लाइफस्टाइल प्रोग्राम आपल्याला खूप उपयोगी होऊ शकतो. आमचे पर्सनल लाइफस्टाइल कोच तुम्हाला जीवनशैलीत कसे बदल करायचे ते तुमच्या वैयक्तीक माहितीनुसार अभ्यास करुन सांगतील.
बेटरफास्ट लाइफस्टाइल प्रोग्राम तुम्हाला योग्य आहार, चांगली निद्रा व आवश्यक तेवढा हलका-फुलका व्यायाम ह्यासह वैयक्तिक मार्गदर्शन देऊन वजन कमी करण्यात मदत करतो.
आजच आपला प्रोग्राम सुरु करा. अधिक माहितीसाठी व्हॉटसप करा.