डायबेटीस (मधुमेह)

भारतीय लोकसंख्येतले सुमारे 8 कोटी नागरिक डायबेटीक आहेत. डायबेटीसमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दरवर्षी (15 लाख 2019 मध्ये) वाढते आहे.

भारतीय लोकसंख्येतले सुमारे 8 कोटी नागरिक डायबेटीक, म्हणजे मधुमेही आहेत. शहरी भागात ह्याचे लोकसंख्यानिहाय प्रमाण सुमारे 10 ते 14 टक्के पर्यंत आहे. आपल्या आसपास, कुटूंबात कोण न कोण डायबेटीक व्यक्ती असतेच असते.

इतक्या प्रचंड प्रमाणात डायबेटीस वाढत असून व त्याने होणारे मृत्यू दरवर्षी (15 लाख 2019 मध्ये) वाढत असूनही बहुसंख्य जनतेला डायबेटीसबद्दल प्राथमिक माहितीसुद्धा नसते असे अनेकदा लक्षात आले आहे. त्यासोबतच डायबेटीसवर मनमर्जी वाट्टेल ते उपाय सांगणे व करणे हा प्रकारही बराच बोकाळला आहे.

सोशल मीडियावर घरगुती उपाय सांगणाऱ्या ग्रुप्सवर अनेक उलट सुलट चर्चासत्र झडत असतात. ज्यामध्ये अर्धवट माहितीवर, अज्ञानाने अनेक चुकीच्या गोष्टी मांडल्या जातात. अशाच ग्रुपवर कोण्या सज्जन माणसाने त्याच्या 8 वर्षीय मुलीला डायबेटीस असल्याचे व डॉक्टरांनी इन्सुलिन सुरु केल्याचे सांगितले. “साखर वाढलेली आहे म्हणजे ती काहीही करून कमी केली पाहिजे” या सामान्य गृहीतकाप्रमाणे त्यांना त्यावर घरगुती उपाय हवे होते. कमेंटमध्ये अनेकांनी ‘आठ वर्षांच्या मुलांना कुठे इन्सुलिन असते का? डॉक्टर तुम्हाला फसवत आहेत, पैसे उकळत आहेत’ अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. अर्थातच अशा कमेंट्स करणाऱ्या लोकांप्रमाणेच आजही अनेकांना हेच माहित नसते की डायबेटीसचे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्यांना स्वतःला डायबेटीस झालेला आहे अशा व्यक्तींनाही बरेचदा आपल्याला कोणता डायबेटीस आहे हे सांगता येत नाही. 

डायबेटीस तीन प्रकारचे असतात. डायबेटीस टाइप 1, डायबेटीस टाइप 2 आणि स्त्रियांना गरोदरपणात होणारा जेस्टेशनल डायबेटीस.

टाईप 1 डायबेटीस

टाईप 1 डायबेटिस हा जन्मतःच शरीराची इन्सुलिन तयार करण्याची क्षमता नसल्याने किंवा कमी असल्याने उद्भवतो. शरीराची उपजत क्षमता नसल्याने हा टाईप 1 डायबेटीस लवकर म्हणजेच साधारणपणे वय वर्ष 3-4 पासून ते 13-14 च्या दरम्यान डिटेक्ट होतो. काही अपवादात्मक केसेस मध्ये उशिरा सुद्धा डिटेक्ट होतो. लहान मुलांमध्ये आढळून येणारा डायबेटीस हा मुख्यत्वेकरुन हाच टाईप 1 डायबेटीस असतो. आजकाल खाणपिण्याच्या चुकीच्या सवयी व व्यायामाच्या अभावामुळे लहानमुलांमध्ये टाईप 2 डायबेटीसचे प्रमाणही वाढते आहे. त्यामुळेच कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीमध्ये डायबेटीस डिटेक्ट झाल्यावर तो टाईप 1 आहे कि टाईप 2 आहे हे डॉक्टरांकडून नक्की माहित करून घ्यावे. टाईप 1 डायबेटिसमध्ये इन्जेक्शनद्वारे आवश्यकतेनुसार इन्सुलिन शरीरात सोडावेच लागते त्यामुळे इन्सुलिनच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा, पथ्य, व्यायाम हे सगळे खूप काटेकोरपणे पाळावे लागते. 

टाईप 2 डायबेटीस

टाईप 2 डायबेटीस हा शरीरातील पेशींच्या, इन्सुलिनला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेत बिघाड निर्माण झाल्याने होतो. ज्यामुळे रक्तातली साखर पेशींना वापरता येत नाही. म्हणजे या प्रकारात शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करु शकते पण पेशींसोबतचा त्याचा ताळमेळ बिघडलेला असतो. अतिरिक्त वाढलेले वजन, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, शरीराला पुरेशी चांगली झोप न मिळणे, ताणतणाव, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे टाईप 2 डायबेटीस होऊ शकतो. टाईप 2 डायबेटीसच्या उपचारांमध्ये शक्यतो गोळ्या दिल्या जातात. पण काही केसेस मध्ये विशिष्ट परिथितीत इन्सुलिन इंजेक्शन देण्याची सुद्धा गरज निर्माण होऊ शकते, जी तात्पुरती सुद्धा असू शकते. इथे एक लक्षात घेतले पाहिजे कि जसे टाईप 1 डायबेटीस डिटेक्ट झाल्याबरोबर कायमस्वरूपी इन्सुलिन घेणे बंधनकारक होते तसे टाईप 2 मध्ये बंधनकारक असेलच असे नाही.  


गेल्या शंभर वर्षांत डायबेटीसबद्दल आधुनिक विज्ञानाने भरपूर संशोधन केले आहे. त्यामुळे त्याबद्दलची शास्त्रीय माहिती भरपूर प्रमाणात उपलब्ध झाली आहे. ती तशी किचकट सुद्धा आहे. पण सामान्य लोक स्वतःला मिळालेली माहिती आणखी सोपी करून घेण्याच्या प्रयत्नात चुकीचा अर्थ लावतात आणि त्यामुळे अनेक गैरसमज समाजात पसरतात. अनेकांना वाटते की फक्त रक्तातल्या साखरेचे प्रमाण ग्लुकोमिटरवर कमी आले पाहिजे. रक्तातली साखर वाढण्याचे मूळ कारण शोधून ते दूर करण्यापेक्षा रक्तातली साखर झटपट कमी करणार्‍या निरनिराळ्या औषधांच्या, उपायांच्या मागे लागून आपला आजार अधिक घातक करुन घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.

रक्तातली साखर (Glucose ग्लुकोज) कमी करण्याचे काम आपल्या शरीरातल्या पेशी (Cell सेल) करतात. त्यासाठी इन्सुलिन साखरेला पेशींचे दरवाजे (Glucose Channel ग्लुकोज चॅनल) उघडून देण्याचे काम करते. रक्तातली साखर मोजणे हे इन्सुलिन व पेशी यासह सर्वच शरीर कसे काम करत आहे ह्याचे इंडिकेटर असते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे अतिशय आवश्यक असले तरी निव्वळ रक्तातली साखर कमी झालेली दिसली म्हणजे आजार बरा होईल असे नसते. 

पेशींना व एकूणच शरीराच्या सिस्टीमला रक्तातली साखर पचवण्यासाठी सक्षम करणे हा मधुमेहनियंत्रणातला मोठा उद्देश असतो. त्यात औषधांसोबतच शारीरिक व्यायाम, संतुलित आहार, मानसिक आरोग्य अशा विविध पातळ्यांवर पेशंटला योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते.

“बेटरफास्ट लाईफस्टाइल : डायबेटीस स्पेशल प्रोग्राम” मध्ये डायबेटीस रुग्णांसाठी आधुनिक वैद्यकिय विज्ञानावर आधारित संतुलित आहार-विहाराचे मार्गदर्शन केले जाते. ह्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना आपल्या एकूण आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येते.

प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

Fill up the form on given link:
https://zfrmz.com/fjbxVeda9QVqWphOJRCX

Share your love