स्टर फ्राय व्हेजिज

साहित्य: अर्धा कप बारिक चिरलेले गाजर , पाऊण कप उभा चिरलेला कांदा, अर्धा कप उभी बारिक चिरलेली सिमला मिरची, अर्धा कप बारिक चिरलेला फ्लॉवर, 1 कप कापलेले मश्रुम (ऐच्छिक), पाव कप बारिक चिरलेले आवळ्याचे तुकडे (ऐच्छिक), पाव कप उभा चिरलेले कोबी, अर्धा कप बारिक गोलाकार चिरलेली फरसबी, 4-5 मोठ्या लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या, सैंधव, 2 टेबलस्पून काळी मिरी पूड, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, 2 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून बटर


कृती: प्रथम लसूण पाकळ्या, आलं आणि हिरव्या मिरच्या या तीन गोष्टी एकत्र जाडसर कुटून घ्याव्यात.
एका जाड बुडाच्या भांड्यात/कढईत 1 टेबलस्पून तेल व त्यात बटर घालावे.

तापलेल्या तेलात लसूण-आलं-हिरवी मिरची हे वाटण घालून मध्यम आचेवर परतून घ्यावे. आलं-लसणाचा उग्र वास कमी झाल्यावर त्यात गाजर घालून 2-3 मिनिटे परतून घ्यावे. आता तीव्र आचेवर त्यात कांदा घालून तो थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. 

कांदा परतून झाल्यावर त्यात उरलेल्या भाज्या म्हणजे कोबी सोडून फरसबी, फ्लॉवर, मश्रुम, आवळा आणि सिमला मिरचीचे तुकडे घालावेत. सैंधव व काळी मिरी पूड घालून भाज्या 2-3 मिनिटे परतून घ्याव्यात. 
गॅस बंद करून वरून कोबी व कसुरी मेथी घालावी. 

वर दिलेले प्रमाण साधारण 3 ते 4 व्यक्तींसाठी पुरेसे होते. वन डिश मिल म्हणून हा पदार्थ खाऊ शकता. तसेच साईड डिश म्हणून ही करू शकता.

Share your love