साहित्य:
१ कप मोड आलेले मूग,
१ कप मोड आलेली मटकी,
पाव कप मोड आलेले हरभरे,
१ कप बारीक चिरलेली कोथिंबीर,
१०-१२ कढीपत्त्याची पानं,
२ हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करून,
१ लिंबू,
१ टीस्पून मोहोरी,
१ टेबलस्पून जिरं,
१ टीस्पून हिंग,
१ टीस्पून हळद,
१ टीस्पून लाल मिरची पूड,
२ टीस्पून सैंधव,
चवीनुसार जाडे मीठ बारीक कुटलेले,
तेल
कृती:
फ्राय पॅन मध्ये किंवा मोठ्या तव्यावर फोडणीसाठी तेल घाला. तापलेल्या तेलात मोहोरी घालून ती तडतडली कि त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जिरं, कढीपत्त्याची पानं आणि शेवटी हिंग घाला.
आता या फोडणीत सगळी कडधान्य घाला. त्यावर हळद, लाल मिरची पूड, सैंधव आणि जाडे मीठ घालून नीट हलवून घ्या. थोडेसे परतून त्यावर झाकण ठेवा. एक वाफ आली की झाकण काढून थोडंसं अजून परतून घ्या.
कुरकुरीत हवे असल्यास जास्त वेळ परतवून घ्या. गॅस बंद करून लिंबू पिळून घ्या आणि कोथिंबीर घाला. एकदा नीट हलवून घ्या.
झटपट चटपटीत कडधान्य तयार. पोटभरीचा पौष्टिक नाश्ता.
ह्या सोबत थोडंसं ताजं दही सुद्धा खाऊ शकता.
वर दिलेल्या प्रमाणात साधारणपणे २-३ जणांसाठी पोटभर नाश्ता होतो.
अशाच हेल्दी फूड टिप्स, रेसीपीसाठी Like करा Betterfast Lifestyle चे Facebook page: fb.com/betterfast
© BetterFAST Lifestyle Consultancy, Nashik.
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action)