काळ-काम-वेग आणि वेटलॉस

आपल्याला शाळेत असतांना काही गणिते असायची. उदाहरणार्थ, चार मजूर एक दिवसात दहा फूट भिंत बांधू शकतात तर दहा मजूर चार दिवसात किती फूट भिंत बांधू शकतील. काळ-काम-वेग ह्या संकल्पनांची सूत्रेही आपल्याला आठवत असतील. कोणतीही गोष्ट मोजमाप करुन ठरवायची एक पद्धत आपण शिकलेले असतो. दोन सारख्या वस्तूंमध्ये फरक ओळखण्यासाठी, एखाद्या वस्तूचे मूल्य दुसऱ्या तशाच वस्तूसंदर्भाने ओळखण्यासाठी अशा पद्धती वापरणे सोयीचे ठरते. उदाहरणार्थ, किसन दुधवाल्याकडून घेतलेल्या एक लिटर दूधात दोनशे ग्रॅम साय निघते, पण गोपाळकडून घेतलेल्या दुधात शंभर ग्रॅम निघते, तेव्हा कोणाकडच्या दूधात जास्त पाणी आहे हे आपल्याला कळून येते.

पण जेव्हा आपण वेटलॉसच्या संदर्भात विचार करतो तेव्हा हा ‘काळ-काम-वेग’ चा फॉर्मुला वापरणे अत्यंत चुकीचे आहे. बऱ्याच जाहिरातींमध्ये आपण ‘क्ष’ दिवसात ‘य’ वजन कमी झाले असे दावे वाचलेले असतात. कोणी यशस्वी कलाकार मी अमूक महिन्यांत तमूक किलो वजन कमी केले असे सांगत असतो, सांगत असते. बेटरफास्टकडे उत्सुक ग्राहक जेव्हा विचारणा करतात तेव्हाही बहुतेकवेळा पहिला प्रश्न हाच असतो की किती महिन्यांत वजन कमी होईल, किंवा पहिल्या महिन्यात किती कमी होईल. एकूण काय तर तेच शाळेतले गणित, एक किलो वजन कमी व्हायला किती वेळ लागतो? मग वीस किलो वजन कमी व्हायला किती महिने लागतील?

दर महिन्याला दोन ते चार किलो वजन कमी होणे हे वैद्यकिय दृष्ट्या योग्य आहे असे मानले जाते. बेटरफास्टमध्ये आम्ही हाच दंडक मानतो, आमच्या जाहिरातींमध्येही आम्ही हाच वेग दिलेला दिसून येईल. ह्यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी होत असेल तर चरबीसोबत मसल्ससुद्धा कमी होत असावेत अशी शक्यता असते. जे पुढच्या काळात आरोग्यास घातक ठरु शकते. अर्थात दोन किलोपेक्षा कमी वेग असेल तर चुकते आहे असेही ठामपणे म्हणू शकत नाही. त्याच्यामागे अनेक कारणे आहेत. म्हणूनच वजन कमी होण्याचा वेग हा खात्रीलायक दंडक असू शकत नाही.

वेटलॉसचे गणित फिजिक्सच्या नियमांप्रमाणे चालत नाही. आपले शरीर भौतिकशास्त्रापेक्षा जीवशास्त्राच्या आणि रसायनशास्त्राच्या नियमांनुसार जास्त चालते. आपले शरीर एक जीव आहे. त्यात अनेक बायोकेमिकल प्रोसेसेस सुरु असतात. ढोबळमानाने सर्वच माणसांचे शरीर एकसारखे असते. म्हणजे हाडांची संख्या, आतल्या-बाहेरच्या अवयवांची संख्या, त्यांची ठेवण, वेगवेगळ्या ग्रंथी, रसायने, पाणी, रक्त, केस, इत्यादी. पण ग्रंथी जी संप्रेरके निर्माण करतात त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. चयापचयाचा वेग कमी-जास्त असू शकतो, अन्न पचवण्याची आणि वापरण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. अनुवांशिकता, वय, वजन, उंची, लिंग, कामाचा प्रकार, आजार, जीवनशैली, आवडीनिवडी हेही वेगवेगळे असतात. एवढेच काय तर दोन व्यक्तींना एकसारख्या सूचना दिल्या तरी त्याचे पालनही त्या एकसारखे करु शकत नाहीत.

ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास ‘किती महिन्यात किती किलो वजन कमी?’ हा प्रश्नच निकालात निघतो.

बेटरफास्टच्या काही ग्राहकांची उदाहरणे बघितल्यास लक्षात येईल. पहीले उदाहरण एक चाळीस वर्षीय पुरुषाचे. ही व्यक्ती नियमित मॅराथॉन रनर. दरवर्षीच्या हंगामात नेमाने धावण्याचा सराव करणार, स्पर्धांत भाग घेणार. बेटरफास्टचा प्रोग्राम सुरु केल्यावर तीन महिन्यात एकूण आठ किलो वजन कमी झाले. धावण्याचा वेग वाढला, स्टॅमिना वाढला, उत्साह वाढला, थकवा कमी झाला. दुसरे उदाहरण एका नोकरदार महिलेचे. सासर-माहेर दोन्हीकडच्या जबाबदार्यात, शाळेत जाणारा लहान मुलगा आणि रोजचे ऑफिस अशी सर्व कसरत सांभाळत तीने बेटरफास्टचा प्रोग्राम पूर्ण केला. तीन महिन्यात सहा किलो वजन कमी झाले. तिसरे उदाहरण एका थायरॉईड रुग्णाचे, धावपळीचा मार्केटींगचा जॉब, घरापासून दूर राहणे, बाहेरचे खाणे, विचित्र कामाचे तास, सततचा प्रवास. अशा परिस्थितीत तीन महिन्यात सहा किलो कमी झाले. चौथे उदाहरण एका साठीतल्या हत्तीरोगाने ग्रस्त असलेल्या महिलेचे. बेटरफास्टचा प्रोग्राम सुरु केल्यावर पहिल्या महिन्यात दोन किलो वजन कमी झाले. पाचवे उदाहरण कोर्टात जज असलेल्या पिसीओडी झालेल्या स्त्रीचे, तीचे पहिल्याच महिन्यात चार किलो वजन कमी झाले होते.

वरील सर्व उदाहरणांत मोजमापासाठी आपण जे एकक वापरत आहोत ते आहे ‘किलो’. बाकीचे कोणतेही पॅरामिटर्स आपल्याला माहिती नाहीत. आता तेवढ्या एका पॅरामिटरवर आपण जर ही सर्व उदाहरणे एकमेकांशी टॅली करायला गेलो तर निश्चितच गडबड होईल. कारण प्रत्येकाची सुरुवातीची वजने वेगवेगळी आहेत. प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी आहे. आजारपणे आहेत. साठीतल्या आजाराने ग्रस्त स्त्रीचे महिन्याभरात दोन किलो कमी होणे हे मॅराथॉन रनरच्या दोन किलोपेक्षा कैकपटीने जास्त मोठी अचिव्हमेंट असू शकते. कोणत्याही दोन व्यक्तींच्या वजन कमी होण्याच्या वेगाची तुलना इथे अनाठायी असते. थायरॉईड-पिसीओडी असलेल्या स्त्रीचा सहा महिन्यात आठ किलो वेटलॉस हे एखाद्या १२० किलो वजनाच्या व्यक्तीच्या सहा महिन्यात तीस किलो वेटलॉसपेक्षा वेगळा आहे. एखाद्या व्यक्तीसाठी तिच्या एकूण वजनाच्या दहा टक्के कमी करु शकणे ही एक मोठी अचिव्हमेंट असू शकते. त्याची तुलना इतर कोणाच्या वीस-तीस टक्क्यांसोबत करणे अतिशय चुकीचे आहे.

म्हणूनच ‘माझ्या मित्राने दोन महिन्यात वीस किलो कमी केले’, ‘भावजयीच्या शेजारणीच्या भाचीने एक महिन्यात दहा किलो कमी केले’, ‘अमक्याने सहा महिन्यात चाळीस किलो कमी केले’ अशी वाक्ये वापरणे आणि त्यानुसार स्वतःच्या वजनाचे गोल्स ठरवणे योग्य नसते. आपले वजन कसे आणि किती कमी होईल ह्याचे गोल्स ठरवण्याआधी ‘सर्वंकष आरोग्यसुधार’ ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे असते.

वजनाचा काटा मोजता येतो म्हणून त्याबद्दलच नेहमी बोलले जाते. उत्तम आरोग्यामुळे वाढलेला उत्साह, उर्जा, पॉझिटीव्ह मूड, जगण्यामध्ये वाढलेला रस, वाढलेली इच्छाशक्ती, सकारात्मकता, कमी झालेला चिडचिडेपणा इत्यादी गोष्टींसाठी वजनकाटा नसल्यामुळे त्या मोजता येत नाहीत. ह्या गोष्टींना आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्व आहे हे आपल्याला माहितीही नसते. मुळात तशीही आपण ह्यांची अशी किंमत तरी किती करत असतो म्हणा.

बेटरफास्ट लाइफस्टाइल कन्सल्टन्सीमध्ये वजनाच्या काट्यासोबतच आम्ही ह्या सर्व गोष्टींना महत्त्व देतो. वजनाचा काटा आपल्या सर्व शरिराचे वजन दाखवत असतो. पण आपल्याला तर फक्त चरबी (फॅट) किती कमी झाले हे मोजायचे असते. शरीरातले चरबीचे प्रमाण मोजण्याच्या अनेक महागड्या टेस्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यापेक्षा आपली चरबी कमी होते आहे की नाही ह्याची खातरजमा करण्यासाठी घरच्याघरी एक सोपा उपाय असतो. आपला प्रोग्राम सुरु करण्यापूर्वी टेलर-टेपने सर्व अंगाची मोजमापे घेणे. मग दर पंधरा दिवसांनी त्यात किती बदल झाला ह्याची नोंद करत राहणे. इथे होणारा इंचेस-लॉस हा आपल्याला वजनकाट्यावरच्या किलो-लॉससोबत पडताळून पाहिल्यास वजन कमी होत आहे ना ह्याची माहिती घेता येते. हा होणारा बदल स्वतःच्याच पूर्वीच्या मोजमापांशी पडताळून पाहिला पाहिजे.

इतर कोणाच्या उदाहरणावरुन स्वतःचे मोजमाप कधीच करु नये. कारण तुम्ही एकदम युनिक आहात, तुमच्यासारखे जगात दुसरे कोणी नसते.

आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी व आपली हेल्द सुधारण्यासाठी आमचे खालील प्लान्स नक्की चेक करा.

  • शाळेसाठी पौष्टिक डबा

    Original price was: ₹250.00.Current price is: ₹100.00.
  • Essential 1 Month Program

    Original price was: ₹8,000.00.Current price is: ₹6,000.00.
Share your love