लाल भोपळ्याचे धिरडे


साहित्य:
पाव किलो लाल भोपळा, पाव किलो चणा डाळ, ७-८ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी तांदळाचं पिठ, २ टीस्पून धणे पूड, २ टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून हिंग, २ टीस्पून पांढरे तीळ, चवीपुरतं सैंधव किंवा जाडं मीठ, १ टीस्पून हळद, १ टीस्पून ओवा, मूठभर चिरलेली कोथिंबीर

कृती:
चणा डाळ ४-५ तास भिजत घालावी. किमान २ तास तरी भिजायला हवी. भिजलेली डाळ बारीक वरून घ्यावी. डाळ वाटतानाच त्यात हिरव्या मिरच्या पण घालाव्यात. लाल भोपळा सालासह नाहीतर साल काढून किसून घ्यावा.

आता वाटलेली डाळ, किसलेला भोपळा एकत्र करून त्यात बाकीचे सगळे साहित्य घालावे. हे मिश्रण नीट एकत्र करून घ्यावे आणि चमच्याने चांगले ढवळावे. आता तापलेल्या तव्यावर थोडे तेल टाकून त्यावर वाटीभर मिश्रण ओतावे आणि गोलसर फिरवावे. मग झाकण ठेवून एक बाजू भाजून घ्यावी. नंतर पलटून दुसरी बाजू पण लालसर सोनेरी छटा येईपर्यंत भाजावी.

ही धिरडी दही, एखादे लोणचे किंवा चटणी सोबत उत्तम लागतात .

अशाच हेल्दी फूड टिप्स, रेसीपीसाठी Like करा Betterfast Lifestyle चे Facebook page: fb.com/betterfast

© BetterFAST Lifestyle Consultancy, Nashik.
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action

Share your love