BetterFastPregnancyTips
अजून एक महत्त्वाचं, डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिली असतील ना कदाचित कॅल्शिअम, आयर्न, फॉलिक ऍसिड वगैरे ची. ती सगळी अगदी नियमित वेळच्या वेळी घ्यायची हं न चुकता, न विसरता. कितीही कंटाळा आला तरी औषधं टाळायची नाहीत हं.
महत्वाचं म्हणजे ही गोळ्या औषधं घेतल्यावर 2 तास चहा, कॉफी, बाजारात मिळणारी सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे घ्यायचं नाही बरं का. कारण गोळ्या घेतल्यावर किंवा गोळ्या घेण्यापूर्वी नुकतंच जर यातलं काही प्यायलं तर त्या गोळ्यांचा तुला आणि तुझा बाळाला पण जो फायदा व्हायला हवा तो तितक्या प्रमाणात होत नाही.
तर सारासार विचार करता, बाजारात मिळणारी सॉफ्ट ड्रिंक्स असोत की चहा कॉफी, हे सगळं होता होईल तेवढं टाळलेलंच बरं. म्हणजे मग तू जे काही इतर पौष्टिक पदार्थ, फळं खाते आहेस त्यांचा तुला आणि तुझ्या बाळाला पण पुरेपूर फायदा मिळेल.
तुला काही शंका असली तर अगदी निःसंकोचपणे विचार.
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in