BetterFastPregnancyTips
उन्ह आता जाणवायला लागलंय. आहारात आता थंड प्रकृतीच्या पौष्टिक पदार्थांची सुरुवात करायला हवी.
ही पाककृती नक्की करून बघ. सकस आणि पौष्टिक.. तुझ्याबरोबरच तुझ्या पोटातल्या गोंडस बाळासाठी ही.. 🙂
अर्धा किलो गहू, पाव किलो नाचणी वेगवेगळे भिजत घाल. त्याला मोड आणून मग कडक उन्हात १-२ दिवस वाळव. ही धान्य नुसती धुवून वाळवली तरी चालतात तशी पण मोड आणल्यामुळे पौष्टिकता वाढते म्हणून जरासा खटाटोप करावा इतकंच. पाव किलो डाळं पण घे. डाळं म्हणजे तेच गं आपण चिवड्यात घालतो ना ते.
आता वाळवलेले गहू आणि नाचणी मंद गॅसवर वेगवेगळे भाज. डाळं भाजण्याची गरज नाही. आता ह्या तिन्ही गोष्टी मिक्सरवर वेगवेगळ्या दळून घे. दळताना त्यात तुला आवडतील ते ड्रायफ्रुट्स पण घातले तरी चालतील.
असं हे पीठ तयार करुन ठेवायचं. लापशी/खीर करताना त्यातलं २ मोठे चमचे पीठ घेउन १ चमचा तूपावर भाज आणि त्यात अंदाजे १ वाटी पाणी घालून शिजव. त्यात गुळ, किंचित साखर, आवडत असेल तर नारळाच दुध किंवा गाईचं/म्हशीच दूध, वेलची/ जायफळ घालून सकाळी न्याहारीच्या वेळी खात जा.
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in