मायेचेबोल  भाग 15

BetterFastPregnancyTips

बोल गं … कशी आहेस..

जरा नाराज वाटते आहेस आज..

थोडासा आळस, बरीचशी चिडचिड, भरपुर कंटाळा… ह्या सगळ्यांची मैफिल जमलीये वाटतं सद्या..😉😉 हम्मम्म.. चालायचंच गं.. त्यांची मैफिल मोडावीशी ही वाटत नाही आणि पटकन संपुन जावी असं ही मनात घोळत असतं..

हे सगळं होतंच गं या दिवसात.. तु काळजी नको करुस..

तु असं का करत नाहीस .. छानशी गाणी ऐकना..नाहीतर नुसतं संगीत किंवा एखादं वाद्य..

अजून काय करता येईल बरं.. 😃

बाल संगोपन आणि मातृत्व वगैरे वाचून वाचून कंटाळा आला असेल तर ते ठेव जरा बाजूला.. 😂😂 एखादं नवीन पुस्तक घे वाचायला.. कथा, कादंबरी, कविता, मासिक काहीही वाच. अगदी लहान मुलांच्या गोष्टी, बडबड गीतं असं पण चालेल.. कसली मज्जा येते माहितीये तुला हे असं बाल साहित्य या दिवसात वाचताना.. आपण थोडेसे आपल्या बालपणात ही रमतो आणि येणाऱ्या बाळाच्या बालपणा ची स्वप्न रंगवण्यात पण.. 😊😊

तुला अजुन काही वेगळं करायला आवडत असेल तर त्यात मन रमव.. अगदी काहीच सुचत नसेल तेव्हा (शक्य असेल) तर सरळ बाहेर पड.. छोटासा फेरफटका मारून ये.. बागेत जाऊन बस थोडा वेळ..

बाहेर जाऊ शकत नसलीस तर मग एक गम्मत कर.. चक्क गॅलरीत नाहीतर खिडकीत तळ ठोक.. बाहेरचं एक एक दृश्य पहाता पहाता वेळ कसा भुर्रकन उडून जाईल कळणार नाही.. मस्त ताजीतवानी होशील..

मग थोडीशी भुक लागल्या सारखं वाटलं की चटकन काहीतरी गट्टम करायचं.. काही खास खावंसं वाटत असेल तर फारसा वेळ न दवडता लगेच मनाची आज्ञा अंमलात आणायची 😉😉

तु खुश आणि तुझं बाळ पण..☺☺

अजून एक करता येईल. तुला जर खुप थकल्या सारखं वाटत असेल.. पाठ, कंबर, पाय वगैरे दुखत असतील तर मस्त मसाज घे एखादा.. बरं वाटेल गं तुला. अंग मोकळं होईल जरा.

आणि सगळ्यात सोप्प म्हणजे मस्त ताणून दे.. झक्कास आराम कर.. चांगली झोप काढ ☺

झोप झाल्यावर सरळ कोणालातरी गाठ गप्पा मारायला.. हक्काची मैत्रीण नाहीतर आई नाहीतर अहो नाहीतर अजून कुणी.. कुणी ना कुणी श्रोता असतोच ना आपली बडबड ऐकायला सदैव तयार 😉😉

चल मग करूया काहीतरी.. वेगळं.. मजेदार..

–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in

Share your love