BetterFastPregnancyTips
काय गं नॉनव्हेज आवडतं का तुला..नाही म्हणजे खाण्याची इच्छा तर फार होते आहे, आठवणीनीच तोंडाला पाणी सुटतंय, आईच्या हातच्या एकेका पदार्थाची चव जिभेवर रेंगाळायला लागलीये.. पण खायचं की नाही, चालतं का.. अशा संभ्रमात आहेस..
अगं, तुला जर गरोदरपणाच्या आधी पासूनच अंडी, मांसाहार याची सवय असेल तर तेही तु खाल्लंस तरी चालेल, फक्त जरा हात राखून खावं इतकंच.
एखादं दुसरं उकडलेल अंड सकाळी न्याहारी च्या वेळी खात जा. कधी ऑम्लेट ही चालेल.
कधी जेवणात पोळी भाजीचा कंटाळा आला असेल तर ऑम्लेट किंवा बुर्जी करून पोळी सोबत खा. फक्त त्यात तेल अगदी गरजे पुरतच वापरलं म्हणजे झालं.
बाकी मांसाहारात जे तू नेहमी खात आली आहेस ते प्रमाणात खा. फार तेलकट किंवा मसालेदार खाऊ नको.
चिकन/मटण सूप पित जा. सुप बनवताना त्यात एखादा बोन पीस असुदे. तेही जितकं साधंसं करशील तेव्हढं बरं.
मासे खायला आवडत असतील तर जरूर खा पण त्यात मात्र खुप जपायला हवं. माशांमध्ये पाऱ्याच प्रमाण जास्त असेल तर ते बाळासाठी त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे ठराविक मासेच खा. जसं की रावस, कोळंबी, पापलेट वगैरे. पण तेही प्रमाणात कारण पचायला जरा जड असतात ना गं. या दिवसात पचन संस्था जरा नाजूक असते म्हणून आपलं जपायचं. आणि हो शक्यतो कुपा, सुरमई वगैरे नको खाऊस आत्ता.
त्यात तू राहतेस त्या भागात नक्की कोणते मासे मिळतात आणि त्यातले गरोदरपणात कोणते चांगले हे तुला ती कोळीण अगदी नीट सांगू शकेल. त्यामुळे तिला बिनधास्त विचार. तिला आपलेपणानी विचारलंस तर कदाचित ती ही मायेनं सांगेल गो बाय तुला. 😉
आकाराने फार मोठे वाढलेले असे मासे पण शक्यतो घेऊ नकोस कारण जितका जास्त काळ ते पाण्यात वाढतात तितकं त्यांच्यात पाऱ्याच प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते.
अजून एक महत्त्वाचं म्हणजे फक्त ताजे मासेच खायचे , गोठवलेले (फ्रोजन) नाही. तेही पुर्ण शिजलेले आहेत याची खात्री करूनच खा हं.
आणखी इतकंच सांगेन की मांसाहारी पदार्थ हे घरी बनवलेलेच खा. बाहेरचे खाऊ नको. का ते पुन्हा केव्हा तरी सविस्तर सांगेनच. 😊
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in