मायेचेबोल भाग 1

BetterFastPregnancyTips

“गोड बातमीची नुकतीच चाहूल लागली आणि आनंदानी मोहरून गेले …आता आपल्याला बाळ होणार, मला कुणीतरी आई म्हणणार…या सगळ्या विचारांनी मी कधी खुदकन हसले कळलंच नाही…

मग तेवढ्यात काळजी पण वाटायला लागली की मला झेपेल का हे सगळं??

आई म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्यांची यादी डोळ्यांपुढे नाचू लागली.. थोडीशी भीती पण वाटायला लागली.. मला कसं कळेल बाळ का रडतंय..बाळाला भूक लागलीय की पोटात दुखतय…मला कसं समजेल..?

अशी एक मोठ्ठी प्रश्नमालाच तयार व्हायला लागली..

कुणाला विचारू हे सगळं.. कोण सांगेल मला अगदी माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी सारखं कोण बरं समजून घेईल..”

असंच काहीसं आलं असेल ना गं तुझ्या मनात.. पण खरंच सांगते अजिबात काळजी करू नकोस . . प्रत्येकीचंच होतं गं असं.. म्हणून तू अगदी बिनधास्त बोल.. मन मोकळं कर..तुझं हे गोड अवघडले पण मनमुराद जग…

–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in

Share your love