बटाट्याचं थालीपिठ

साहित्य:

दीड कप किसलेला बटाटा,
४-५ बारीक वाटलेल्या मिरच्या,
१ कप बारीक चिरलेली कोथिंबीर,
२ टीस्पून जिरे पूड,
१ टीस्पून ओवा,
१ टीस्पून हळद,
१ टीस्पून तिखट,
१ टीस्पून हिंग,
चवीपुरतं कुटलेलं जाडं मीठ,
४ चिमूट सैंधव,
पाऊण कप ज्वारीचं पीठ,
पाऊण कप बाजरीचं पीठ,
पाव कप बेसन,
तेल.

(एवढ्या साहित्यात मध्यम आकाराची ५ ते ६ थालीपीठं होतील)

कृती:

बटाटे स्वच्छ धुवून साला सकट किसून घ्यावेत. तेला व्यतिरिक्त सगळे साहित्य एकत्र करून हाताने नीट कालवून घ्यावे. गरजेपुरते पाणी घालून नीट गोळा बनवून घ्यावा. पहिल्या कृतीत दिल्या प्रमाणेच थालिपीठं करून घ्यावीत. गरम असतानाच त्यावर साजूक तूप किंवा बटर घालावे.

हे थालीपिठ दही, लिंबाचं लोणचं किंवा सॉस सोबत खाऊ शकता.

Share your love