भाकरी आणि पीएचडी : वेटलॉसचा एकाकी लढा

बेटरफास्ट लाईफस्टाईल कन्सल्टन्सीद्वारे जगभरातल्या भारतीय लोकांना वेटलॉस व आरोग्य सुधारण्यासंदर्भात ऑनलाईन मार्गदर्शन दिले जाते. गेल्या दोन वर्षापासून भारतासह तीस देशांतल्या अनेक प्रेरणादायी कथांनी आमच्या अनुभवांचे गाठोडे भरत चालले आहे. अशाच एका लढवय्या तरुणाची प्रेरणादायी गाथा तुमच्याशी शेअर करावीशी वाटत आहे. त्याचे एक खास कारणसुद्धा आहे. ते पुढे कळेलच.

भारतातून डॉक्टरेट म्हणजे पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या वरुण यांनी आमच्याशी संपर्क साधला. आम्ही आमच्या पद्धतीनुसार त्यांची संपूर्ण माहिती घेतली. वय अवघे पंचवीस वर्षे. वय आणि उंचीनुसार वजन तब्बल सोळा ते वीस किलो अधिक होते. ऐन तारुण्यात असे वजन वाढलेले असल्यामुळे धाप लागणे, जिने चढल्यावर थकवा जाणवणे, कंटाळवाणे वाटणे असे त्रास जाणवू लागले होते. सतत भूकभूक होणे, त्यामुळे सतत काहीतरी खातच राहणे हि सवय झाली होती. अभ्यास करतानाही कायम तोंड चालूच असायचे. दिवसभर इतके खा खा होऊनसुद्धा कधी हॉटेलात खायला गेले तरी भरपूर खाल्ले जायचेच. असे का व्हायचे?

यामागे कारणीभूत असते ती इन्शुलिन रेझिस्टन्स नावाची एक शारीरिक अवस्था. सर्व नॉर्मल असेल तर आपण जे अन्न ग्रहण करतो त्यातला काही भाग ताबडतोब उर्जा म्हणून वापरला जातो आणि उरलेला नंतर वापरण्यासाठी चरबीच्या रुपात शरीरात साठवला जातो. तुम्ही काहीही खाल्ले तरी ह्याचप्रमाणे त्याचे वितरण शरीरात होते. शरीराला चोवीस तास उर्जेची गरज असते. परंतु मनुष्य चोवीस तास सतत अन्न पोटात ढकलत नसतो. पुढचे अन्न कधी मिळेल त्याची काही खात्री नसते. म्हणून शरीररुपी यंत्र सुरु राहावे म्हणून निसर्गाने केलेली ही एक सोय आहे. ह्यामुळे जेव्हा माणूस काही खात नसतो, किंवा खाऊन खूप वेळ झालेला असतो तेव्हा ही साठवलेली चरबी उर्जेसाठी वापरली जाते. अशा तऱ्हेने शरीरात अतिरिक्त चरबीचा साठा फार काळ टिकून राहत नाही. चरबीचे रूपांतर वापरण्यायोग्य साखरेत होते. शरीरातल्या पेशींना रक्तातली साखर उर्जेसाठी वापरता यावी म्हणून इन्शुलीन पेशींचे दरवाजे साखरेसाठी उघडून देतं. ह्यासाठी इन्शुलीन हे एका किल्लीप्रमाणे काम करते. पण ‘इन्शुलीन रेझिस्टन्स’ ह्या अवस्थेत इन्शुलिनची चावी आणि पेशींचे कुलूप यांच्यादरम्यान काहीतरी बिघाड होऊन बसतो. मेंदूकडे पेशी सिग्नल पाठवतात कि आम्हाला साखर मिळत नाहीये. तेव्हा मेंदूत भुकेची जाणीव तयार होते आणि मनुष्य अन्नग्रहण करतो. याचवेळी शरीर साठवलेली उर्जा वापरायची बंद करून केवळ हे जे काही ताजे येणारे जे अन्न आहे त्यातूनच झटपट उर्जा मिळवायला लागते. ह्याने काय होते कि दर एक दीड तासाने भूक भूक होऊ लागते. थोडेसे खाल्ले कि तेवढ्यापुरते बरे वाटते. पण लगेच भूक लागून अगदी डोके दुखायला लागते. नेमके ह्याच अवस्थेमुळे शरीराला थेट उर्जा मिळेल अशा अन्नपदार्थांची चटक लागते. जसे कि साखर, गहू, मैदा यापासून बनवलेले पदार्थ झटपट पचवले जाऊन लगेच वापरण्यायोग्य उर्जा म्हणजे कॅलरीज उपलब्ध करून देतात. परंतु ह्यामुळे रक्तात ग्लुकोज म्हणजे साखर वाढू लागते, कारण इन्सुलिन रेझिस्टन्समुळे हि साखर पेशींमध्ये शोषली जात नाही, म्हणजे उर्जा असून वापरता येत नाही, आणि शरीराला वाटते कि उर्जा कमी पडत आहे म्हणून ते आणखी भुकेचे सिग्नल मेंदूला देऊ लागते. मनुष्य परत खा खा खाऊ लागतो. आणि असे हे दुष्टचक्र एकदा सुरु झाले कि थांबायचे नाव घेत नाही. वजन झपाट्याने वाढू लागते. जणू पंचवीस तीस किलो वजनाचे एखादे साखरमैद्याचे पोते खांद्यावर घेऊन फिरतो आहे असे जाणवू लागते. त्यामुळे येतो थकवा आणि लागते धाप.

अशावेळी बेटरफास्ट लाईफस्टाईल प्रोग्राम मदतीस येतो. ह्यात आपली सर्व शारीरिक माहिती, दिनचर्या, कामाची पद्धत, ऊर्जेची गरज, खाण्यापिण्याच्या सवयी, इतर आरोग्यसमस्या, कुटुंबातली आजारांची हिस्ट्री अशी सर्व इत्थंभूत माहिती घेऊन आपल्यासाठी जीवनशैली बदलाचा एक सोपा सुटसुटीत लाइफस्टाईल प्रोग्राम आमच्या आहारतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला जातो. दर पंधरा दिवसाने फोनकॉलवर फॉलो अप घेऊन सर्व प्रोग्रेस नीट होते आहे ना, काही अडचण आहे का ह्याबद्दल मार्गदर्शन केले जाते.

अमेरिकेत डॉक्टरेट करणाऱ्या वरुण यांना वैयक्तिक माहितीवर आधारित प्रोग्राम दिल्यानंतर मुख्य समस्या होती ती जेवणाचीच. इथे खरी कथा सुरु झाली. कारण एकटे राहत असल्यामुळे आणि सोबत कोणी नातेवाईक, मित्रमंडळी किंवा भारतीय शेजार-सोय असे काहीही नसतांना भारतीय पद्धतीचे जेवण मिळणे हे एक मोठेच आव्हान होते. त्यांचे नेहमीचे जेवण म्हणजे मॅगी करून खाणे, पिझ्झा-बर्गर ऑर्डर करणे आणि बाहेर जाऊन हॉटेलचे खाणे. वरुण यांनी निश्चय केला कि आपल्याला वजन उतरवायचे आहे. त्यासाठी वाट्टेल ते करणार. त्यांनी स्वत: स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला. अवघा 25 वर्षे वयाचा मुलगा, आपल्या आयुष्यात प्रथमच स्वयंपाक करणार होता. त्यात पुढे आणखी एक अधिक मोठे आव्हान उभे राहिले. प्रोग्रामनुसार गव्हाचे आणि साखरेचे पदार्थ कमी करायचे होते. त्यासाठी पोळी, ब्रेड इत्यादी पदार्थ सोडून चक्क ज्वारी-बाजरी-नाचणीची भाकरी खायची गरज होती. अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या, एकट्या राहणाऱ्या आणि काही मदत मिळण्याची सुतराम शक्यता नसलेल्या तरुण मुलाने स्वत:च स्वत:ला लागणारी भाकरी करायची हा अतिशय क्रांतिकारक निर्णय घेतला. अमेरिकेत हि धान्ये आणि पीठे कुठून मिळवणार, त्यांची भाकरी कशी करणार ह्या सर्व कठीण प्रश्नांची उत्तरे हिकमतीने शोधली. आमच्या प्रोग्रामनुसार प्रमाणित अशी भाकरी थापायला आणि रोज सर्व स्वयंपाक स्वतः करून खायला सुरुवात केली. सोबत नियमितपणे पीएचडीचा अभ्यासही सुरु होताच.

भारतात तर भाकरीचे नाव बदनाम आहे, भाकरी खावी लागेल म्हटले कि बहुतेकांच्या आधी कपाळावर आठ्या येतात. कारण कि भाकरी हि गरिबांचे खाणे आहे, ज्यांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती हलाखीची आहे अशा लोकांनाच नाईलाजास्तव भाकरी खावी लागते असा काही भयंकर गैरसमज पसरलेला आहे. वस्तुतः ज्वारी, बाजरी, नाचणीच्या, तांदळाच्या भाकरीएवढे पौष्टिक दुसरे काही नाही. पोळ्यांपेक्षा भाकरी झटपट आणि कमी श्रमात होते. पण चित्रपटांतून, ग्रामीण भागांतून चुलीवर भाकरी थापणाऱ्या अशिक्षित बायका तथाकथित ‘मॉडर्न’ वाटत नसल्याने ह्या सर्वगुणसंपन्न आणि उच्चपोषणमूल्य असलेल्या पदार्थाला गव्हाच्या पोळीसारखे ग्लॅमर मिळत नाही. म्हणून सहसा भाकरीला नाके मुरडली जातात.

अशा परिस्थितीत वरुण यांनी शिवधनुष्य पेलले. आपल्या लाईफस्टाईल कोचच्या मार्गदर्शनानुसार हळूहळू पण यशस्वी बदल घडवले. सर्व गाईडलाईन्स नीट पाळल्या. आणि पहिल्या तीनच महिन्यात तब्बल साडेआठ किलो वजन उतरवले. नियमित पण माफक अशा व्यायामाने आणि योग्य आहारविहाराने इतरही अनेक सकारात्मक बदल घडले. इन्शुलीन रेझिस्टन्सची तीव्रता कमी झाली त्यामुळे सतत लागणारी भूक बंद झाली, चिडचिड बंद झाली. उत्साह-उर्जा वाढली, अभ्यासात एकाग्रता वाढली, सतत खाणे बंद झाले. आळस-थकवा पळून गेला. एकूण वजनाच्या दहा टक्के वजन कमी झाल्याने हलके हलके वाटू लागले, मन प्रसन्न राहू लागले. साखर-मैद्याचे ओझे उतरू लागले. पुढच्या काही महिन्यात उरलेले वजनही असेच हळूहळू पण नैसर्गिक पद्धतीने कमी होत जाणार आहे. हा क्रॅश डायट नसल्याने ‘थोडा काळ केले आणि परत पहिले पाढे पंचावन्न’ असे होत नाही.

बिघडलेल्या जीवनशैलीला सुधारून योग्य मार्गावर आणणे हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि हीच गुरुकिल्ली वेटलॉससाठी सर्वात जास्त आवश्यक असते. आपल्या मदतीसाठी बेटरफास्ट लाइफस्टाईल कन्सल्टन्सी सदैव तत्पर आहे.
(खाजगीपणा राखण्यासाठी सन्माननीय ग्राहकांचे नाव बदलले आहे)

  • शाळेसाठी पौष्टिक डबा

    Original price was: ₹250.00.Current price is: ₹100.00.
  • Essential 1 Month Program

    Original price was: ₹8,000.00.Current price is: ₹6,000.00.
Share your love