साहित्य: पाऊण कप अख्खे मूग, पाव कप तांदूळ, १०-१५ मेथी दाणे, ५-६ हिरव्या मिरच्या, २ मध्यम आकाराचे कांदे, ८-१० लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, २ टीस्पून जिरे, ८-१० कढीपत्त्याची पानं, २ कप मेथीची पानं, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून हळद, १ टीस्पून हिंग, २ टीस्पून सैंधव, चवीपुरते जाडे मीठ. betterfast.in
कृती: प्रथम एका भांड्यात मूग धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या भांड्यात तांदूळ धुवून त्यातच मेथी दाणे घाला व तेही रात्रभर भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी आधी तांदूळ मेथीदाणे बारीक रवाळ वाटून घ्या. शक्यतो वाटताना पाणी घालू नका. नंतर मूग वाटून घ्या. मूग वाटण्यासाठी मूग व तांदूळ भिजवायला वापरलेले पाणीच घ्या. मूग बारीक वाटून घ्या. मूग वाटताना त्यातच कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आलं, लसूण, जिरं हे सगळं पण घाला.
एका मोठ्या भांड्यात वाटून झालेले तांदूळ व मूग एकत्र करा. आता त्यात मेथीची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, हिंग, सैंधव आणि मीठ घाला. आता हे मिश्रण नीट हलवून घ्या. अगदी फेटल्यासारखे चांगले हलवावे त्यामुळे घावनाला छान जाळी येते.
हे घावन लोणचे, एखादी चटणी किंवा सॉस सोबत खूप छान लागते.
या दिलेल्या प्रमाणात साधारण १०-१२ मध्यम आकाराची घावनं होतात. ३-४ व्यक्तींसाठी अगदी पोटभरीची न्याहारी होते.