तुमचं वजन वाढलंय का?

वेटलॉसबद्दलचे अंदाधुंद गैरसमज टाळा.

खरं काय ते इथे वाचा.

१. सर्वात आधी आरोग्य आणि धडधाकटपणावर लक्ष दिले पाहिजे. वजन हा दुय्यम विषय आहे. आपले शरीर जितके निरोगी आणि तंदुरुस्त असेल तितके वजन उतरवणे सोपे होते. जर आपण आपल्या आरोग्याचा बळी देऊन वजन उतरवण्याच्या फंदात पडाल तर ते महागात पडण्याची शक्यता असते. आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे याचा विचार न करता कसलीतरी औषधे वापरुन झटपट वजन उतरवणे, कसलीही सप्लिमेंट्स घेणे ह्यामुळे हजारो लोकांच्या आयुष्यावर विचित्र परिणाम झाले आहेत. तुमच्या आजूबाजूला कोणी मित्र, स्नेही, ओळखीचे कसल्याही पावडरी विकत असतील तर सावधान राहा. भरमसाठ पैसे तर जातातच परंतु कालांतराने आधी नसलेल्या भयंकर शारीरिक व्याधी ओढवू शकतात. आमच्याकडे येणारे अनेक क्लायंट्स अशा फूड सप्लिमेंट्स, प्रोटीन सप्लिमेंट्सच्या साईड इफेक्ट्सचे अनुभव आम्हाला सांगतात तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. ही सप्लिमेंट्स बंद केली की उतरलेलं वजन परत दुपटीने वाढतं आणि झालेले दुष्परिणाम पाठ सोडत नाहीत.

२. वेटलॉससाठी जरा प्रॅक्टीकल आणि अचिव्ह होण्यासारखे गोल्स असावेत. कुठल्याही प्रकारच्या फॅड डायट्स, पाच दिवसांत दहा किलो कमी करणारे झटपट प्रकार, केवळ हाच पदार्थ खा, अमूक खाऊच नका अशा प्रकारच्या आतंकवादी डायट्सपासून शंभर फूट दूर राहा. डायट म्हणजे आहारपद्धती, ती आयुष्यभर फॉलो करता येत असेल तरच वजन नियंत्रणात राहतं. नाहीतर महिनाभरात क्रॅश डायट करुन उतरलेलं दहा किलो वजन पुढच्या दोन महिन्यात पंधरा किलोने परत येतंच. 

३. तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा. वेटलॉस हा एक प्रवास आहे. तो एक एक पाऊल चालूनच पूर्ण होतो. तुमच्या योग्य वजनापर्यंत पोचायला जर सहा महिने किंवा दोन वर्षे लागणार असतील व त्याने तुम्ही खचून जात असाल तर फक्त एवढा विचार करा की आज आत्ता त्याबद्दल निर्णय घेऊन अ‍ॅक्शन नाही घेतली, प्रवासाला आज सुरुवात नाही केली तर दोन वर्षांनीही आपण इथेच असू, असेच दिसू, असेच राहू. विचार करण्याची दिशा बदला. तुमचे वजन दर महिन्याला दोन-तीन किलो ने कमी झालं पाहिजे. अगदी ४० किलो जरी उतरवायचे असेल तर ते दोन दोन किलोनेच उतरलेलं चांगलं असतं. धीर धरा. सब्र का फल मीठा होता है. 

४. आपल्या रोजच्या वागण्याकडे, भावनांकडे आणि विचारांकडे लक्ष ठेवा. गरज नसतांनाही तुम्ही का खाता, किंवा व्यायाम का टाळता याचे कारण शोधून काढा. एखादी घटना तुम्हाला तणावग्रस्त करते का? आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी डिस्टर्ब करतात का ह्याचा शोध घ्या. वजन वाढण्यामागच्या अनेक कारणांत स्ट्रेस म्हणजे तणाव हे एक खूप मोठे कारण आहे. तणावामुळे हॉर्मोनल बॅलन्स बिघडतो आणि शरीर क्रायसिस मोड मध्ये जाऊन अधिकाधिक अन्न ग्रहण करायला लागतं. ज्याची तशी काहीच गरज नसते व त्यामुळे ते शरीरावर उगाच साठून राहतं.

५. तुम्ही रोज जे काही खाता पिता त्याकडे लक्ष द्या. एखादा पदार्थ खाल्ल्यावर कसं वाटतं ते बघा. फॅक्टरीमेड पदार्थ घेतांना लेबल नीट वाचून घ्यायला शिका. त्यात असलेले हानिकारक अ‍ॅडिटीव्ह्ज, प्रीझर्वेटीव्हज वाचायला लागलात की आकर्षक जाहिराती व पॅकिंग च्या मोहात न अडकता योग्य ती निवड करणे तुम्हाला शक्य होईल. साखर आणि मैदा ह्यापासून बनवलेल्या कोणत्याही फॅक्टरीमेड पदार्थापासून दूर राहा. 

६. ताटात खूप पदार्थ भरपूर प्रमाणात वाढून घेऊ नका. पोट भरल्याची सूचना मेंदूला होईस्तोवर गरजेपेक्षा जास्त अन्न पोटात गेलेले असते. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. तुमची भूक खूप असली तर हिरव्या भाज्यांचे सॅलड खाऊन जेवणाला सुरुवात करा.

७. तुमची जीवनशैली प्रयत्नपूर्वक बदला आणि बघा तुमचे शरीरही त्याप्रमाणे कसे बदलते. हा अगदी आश्चर्यकारक अनुभव असतो हे आमचे क्लायंट्स आम्हाला स्वतःहून सांगत असतात. जी केवळ आजवर सेलीब्रीटी लोकांकडून, सिक्सपॅकवाल्या मॅचोमॅन्स आणि स्लिमट्रीम मॉडेल्सकडून फक्त ऐकलेली असते ती एक सुंदर आणि आदर्श जीवनशैली, अगदी छोटे छोटे बदल हळूहळू करत आपणही नक्की घडवू शकतो. 

८. नेहमी लक्षात ठेवा की वेटलॉस हा अगदी वैयक्तिक विषय आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे आणि चयापचयाची क्रियाही वेगवेगळ्या क्षमतेची असते. त्यामुळे तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीने कसे झटक्यात वजन उतरवले म्हणून तुम्ही निराश व्हायची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त तुमच्या गोल्सकडे लक्ष द्या. तुमची शर्यत फक्त तुमच्याशी असते. इतर कुणाशीही नाही. तुमचे ध्येय असले पाहिजे एक निरोगी तंदुरुस्त शरीर आणि आरोग्यपूर्ण सवयी. तुमचे ध्येय असले पाहिजे एक अशी जीवनशैली जी कायमस्वरुपी तुम्ही पाळू शकता. 

९. जर तुम्ही सर्व काही नीट करत आहात तरीही तुम्हाला रिजल्ट्स मिळत नसतील तर तुम्हाला तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाची गरज आहे. बेटरफास्ट लाइफस्टाईल आपल्याला  वैयक्तिक पद्धतीने योग्य ते मार्गदर्शन करून आरोग्यदायी पद्धतीने वेटलॉस साठी मदत करते. अवघ्या पाचव्या दिवसापासून आपल्याला सकारात्मक बदल जाणवू लागतील. तेही कुठल्याही औषध, गोळ्या, सप्लिमेंट्सशिवाय. आमचे सर्टीफाईड डायटीशियन्स आणि लाइफस्टाइल एक्स्पर्ट्स आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने उत्तम मार्गदर्शन करुन आपले गोल्स मिळवण्यासाठी पूर्ण मदत करतील. आपले केवळ वजन नियंत्रणात येत नाही तर उत्साह, उर्जा वाढते, मूड सुधारतो, क्रेव्हिंग्स बंद होतात. एसिडीटी, अपचन, डोकेदुखी ह्यासारखे त्रास कमी होऊ शकतात. आपण स्त्री असाल आणि पिसिओडी, थायरॉईड ह्या आजारांनी त्रस्त असाल तर केवळ एकूण वजनाच्या दहा टक्के वजन कमी झाल्यास आरोग्यात खूप चांगला बदल घडून येतो. आमच्या हजारो यशस्वी ग्राहकांनी आपले आयुष्य कायमस्वरूपी सुधारले आहे. आता तुम्ही पण आपली जीवनशैली सुधारून त्याचा लाभ घेऊ शकता.

  • शाळेसाठी पौष्टिक डबा

    Original price was: ₹250.00.Current price is: ₹100.00.
  • Essential 1 Month Program

    Original price was: ₹8,000.00.Current price is: ₹6,000.00.

Please Note: All plans include Food Plan, Exercise Guidance, Special Recipes, Counselling & Troubleshooting, Motivation, Daily Chat Support, Dedicated LifeCoach, free access to useful tips and information in format of Podcast, Videos and Articles.

Share your love