मखाणा म्हणजे कमळाचे बी, ह्यात असलेल्या अनेकोविध गुणधर्मामुळे शेकडो वर्षांपासून आयुर्वेदात औषधी तयार करण्यासाठी वापरले जात आहे. मखाण्यात प्रोटीन, कॅल्सियम, पोटाशियम, फ्लेवनॉइड्स इत्यादी महत्त्वपूर्ण घटक असतात. मखाण्याच्या सेवनाने वेटलॉस, ब्लडशुगर कंट्रोल, पचनाच्या समस्या इत्यादींमध्ये लाभ होतो.
अशा लाभदायक मखाण्याचे सेवन कसे करावे हे मात्र बहुतेकांना माहित नसते. त्यासाठीच एक अगदी साधी सोपी रेसिपी सोबत देत आहोत.
साहित्य: 50 ग्रॅम मखाणे, 1 टेबलस्पून काळी मिरी पूड, 2 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून सैंधव, 2 टेबलस्पून तूप,
कृती: जाड बुडाच्या कढईत एक टेबलस्पून तूप घालून ते तापू द्या. आता त्यात मखाणे घालून अर्धा मिनिट परतून घ्या.
आता त्यावर लाल मिरची पूड, हळद, काळी मिरी पूड आणि सैंधव सगळीकडे नीट लागेल अशाप्रकारे घाला. पुन्हा मिनीटभर नीट परतून घ्या. सगळा मीठ मसाला सगळ्या मखाण्यांना व्यवस्थित लागायला हवा.
आता उरलेलं एक टेबलस्पून तूप वरून घाला. तूप थोडं जास्त घातलं तरी चालेल. अजून 2-3 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्या. मधल्या वेळच्या खाण्यासाठी क्रिस्पी चटपटीत पोटभरीचे पौष्टीक मखाणे झटपट तयार. ह्या क्रिस्पी मखाण्यासोबत पुदिन्याची चटणी घेतल्यास उत्तम.
लहानमुलांना तर हे मखाणे खूप आवडतात. पौष्टिक पदार्थ असल्याने मुलांना नेहमी देऊ शकता. थोडेसे खाल्ले तरी लगेच पोट ही भरतं.
दिलेल्या प्रमाणात ४ ते ५ व्यक्तींसाठी पुरेसे स्नॅक्स तयार होईल. हवाबंद डब्यात ठेवून आठवडाभर चांगले राहू शकते.
मग होऊन जाऊ देत क्रिस्पी मखाणे.
Nutritional Info: | |
50 gram Crispy Makhana contains: | |
Calories: | 450 |
Carbs: | 38g |
Fat: | 28g |
Protein: | 5 g |
Sodium: | 2 mg |
Potassium: | 455 mg |
*all values are approximate. |
Losing just 10% of your body weight can help a lot in major diseases like diabetes and PCOD, thyroid. Start your journey to healthy life with expert guidance on healthy weight loss.
Chat with us on WhatsApp.