पार्टीत काय खायचं?

पार्टी, समारंभ, सोहळे, फॅमिली गॅदरींग अशा प्रसंगी कसे खायचे?

वजनवाढीच्या समस्येने त्रस्त असलेल्या, वेटलॉससाठी प्रयत्न करणार्‍या लोकांना भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न असतो तो हाच की फंक्शन्स, पार्टी असते तेव्हा डायट कसे असले पाहीजे?

बेटरफास्ट लाइफस्टाइल प्रोग्राममध्ये आम्ही आमच्या क्लायंट्सना वैयक्तिक मार्गदर्शन करतो. त्यानुसार कोणत्या वेळी, प्रसंगी काय खाल्ले पाहीजे, काय टाळले पाहीजे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे भोजनाचा खरा आनंद कसा घ्यायला पाहीजे हे शिकवतो.

तरी काही जनरल टीप्स म्हणून खालील उपाय तुम्हालाही वापरता येतीलच.

१. संध्याकाळचा कार्यक्रम आहे म्हणून दिवसभर उपाशी राहू नका.


अनेक जण ‘संध्याकाळी भरपूर खायचे आहे, म्हणून आता मी काही खाणार नाही’ असे ठरवतात. ह्याने काय होते की दिवसभर भूक लागलेली असते, दिवसभर मनात भुकेचे आणि खाण्याचे विचार घोळत असतात. पोट सतत आठवण करुन देत असतेच. अचानकच सवय नसतांना जाणूनबूजून उपाशी राहील्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. तसेच असे दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी जेंव्हा सगळे अन्नपदार्थ एकत्र बघितले जातात, तेव्हा शक्यतो त्या वासाने, दिसण्याने अन्नावरची वासना उडते, किंवा पुरेसे अन्न खाल्ले जात नाही. मनाला समाधानही मिळत नाही. पूर्ण दिवस वायाच गेला असे वाटत राहते. यापेक्षा दिवसभर आपल्या नेहमीच्या वेळेवर व नेहमीच्या पद्धतीने जेवावं. अर्थात दोन चार घास कमी खाल्ले तर हरकत नाही. पण मन मारुन शरीराला त्रास देऊ नये.

२. कमी तेलकट, कमी मसालेदार पदार्थ निवडा.


आजकाल लग्नसोहळा असो की किटीपार्टी, बर्थडे पार्टी, काही न काही हेल्दी ऑप्शन्स मेन्यूमध्ये असतातच. त्यानुसार आपली प्लेट तयार करावी. कमी मसालेदार, कमी तेलकट असे पदार्थ घ्यावेत, किंवा जास्त मसालेदार, तेलकट पदार्थ कमी प्रमाणात घ्यावे. सलाड, ताक, कोशिंबीरी इत्यादी पदार्थ असल्यास अवश्य घ्यावेत.

३. सर्वच थोडे थोडे चाखावे:


खाण्यापिण्याच्या कार्यक्रमात पदार्थांची रेलचेल असते. खूप आवडणारा एखादाच पदार्थ पोट भरेस्तोवर खाऊन इतर पदार्थ सोडून देणे जीवावर येते. त्यापेक्षा सर्व पदार्थ थोडे थोडे घेऊन चाखावे. खाण्याचा एक माईंडफुल इटींग नावाचा प्रकार सध्या प्रचलित आहे. ज्यात प्रत्येक पदार्थ चाखतांना आपल्या खाण्याकडे पूर्ण लक्ष द्यावे, त्या पदार्थांची चव कशी आहे, तोंडात तो कसा विरघळतो, चावतांना कसा आवाज येतो, एकच चव लागते की अनेक चवी लागतात. आपली लाळ मिक्स झाल्यावर त्याची चव कशी होते. अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे ध्यानपूर्वक पाहील्यास आपल्याला तो पदार्थ खातांना मनसोक्त आनंद होतो आणि पार्टी आठवणीत सुद्धा राहू शकते.

४. गप्पा-गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा.


सगळे समारंभ, सोहळे हे खरेतर खाण्यासाठी नसून लोकांच्या एकत्र येण्यासाठी असतात. खाणे-पिणे हे केवळ एक निमित्रमात्र असते. त्यामुळे समारंभात आपल्या मित्रनातेवाइकांशी मनसोक्त गप्पा माराव्या, भेटीगाठी घ्याव्यात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा कराव्यात, आणि सोबतीला थोडेसे खाद्यपदार्थ असू द्यावेत. गप्पांमध्ये रंग भरु लागला की खाण्याकडे जरा दुर्लक्ष होतेच. तेवढेच पोटात अन्न कमी जाते!

फॅमीली गॅदरींग, पारंपारिक खाद्यपदार्थ ह्या सगळ्यांची मजा घेत आयुष्य जगणे आपल्या मनासाठी चांगले असते. त्यामुळे वरील टिप्स अंमलात आणल्यास “काय खाऊ, कसे खाऊ, माझे वजन तर नाही न वाढणार?” हा विचार आता तुमच्या मनाला खाणार नाही ह्याची खात्री बाळगा.

पोटभर खाऊन पोट कमी करता येते. मन मारून वेट लॉस करायची गरज नाही. हे सगळे आमच्या बेटरफास्ट लाइफस्टाइल प्रोग्राममध्ये शक्य आहे. आपला प्रोग्राम आजच सुरु करा. खालील बटणावर क्लिक करा:

  • शाळेसाठी पौष्टिक डबा

    Original price was: ₹250.00.Current price is: ₹100.00.
  • Essential 1 Month Program

    Original price was: ₹8,000.00.Current price is: ₹6,000.00.
Share your love