डायट…..? नाहीच जमणार मला.

‘वेटलॉससाठी डायट….. नाहीच जमणार मला’

असे तुम्हालाही वाटते ना? खरंच, ‘डायट’ या शब्दाचीच इतकी दहशत असते आपल्या मनात की जणू ती काळ्या पाण्याची शिक्षा आहे.

डायट म्हणजे आहारपद्धत. इतकी सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. त्यात कुठेही नकारात्मक छटा दडलेली नाही. उत्तम आरोग्यासाठी आपण काय खायला हवं, किती प्रमाणात खायला हवं, कधी खायला हवं अश्या सगळ्या सकारात्मक गोष्टींचा विचार करून जागरूकपणे आहार घेणं म्हणजे डायट असं आपण म्हणू शकतो. डायटबद्दल बरेच गैरसमज असतात. डायट म्हणजे काही नवे नवे खास पदार्थ नव्हेत. डायट म्हणजे आहाराची पद्धत. रोजचा आहार खाऊनच आपण वजन आटोक्यात ठेवू शकतो. तुम्ही जे रोज खाता तेच खायचंय. आपले डायट आपण कोणते पदार्थ खातो यावर तर अवलंबून असतेच पण कधी व किती प्रमाणात खातो यावरही अवलंबून असते. तुम्ही रोज आत्ताही जे खाताय तेही एकप्रकारचे डायटच असते, कारण डायट म्हणजेच खाण्यापिण्याची पद्धत, बास! हां, आता ते तुमचं ‘डायट’ जर आरोग्यदायी नसेल तर प्रश्न आहे बरं!
​​
असं इतकं सोपं असूनही आपण ‘डायट’ या शब्दाला इतकं का घाबरतो…? का त्यापासून चार हात लांब रहातो आणि​ ​आजारपणांना ​जवळ​ करतो​​…?

यात खरंतर पूर्णपणे आपली चूक आहे असं नाही. आजवर ‘डायट’ च्या नावाखाली जे अघोरी प्रकार आपण ऐकलेले असतात, बरेच जणांनी तर केलेले पण असतात, ते प्रकार या भीतीला जबाबदार आहेत.

diet

नुसतं फळं खाऊन रहा​​णे, दिवस भरात दोनच सफरचंद खाणे, नुसती उकडलेली अंडीच खाणे, फक्त भाज्यांचा किंवा फळांचा रस पिऊन दिवस काढणे, उकडलेल्या भाज्या खाणे, एकवेळ फक्त सॅलड खाणे, भात पूर्णपणे बंद करणे, तेल पूर्णपणे बंद करणे, तिखट-मीठ-मसाले अगदीच नावापुरते घालून अगदी बेचव अन्न खाणे, ​मूळ अन्न सोडून ‘सुपरफूड’ किंवा ‘मील सप्लिमेंट’च्या नावाखाली काहीतरी विचित्र चवीच्या पावडरी – ज्यूस पिणे, ​दिवसातून एकवेळ कसले तरी काढे नाहीतर स्मुदी, ज्युस असं काहीतरी पिऊन नंतर फक्त एकवेळ अगदी थोडंसं अन्न खाणे​, ​​एकाचवेळी व्यवस्थित पोटभर सकस संतुलित चौरस आहार न घेता तुकड्या तुकड्यात थोडं थोडं असं दिवसभरात सहा सात वेळा खात राहाणे ​…

diet-625_625x350_41473068279

बापरे! नुसतं वाचूनच किती भयंकर वाटतं ना हे सगळं… वाटणारंच कारण यातलं काहीच उत्साहवर्धक नाही. ​मनापासून करावं वाटण्यासारखं नाही. ही असली क्रॅश डाएटच जर आपल्याला ‘डाएट’ म्हणून माहित असतील तर ती आपल्याला जमणारच नाहीत हे समजतंच. कारण त्यात आपलं नेहमीचं रुटीन सोडून खूप बदल करावे लागतात, विनाकारणच खूप पैसे खर्च होतात, खास श्रम घ्यावे लागतात आणि बरंच काही करावे लागते ज्याने आपली चालू असलेली जीवनशैली डिस्टर्ब होते. मग सर्वात आधी तर असे बदल करणेच टाळले जाते, केले तरी ते इतके विचित्र असतात की फार काळ चालू ठेवणे जमतच नाही. म्हणून डायट म्हटले की लोक साशंक होतात, घाबरतात.

तर असा सगळा विचार करता आपली आहार पद्धत अशी हवी जी मन आणि शरीर दोन्हींसाठी आरोग्यदायी तर ठरेलच पण आपली रोजची जीवनशैलीही डिस्टर्ब करणार नाही.

यासाठीच योग्य त्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन आपल्याला काय करता येण्यासारखं आहे हे ठरवता येतं. एकदा आपल्याला आपल्यासाठी आरोग्यदायी ठरू शकेल व कायमस्वरुपी पाळता येईल अशी पद्धत मिळाली की डायट नावाची भीती राहणार नाही.

निरोगी शरीर ही चैन नसून जीवनावश्यक बाब आहे. आज आरोग्याकडे दुर्लक्ष करून उद्या अनेक दुखण्यांचा आजारांचा सामना करण्यापेक्षा आजच योग्य मार्ग निवडणं हा सूज्ञपणा आहे.

हळूहळू शिस्तब्धद्ध पद्धतीने वजन कमी करणे आणि ते करत असताना आपण आपल्या आहार-विहारात जे बदल करत आहोत ते आयुष्यभर टिकवून ठेवणे, हे फार महत्त्वाचं आहे. हेच सर्व अगदी सूत्रबद्ध पद्धतीने खास तुमच्यासाठी तुमच्या शरीरप्रकृतीनुसार आखून दिलं तर काय मज्जा येईल ना? तीन महिन्यात आपले सुमारे 6 ते 8 किलो वजन कमी होऊ शकते, उत्साह वाढतो, मूड सुधारतो. ह्यात कोणतीही महागडी औषधे पावडर नाही. आपले घरचे नेहमीचे जेवण जेवायचे आहे. योग्य वैयक्तिक मार्गदर्शन मिळते. आपली संपूर्ण माहिती घेऊनच आपल्याला मार्गदर्शन केले जाते. चला तर मग, आरोग्यदायी जीवनशैलीची सुरुवात करा.

Please Note: All plans include Food Plan, Exercise Guidance, Special Recipes, Counselling & Troubleshooting, Motivation, Daily Chat Support, Dedicated LifeCoach, free access to useful tips and information in format of Podcast, Videos and Articles.

Share your love