साहित्य:
अर्धा कप चण्याच्या/हरभऱ्याच्या डाळ्या,
अर्धा कप बारिक किसलेलं खोबरं,
10-12 मखाणे,
2 टेबलस्पून खसखस,
अर्धा कप गुळ,
5 बदाम,
2 टिस्पून वेलची पुड,
सजावटीसाठी चारोळ्या,
4 टेबलस्पून तूप
कृती:
जाड बुडाच्या कढईत 2 टिस्पून तुप घालून तापू द्यावे. त्यात मध्यम आचेवर मखाणे अर्धा मिनिट परतून घ्यावेत. मखाणे काढुन घेऊन त्याच कढईत अजुन तुप न घालता खसखस सुद्धा भाजून घ्यावी. मध्यम आचेवर साधारण मिनीटभरात खसखस भाजून होईल.
डाळ्या भाजक्याच असल्याने त्या भाजून घेण्याची गरज नाही.
गुळ बारिक चिरून किंवा किसून घ्यावा.
डाळ्या, मखाणे, खसखस, बदाम, गुळ सगळे एकत्र करून मिक्सरवर बारिक वाटुन घ्यावे.
बारिक केलेल्या मिश्रणात किसलेले खोबरे, वेलची पुड आणि तुप घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे.
तयार मिश्रणाचे लहान आकाराचे लाडू वळावेत. प्रत्येक लाडूवर एक चारोळी दाबावी.
दिलेल्या प्रमाणात लहान आकाराचे 15-16 लाडू तयार होतात.
© BetterFAST Lifestyle Consultancy, Pune.