अश्वत्थामाच्या बालपणीची कहाणी बहुतेक सर्वांना माहिती असेल. द्रोणाचार्य खूप गरिब होते. त्यांच्याकडे गायी नव्हत्या. अश्वत्थामाला प्यायला दूध मिळत नसे. त्याचे मित्र दूध पित असत. तेव्हा अश्वत्थामा घरी येऊन आईच्या खूप मागे लागत असे की आई मलाही दूध पाहिजे. माझे सगळे मित्र दूध पितात, मला का मिळत नाही. तेव्हा हृदयावर दगड ठेवून त्याच्या आईने पाण्यात पीठ कालवले आणि ते पांढरे घट्टसर पाणी अश्वत्थामाला दूध म्हणून प्यायला दिले. प्रत्यक्षात कधी दूध न प्यायलेला अश्वत्थामा, त्याला फक्त दूधाचा रंग माहिती होता, चव माहिती नव्हती. पीठ कालवलेले पाणीच दूध समजून पिऊन आनंदी झाला. ओठावर उमटलेली पांढरट मिशी मिरवत मित्रांना दाखवायला घेऊन गेला…
बाजारात उपलब्ध असलेले अनेक पॅकेज्ड पदार्थ ग्राहकांचा अश्वत्थामा बनवत असतात. रंग, रुप आणि चवीने भुरळ घालून फसवतात. प्रत्यक्षात त्या पदार्थांतले घटकपदार्थ काही वेगळेच असतात, असू शकतात. उदाहरणार्थ, पीनटबटरचा एक नावाजलेला ब्रँड बघितला, त्याचे घटक तपासले तर ८० टक्के साखर होती. घरगुती पीनट-बटर हा पाश्चात्त्य देशातला एक अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. भरपूर उर्जा, फॅट अणि प्रोटीन्स मिळवण्याचा एक चांगला स्रोत आहे. पीनटबटर बनवायची रेसीपी अगदी साधी आहे. भाजलेल्या शेंगदाण्यांचा लोण्यासारखे पातळ होईपर्यंत भुगा करणे. बाकी त्यात काही नसते. हे घरच्या घरीसुद्धा कोणीही करु शकते. पण अर्थातच वेळ लागतो, कन्सिस्टन्सी नीट येत नाही. त्यामुळे फॅक्टरीमेड पीनटबटर विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल झुकतो. आणि इथेच ग्राहक फसतो. हळूहळू घटक आणि प्रमाण बदलत, चवी बदलत चक्क खोटे उत्पादन बाजारात येऊ लागले आणि ग्राहक त्यालाच पीनट बटर म्हणून विकत घेऊ लागले आहेत.
पिनट-बटर हे फक्त एक छोटेसे उदाहरण आहे. बाजारात अशी हजारो प्रोडक्ट्स आहेत ज्यांचे नाव-रुप-रंग ओळखीचे असतात पण घटक मात्र भलतेच काही असतात. अनेकदा कृत्रिम रंग आणि चवी घालून बेमालूमपणे फसवले जाते. ग्रीक योगर्ट हा पदार्थही पौष्टिक समजला जातो. पण फॅक्टरीमेड फ्लेवर्ड ग्रीक योगर्टमध्ये दही कमी आणि साखर जास्त असते. साखरेचे अस्तित्व लपवण्यासाठी इतर रसायने घातली जातात.
अस्सल घटकपदार्थ वापरुन परवडण्याजोगे, शेल्फवर अनंतकाळ टिकण्याजोगे उत्पादन तयार करणे अशक्य असते. अस्सल उत्पादनांच्या किंमती सर्वसामान्य जनतेला अजिबात परवडण्यासारख्या नसतात. पण अतिश्रीमंत लोक जे वापरतात ते आपणही वापरण्याची सामान्य जनतेची इच्छा असते. त्यामुळे ह्या इच्छेला पूर्ण करणारे स्वस्तातले उत्पादन बाजारात येते आणि जनतेचा अश्वत्थामा होतो.
-
शाळेसाठी पौष्टिक डबा
Original price was: ₹250.00.₹100.00Current price is: ₹100.00. -
Essential 1 Month Program
Original price was: ₹8,000.00.₹6,000.00Current price is: ₹6,000.00.