कॅनोला तेल : चांगले कि वाईट ?

Canola Oil information in Marathi, Is Canola Oil bad for health?

 

या तेलामध्ये संतृप्त फॅट्सचे (saturated fat ) प्रमाण कमी आणि असंतृप्त फॅट्सचे (unsaturated fats ) प्रमाण जास्त असते. यामध्ये  omega-3  फॅटी अॅसीड हे सुद्धा येते.

कॅनोला तेल म्हणजे काय ?

फार पूर्वी औद्योगिक क्षेत्रामध्ये रेपसीड तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. या तेलाच्या निर्मितीचा खर्च जरी कमी असला तरी त्यामध्ये असलेल्या काही प्रतिकूल घटकांमुळे याचा खाण्यासाठी उपयोग करत नसत. ते घटक खालीलप्रमाणे आहेत.

Erucic acid : हे एक प्रकारचे फॅटी अॅसीड आहे. याचा काही उंदरांवर प्रयोग केला असता त्यांची हृदये निकामी झाल्याचे दिसून आले.

Glucosinolates : यामध्ये असलेल्या कडवट संरचनेमुळे तेलाची चव बिघडते.

कॅनडामधील काही शास्त्रज्ञ हे रेपसीड तेल खाण्यायोग्य बनवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी कमी हानीकारक आणि कमी कडवट असणारे बीज तयार करण्यासाठी ठराविक बीज प्रजनन प्रकियेचा अवलंब केला.

अशाप्रकारे कॅनोलाचा जन्म झाला. ओपन कॅनोला हे उद्योगधंद्याच्या व्यवहारामधील एक विशेष नाव आहे. कॅनोलाचे विस्तारित नाव कॅनेडियन ऑइल (काहींच्या मते याचे विस्तारित रूप  कॅनडा ऑइल, लो  अॅसीड  असे सुद्धा आहे.)

खरे तर कॅनोला हे एक विशिष्ट झाड नाही. हे फक्त अनावश्यक घटक कमी करण्यासाठी ठराविक बीज प्रजनन प्रक्रियेने विकसित केलेल्या रेपसीड जातीचे एक नाव आहे.

१९९५ साली,  मोन्सॅन्टो या जैविक तंत्रज्ञानातील प्रख्यात कंपनीने राउंडअप(Roundup) या तणनाशकाला प्रतिरोधक म्हणून अनुवांशिक प्रक्रिया करून ही रेपसीड जात विकसित केली.

सध्या जगातील जवळजवळ ९०% कॅनोलाची पिके ही अनुवांशिकदृष्ट्या बदल करून केलेली आहे.

कॅनोला तेल कसे बनते?

ती नक्कीच एवढी सोप्पी पद्धत नाही जी खोबरेल तेल, ऑलीव्ह तेल, लोणी यासारखे इतर तेल/ स्निग्ध पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात.

यामध्ये फार उष्णता असते या एकाच गोष्टीमुळे तुम्ही या तेलापासुनन दूर राहिले पाहिजे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतृप्त चरबीचे घटक (polyunsaturated fats ) असतात जे उष्णतेला फारच संवेदनशील असतात आणि त्यामुळे अन्न लगेच ऑक्सीडाइज्ड होते.

बियांमधून तेल काढण्यासाठी हेक्सझेन(Hexane ) या  विषारी विलायकाचा (toxic solvent ) उपयोग केला जातो. कधीकधी खाद्यतेलामध्ये काही प्रमाणात हेक्सझेन(Hexane )  आढळले आहे. या अनैसर्गिक उत्पादन प्रक्रियेमध्ये तेलाचे काही प्रमाणात नुकसान होते. या प्रक्रियेमध्ये तेलाचा वास सुद्धा नाहीसा केला जातो.

अमेरिकेमध्ये एका दुकानात ठेवलेल्या सोयाबीन आणि कॅनोला तेलावर संशोधन केले गेले. त्यामध्ये असे आढळून आले कि त्यांच्यामध्ये असणाऱ्या फॅटी अॅसीडपैकी 0.५६% ते ४.२ % हे विषारी ट्रान्स फॅट्स (trans fats ) असतात.

दुर्दैवाने हे त्या तेलावर असलेल्या लेबलवर लिहिलेले नसते.

कुत्रीमरित्या बनवलेले ट्रान्स फॅट्स (trans fats ) हे फार मोठ्या प्रमाणात हानीकारक असतात आणि यामुळे निरनिराळे आजार उद्भवतात. प्रामुख्याने जगात जास्त लोकसंख्येमध्ये असणारा आजार म्हणजे हृदयरोग, यासाठीसुद्धा हे कारणीभूत असतात.

शीत प्रक्रिया केलेले आणि सेंद्रिय कॅनोला तेल हे या सर्व प्रक्रियेतून तयार होत नाही आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट्स आणि ऑक्सीडाइज्ड फॅट्स नसतात याचीसुद्धा नोंद घेतली पाहिजे. परंतु दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात रेपसीड/ कॅनोला तेल हे औद्योगिक प्रक्रियेतूनच बनवले जाते.

कॅनोला तेल हे अनैसर्गिक प्रक्रियेतून बनवले जाते यामुळे उष्ण, वास नष्ट करणारे घटक आणि हेक्सझेन हे विषारी विलायक (toxic solvent ) तयार होतात. या प्रक्रियेमध्ये ठराविक प्रमाणात ट्रान्स फॅट्स तयार होतात.

कॅनोला तेलामधील पोषकद्रव्ये

इतर शुद्ध तेलांप्रमाणेच कॅनोला तेलामध्येही महत्वाची पोषकमूल्य कमी प्रमाणात असतात.

यात चरबी विरघळण्यासाठी उपायिक्त असलेले ‘व्हिटॅमिन ई’ आणि  ‘व्हिटॅमिन के’ किंचित प्रमाणात असते.

कॅनोला तेलामध्ये असलेले फॅटी अॅसीडचे प्रमाण खालीलप्रकारे आहे.

Saturated  : ७%

Monounsaturated : ६३%

Polyunsaturated : २८% (ओमेगा-६ आणि ओमेगा-३ यांच्या २:१ या प्रमाणात)

याची नोंद घ्यावी कि हे नंबर आणि सरासरी प्रमाण हि वेगवेगळ्या नमुन्यांप्रमाणे वेगवेगळे असते.

संतृप्त चरबी (saturated fat ) हि शरीरासाठी  अपायकारक आणि असंतृप्त चरबी (unsaturated fats ) हि शरीरासाठी  चांगली असते. तरीसुद्धा अजुनकही गोष्टींचा इथे उल्लेख करावासा वाटतो.

पूर्वीपासून संतृप्त चरबी(saturated fat ) हि जरी आरोग्यासाठी अपायकारक मानली गेली असली तरी सध्याच्या अभ्यासावरून असे दिसून येते कि याचा हृदयरोगाशी काहीही संबंध नाही.

त्यामुळे कॅनोला तेलामधील संतृप्त चरबीचे (saturated fat ) असलेले कमी प्रमाण यावर काहीही अवलंबून नाही. त्याचा उल्लेख फक्त विक्रीकरणातील युक्त्यांसाठी उपयोग केला जातो.

कॅनोला तेल मोनोसॅच्युरेटेड फॅटचा  (monounsaturated fat ) उत्तम स्रोत असतो. हे फॅट्स आपल्या शरीराला खूप  पोषक असतात आणि हे ऑलिव्ह तेलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात.

आता पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स(polyunsaturated fats) बद्दल जाणून घेऊया. याची माहिती खूप मनोरंजक आहे.

 हे खरे आहे कि कॅनोला तेलामध्ये ओमेगा-६ आणि ओमेगा-३ फॅटचे संतुलित प्रमाण असते.

तरीही हे सुद्धा लक्षात असुद्या की जरी आपल्या शरीराला थोड्या प्रमाणात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सची आवश्यकता असली तरीही त्याचे जास्त प्रमाण चांगले नाही.

आहारात कॅनोला तेलाचा जास्त वापर केल्यास शरीरातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण वाढते आणि त्याची पातळी गरज ओलांडून विघातक परिस्थितीपर्यंत पोहोचू शकते.

हे फॅटी अॅसीड शरीरातील पेशींच्या आवारणामध्ये जमा होते आणि ऑक्सिकरण (Oxidation ) होण्यास सुरुवात होते. यामुळे मूलभूत साखळी प्रतिक्रिया मुक्तपणे चालू होते आणि प्रथिने आणि डीएनए (DNA ) यासारख्या घटकांना हानी पोहोचण्याचा संभव असतो.

तसेच कॅनोला तेलामध्ये असणारे ओमेगा-३(Omega-३ ) हे  ALA (Alpha Linolenic Acid) असते.

ALA ही ओमेगा-३ ची प्राथमिक अवस्था असते. हिचे जोपर्यंत पुढील अवस्थेत म्हणजेच EPA आणि DHA मध्ये जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत याचा काहीही उपयोग नसतो.

बऱ्याच अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला की मानवी देह ALA चे EPA आणि DHA मध्ये परिवर्तन करू शकत नाही म्हणूनच कॅनोला तेलामध्ये असणाऱ्या ओमेगा-३ च्या जास्त प्रमाणाचा काहीसुद्धा उपयोग नसतो.

तसेच याचीसुद्धा नोंद घ्यावीशी वाटते की या ओंगळवाण्या उत्पादन प्रक्रियेत निरोगी हृदयासाठी उपयुक्त असणारे polyunsaturated fats आधीच निष्कृष्ट झालेले असतात आणि त्याचा खूप  मोठा भाग trans fats मध्ये परावर्तित होतो.

हे खरेच आहे की जर तुम्हाला ओमेगा-३ चा उत्तम स्रोत पाहिजे असेल तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मासे खाल्ले पाहिजेत किंवा मत्स्यतेलासारखे पूरक अन्न आहारात वापरले पाहिजे.

निष्कर्ष :

कॅनोला तेल जरी polyunsaturated fats चे उत्तम स्रोत असले तरी त्यातील बराच भाग हा आधीच निष्कृष्ट होऊन trans fats मध्ये परावर्तित झालेला असतो.यामध्ये संतृप्त फॅट्स (saturated fats ) चे प्रमाण कमी असते पण त्यामुळे काहीही फरक पडत नाही कारण संतृप्त फॅट्स (saturated fats ) हे निरुपद्रवी असते.

कॅनोला  तेलाने शरीरातील  कोलेस्टेरॉलची मात्र कमी होते. पण त्याने काही फरक पडतो का ?

आपल्याकडे बऱ्याच नियंत्रित चाचण्या घेण्यात आल्या, यात  संशोधकांनी ज्या लोकांना कॅनोला तेल खाण्यास दिले त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉल सारख्या घटकांचे निरीक्षण केले.

या संशोधनामध्ये असे दिसून आले की कॅनोला तेल रक्तातील एकूण कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते आणि LDL कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड ची मात्रा २५% पर्यंत कमी करते. याचा HDL च्या रक्तातील पातळीवर फारच कमी परिणाम होतो.

खरेतर या संशोधनांचा कालावधी खूप छोटा होता.(सगळ्यात जास्त ४ महिने परंतु बरेच ३-४ आठवड्यांचे संशोधन होते). हृद्यरोगाशी संलग्न गोष्टी माहीत करण्यासाठी हा कालावधी खूपच छोटा आहे.

हे समजणे महत्वाचे आहे की रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी ही धोक्याची सूचना असते. रोग होण्यासाठीचे कारण नसते.

जर कशामुळेतरी खरोखर हृदयरोगाला प्रतिबंध होत असेल तर आपल्याला हृदयरोगाबद्दल पूर्णपणे  जाणून घेतले पाहिजे. त्याचाशी संबंधित असलेल्या रक्तातील घटकांबद्दल जाणून घेणे पुरेसे नाही.

इतर बरीच वर्षे जे संशोधन चालू होते त्यात असे दिसून आले की वनस्पतीजन्य तेल कोलेस्टेरॉलची मात्रा अल्पकालावधीसाठी कमी करतात . परंतु मोठ्या कालखंडामध्ये याचे सेवन केल्यास हृदयरोग होण्याचा धोका वाढतो.

कॅनोला तेल हे इतर वनस्पतीजन्य तेलांइतके वाईट नाही(उदा. सोयाबीन तेल ) पण तरीही निरोगी शरीरासाठी परिपूर्ण नाही. यापेक्षा तुम्ही खोबरेल तेल किंवा शेंगदाणा तेलाचा वापर निरोगी आयुष्यासाठी फार चांगल्याप्रकारे करू शकता.

काही शंका असल्यास एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा ” निसर्ग कधीच वाईट फॅट्स बनवत नाहीत पण कारखाने बनवतात.”

Share your love