साहित्य:
20 बदाम, अर्धा कप पनीर चुरा, अर्धा कप मिल्क पावडर, 1 टेबलस्पून दही, 1 टेबलस्पून चारोळ्या, 1 टिस्पून वेलची पुड, अर्धा टिस्पून किसलेले जायफळ, 1 टिस्पून तूप
कृती:
बदाम कुटून त्याचे लहान तुकडे करून घ्यावेत.
पनीर चुरा व मिल्क पावडर एकत्र करावे. त्यात दही, कुटलेले बदाम, चारोळ्या, वेलची पुड, जायफळाची पुड घालून घट्ट गोळा तयार करावा.
एका ताटलीला तुप लावून तयार केलेला गोळा त्यावर थापावा.
कुकर मध्ये खाली पाणी घालावे. एका पातेल्यात/कुकरच्या डब्यात अर्धे पाणी घालून वर मिश्रण थापलेली ताटली ठेवावी.
कुकरच्या झाकणाला रिंग राहू द्यावी पण शिट्टी मात्र काढून घ्यावी.
मध्यम आचेवर 15 मिनिटं मिश्रण शिजू द्यावे.
थंड झाल्यावर मिश्रणाच्या वड्या पाडाव्यात. बदाम बर्फी तयार.
वर दिलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे 15-16 पीस तयार होतात.
© BetterFAST Lifestyle Consultancy