साहित्य:
२ कप तांदूळ, पाव कप चणा डाळ, पाव कप काळी उडदाची डाळ, पाव कप हिरव्या सालीची मूग डाळ, पाव कप जाडे पोहे, १५-२० मेथी दाणे, ४ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले, ४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १०-१२ कढीपत्त्याची पानं बारीक चिरून, १ टेबलस्पून जिरे पूड, ४ टीस्पून सैंधव, बारीक कुटलेले जाडे मीठ चवीनुसार, तेल
कृती:
डाळी धुवून एकत्र भिजत ठेवा. मेथीदाणे डाळीतचं भिजू घाला. पोहे आणि तांदूळ वेगवेगळे भिजत ठेवा. ४-५ तासांनी सगळं वाटून बारीक वाटून एकत्र करा. मिश्रण नीट हलवून आंबण्यासाठी उबदार जागी ठेवून द्या.
दुसऱ्यादिवशी मिश्रण आंबून चांगले फुगले की त्यात कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, जिरे पूड, सैंधव आणि मीठ घालून नीट फेटून घ्या.
अप्पेपात्र गरम करून त्यात थोडंसं तेल घाला. तयार केलेलं अप्प्यांचं मिश्रण अप्पेपात्रात घालून झाकण ठेवा.
अप्पे वरून कोरडे दिसले व त्याच्या कांदा अप्पेपात्रापासून सुटू लागल्या की अप्पे उलटून घ्या. पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवा.
थोड्याच वेळात अप्पे पूर्ण खरपूस शिजलेले असतील .
हे अप्पे पुदिन्याच्या चटणी सोबत, खोबऱ्याच्या हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत अतिशय चविष्ट लागतात.
पुदिन्याची चटणी
साहित्य: २ कप पुदिन्याची पानं, १ कप कोथिंबीर, ५ आवळे, ४-५ हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, एका लिंबाचा रस, २ टीस्पून सैंधव, बारीक कुटलेले जाडे मीठ, एक ग्लास पाणी.
कृती: पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या. आवळे चिरून त्याचे बारीक तुकडे करून त्यातले बी काढून टाका.
आता सगळं साहित्य पाणी घालून बारीक वाटून घ्या.
चटकदार आंबट तुरट चटणी तयार.
अप्पे, डोसे, पराठे सगळ्यासोबत खाऊ शकता.
अशाच हेल्दी फूड टिप्स, रेसीपीसाठी Like करा Betterfast Lifestyle चे Facebook page: https://www.facebook.com/BetterFastOfficial/
© BetterFAST Lifestyle Consultancy, Nashik.
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action)