BetterFastPregnancyTips
अगं कधीची वाट पाहत होते तुझी.. आवरलं का सगळं..
रोज उठुन नाश्त्यासाठी काय करावं हा नेहमीचाच यक्ष प्रश्न.. त्यात तुझ्यासाठी कसं सगळं अजून स्पेशल, पौष्टिक वगैरे वगैरे हवं ना .. मग काय संशोधन सुरू आहेच युद्धपातळीवर. 😉 त्यात अचानक सापडलं काहीतरी .. मी परवाच करून पाहिलं.. असा फक्कड जमला होता हा नवीन प्रयोग .. म्हंटलं तुला पण सांगावं..
आपल्या नेहमीच्या डाळ-तांदळाच्या इडली डोश्यांपेक्षा जरा वेगळ्या चवीचं आणि जास्त पौष्टिक असा एक प्रकार सांगते तुला..
2 वाटी उडिद डाळ, पाव वाटी चणाडाळ आणि 1 चमचा मेथ्या असं सगळं घे आणि वेगवेगळं भिजत घाल चांगलं 5-6 तास आणि नंतर वाटून घे.
आता या वाटलेल्या मिश्रणाच्या मापी दुप्पट नाचणीच पीठ घे आणि सगळं नीट एकत्र कर. एकजीव होण्यासाठी गरज वाटली तर थोडं पाणी घाल.
नेहमीच्या इडलीसाठी जसं पीठ तयार करतो तसं तयार करुन उबदार जागी पीठ आंबण्यासाठी ठेऊन दे.
दुसऱ्यादिवशी पीठ चांगलं आंबल की मीठ घालून नीट हलवून घे. मग काय तुला हवं तर मऊ लुसलुशीत इडली कर नाहीतर छानसे डोसे..😉
वाटलं तर त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची असा सगळा मालमसाला घालून उत्तप्पे किंवा आप्पे बनव..😋
नक्की आवडेल तुला.. 👍👍
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in