BetterFastPregnancyTips
मी काय म्हणते, वाचना सोबतंच काही लिहावंसं वाटलं तर तेही नक्की करुन बघ. लिहायचं म्हणजे अगदी धीर गंभीर साहित्य निर्मिती केली पाहिजे असं नाही काही. 😉 लिहायचं म्हणजे साधं सोप्प तुझ्या मनात येत असेल ते..दिवस राहिल्याचं कळल्या पासून तुला काय काय वाटलं.. तुझ्या आयुष्यात या गोड गोष्टीमुळे काय काय बदललं.. काय खावंसं वाटतंय.. काय करावंसं वाटतंय.. आणि जे वाटतंय ते केल्यावर, खाल्ल्यावर कित्ती आनंद होतोय.. मज्जा वाटते आहे.. कधी उगाच खुप हळवं व्हायला होतंय.. कधी अचानक थोडंस विसभोळं झाल्यासारखं वाटतंय.. तर कधी मनात नुसती उत्साहाची कारंजी थुई थुई नाचतायत..असं बरंच काही असेल ना गं..ते सगळं उतरू दे ना लेखणीतुन.. या आठवणी कायमच्या जपता येतील तुला..
कालांतराने हेच सगळं वाचताना पुन्हा हे दिवस जगु शकशील.. म्हणुन म्हणते प्रयत्न करायला काय हरकत आहे.. मग होऊनच जाऊ दे.. 😉
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in