BetterFastPregnancyTips
जेवणा सोबतच अजूनही काही पूरक गोष्टी खाल्ल्यास तर अजून फायदा होईल.
जसं की सुकामेवा:
2-4 काजू-बदाम, 1 अक्रोड, 4-5 काळया मनुका, 2-3 काळे खजूर, एखादं दुसरं अंजीर, 2-3 खारका वगैरे खात जा.
सगळं एकदम एकावेळी नाही खायचं काही. त्यामुळे काळजी नको करुस, इतकं कसं खाऊ याची. 🙂
तर यातले खजूर, अंजीर, काजू, बदाम हे प्रकार सकाळी खा. न्याहारी नंतर 10 वाजता वगैरे खाल्लं तरी चालेल. वाटलं तर त्यासोबत कधी कधी थोडं दुध पण पीत जा.
4-5 काळ्या मनुका दुपारच्या जेवणानंतर आणि 4-5 रात्रीच्या जेवणा नंतर खायच्या.
आणि खारका हवं तर संध्याकाळी खा 6 वाजता वगैरे.
म्हणजे कसं सगळं व्यवस्थित खाल्लं जाईल आणि त्याचे योग्य ते फायदे पण मिळतील.
यामुळे पोषक मूल्य तर मिळतीलच पण त्याच सोबत ऍसिडिटी, बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) हे पण टाळता येईल. अन्न पचन नीट होईल. रक्तातील हिमोग्लोबिनच प्रमाण वाढेल. गरोदरपणात आणि बाळंतपणातही या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात बरं.
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in