BetterFastPregnancyTips
अरे हो गोळ्या औषधांवरून आठवलं..
डॉक्टरांनी घ्यायला सांगितलेल्या औषधां व्यतिरिक्त इतर कोणतीही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायची नाहीत हं. अगदी एखादी सुद्धा पॅरासीटेमोल, क्रोसीन नाही की सर्दी खोकल्याच औषध नाही. कुठे काही दुखलं खुपलं तरी न विचारता पेन किलर पण घ्यायची नाही.
ही आणि अशी सगळी छोटी मोठी औषधं जी आपण सगळे एरवी अगदी सहज मेडिकल मधून आणतो आणि डॉक्टरांना न विचारताच घेतो सुध्दा. अगदी हवं तेव्हढं आणि वाटतील तितके दिवस. हे एरवी ही चुकीचंच आहे पण गरोदर पणी तर अजिबातच मान्य नाही. तुझ्या पोटातल्या बाळाला त्यामुळे त्रास होऊ शकतो. नंतर ही बाळ अंगावर दूध पित असतं तोपर्यंत हे पथ्य पाळावंच लागतं हं.
बाकी कोणतीही गोष्ट मी तुझ्यावर लादणार नाही किंवा कसली जबरदस्ती करणार नाही पण औषधां बाबत हयगय नाही. हे पथ्य मात्र तुला पाळावंच लागेल. मग, ऐकशील ना..तुझ्याचं गोंडस बाळासाठी आणि तुझ्यासाठीआहे गं हे सगळं..
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in