BetterFastPregnancyTips
कशी आहेस गं..
उन्हात जात नाहीस ना फार.. शक्यतो उन्हाच्या वेळी बाहेर पडू नकोस बरं. काळजी घे.
जास्तीत जास्त पाणी पित जा दिवसभरात. शक्यतो फ्रिज मधलं पाणी पिऊ नकोस बरं. माठातलं पित जा. ते चांगलं.
दिवसभरात एकदा शहाळ्याचं पाणी पी आणि त्यातली मऊ, थंड, गोड गोड मलाई पण खा. 🙂
दुपारच्या वेळी थोडंसं लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचं पन्ह असं आलटून पालटून घेत जा. या दिवसात चांगलं असतं घेतलेलं.
आणि एक सांगायचं राहिलंच, चहा कॉफी टाळता आलं तर बघ. अजिबात नाही घेतलंस तर फारंच उत्तम. पण अगदीच रहावत नसेल तर सकाळी लवकर साधारण 8 वाजता वगैरे नाश्ता कर आणि मग 2 तासांनी चहा/कॉफी घे थोड्या प्रमाणात.
दुपारी पण तसंच.. साधारण 4 वाजता वगैरे एखादं फळ खाल्लंस तर त्याच्या 2 तासानंतर चहा/कॉफी घे. आणि हो, फळांच्या रसा पेक्षा शक्यतो पूर्ण फळ खात जा. ते जास्त चांगलं पोषणाच्या दृष्टीने.
–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in