वेट लॉस नाही फॅट लॉस

बापरे! उपाशी रहायचं? अजिबात काही खायचं नाही? रात्री झोप कशी लागेल? थकवा नाही का येणार? ऍसिडिटीचं काय? डोकं दुखलं तर? एक वेळ न जेवता तर आम्ही किती उपवास करतो तरी कुठे होतंय वजन कमी? पण जास्त काळ पोट रिकामं ठेवायचं नसतं ना? आजारी नाही ना पडणार? नक्की काय खाल्लेलं चालतं? मग नाश्ता आणि दुपारचं जेवण पण कमी करायचं का? भात बंद करायचा का? तेल, तूप कमी करायचं का? नॉनव्हेज चालेल का? चहा कॉफी काही प्यायलं तर चालतं का? गोड खाणं बंद करायचं का? साखर खायची नाही ना? जास्तीत जास्त सॅलड खाल्लं तर पटकन फरक पडेल का? मी नोकरी करतो/करते, मग कसं जमणार वेळेचं गणित? व्यायाम कोणता करायचा? व्यायाम करायला वेळच मिळत नाही, तर मग कसं करायचं? व्यायाम नाही केला तरी वजन उतरेल का? रोज वजन करायचं का? किती दिवसात फरक जाणवेल? काहीच फरक नाही पडला तर? फरक पडायला सुरुवात झालीये हे कसं ओळखायचं?

वेट लॉस सक्सेसबद्दलच्या अभिनंदनाचा पाऊस कमी झाला आणि प्रश्नांचा पूर आलाय.

असंख्य प्रश्न. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न. यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी ते कदाचित वेगवेगळं असेल.

‘वजन वाढलेलं असणं’ अशी प्रथमदर्शनी कॉमन समस्या असली तरी त्या समस्येचे अनेक पैलू असतात. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळं, वजन वाढीची कारणं निराळी, वय वेगवेगळं, जीवनशैलीत विविधता, सवयी भिन्न, अन्नघटकात भिन्नता… असे अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतात कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधताना. त्यामुळे एकंच मात्रा प्रत्येकाला लागू पडेल असं होत नाही.

एखाद्या व्यक्तीचं वीस किलो वजन तीन-चार महिन्यात कमी झालं असेल तर दुसऱ्या व्यक्तीचं पण होईलच असं नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊन, जीवनशैलीत समतोल आणून, काही आहार-विहाराची पथ्य पाळून प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळू शकतं.

सगळ्यात आधी ‘हे आपल्याला जमणार नाही’ हा निराशावादी विचार झटकून टाकायला हवा. आपल्याला सुंदर दिसायचंय, तरुण दिसायचंय, आत्मविश्वास परत मिळवायचाय, सोशल कॉन्फिडन्स वाढवायचाय, आजारांना दूर ठेवायचंय, हेल्दी आयुष्य जगायचंय असा विचार करून मनाला तसं सतत बजावलं पाहिजे.

आरशात पहावंस वाटत नाही, पाहिलं तरी वाढलेलं पोट कसं झाकावं याचीच चिंता वाटत राहते. ही परिस्थिती दूर लोटून, वयात आल्यावर जसं अनेकदा आरशात पहावं वाटायचं तसं फीलिंग परत यायला हवं असेल तर मनोनिग्रह हवाच.

जितके महिने, वर्ष आपण हे चरबीचं पोतं घेऊन फिरतोय त्याच्या तुलनेत निश्चितंच फार थोडा काळ आपल्याला संयम राखायचा आहे. स्वतःसाठी पूर्ण निग्रहाने काही दिवस द्यायचे आहेत.

मग करायची ना सुरुवात आज पासूनच…

चला तर मग, आपल्या सगळ्यांच्या मनात गोंधळ माजवणाऱ्या अनेकानेक प्रश्नांची उत्तर शोधायला सुरुवात करूया.

साधारण पणे दिवसभरात आपण तीन ते चार वेळा खातो. नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी स्नॅक्स आणि मग रात्रीचं जेवण. तर आपण हे सगळं ‘कोणत्या वेळी खातो?’, ‘किती खातो?’ आणि ‘काय खातो?’ ह्या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

बरेच जणं खाण्याच्या वेळा पाळतात पण किती आणि काय खातो ह्याच्याकडे तितकंसं जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत. म्हणजे दिवसातून तीन किंवा चारही वेळा भरपूर खायचं आणि त्यातही अन्नघटकांचा, पौष्टिकतेचा किंवा व्यक्तिशः आपल्या शरीराला नक्की कशाची गरज आहे याचा ताळमेळ घालत नाहीत.

काही जणं वेळ पाळत नाहीत, किती खातोय ते पाहात नाहीत फक्त काय खातोय तेच बघतात. म्हणजे रात्रीचे 11 वाजले तरी बाहेरचं न खाता घरातलं ताजं गरमागरम खातोय ना मग पोट तट्ट भरेपर्यंत खाल्लं तर कुठे बिघडलं असा विचार असतो.

तर अशाप्रकारे कधी, किती आणि काय यामध्ये आपण कुठेतरी चुकत असतो, काहीतरी कमी जास्त होत असतं, जे आपल्या लक्षात येत नाही. मग हेच अतिरिक्त अन्न चरबी बनून हळूहळू शरिरावर वाढत जातं. त्याच्या तांत्रिक आणि वैद्यकिय शास्त्रीय माहितीत जाण्याची आपल्याला गरज नाहीये. कारण ती शास्त्रीय माहिती जाणून घेतल्याने वजन कमी होत नसतं.

मग काय करायचं तर सगळ्यात पहिले आपल्या दैनंदिनीला साजेशी वेळ ठरवायची. आपण चार वेळा खात असू तर एक वेळचं खाणं बंद करायचं. बाकीची तीन जेवणं आठ तासात बसवायची. म्हणजे समजा १० ते ६ ही वेळ आपण ठरवली तर पहिलं खाणं १० नंतर व शेवटचं खाणं ६ च्या आत व्हायला हवं. ह्या वेळा उदाहरणासाठी दिल्या आहेत. तुम्ही तुमच्या लाइफस्टाइल आणि कामाच्या संदर्भाने स्वतःची वेळ ठरवू शकता. फक्त ती ८ तासच असायला हवी. ही वेळेची घडी बसवताना आपल्याला किमान 16 तास सलग उपवास करायचा आहे हे लक्षात ठेवायचं. सुरुवातीला काही दिवस भूक भूक होते. भूक लागली की भरपूर पाणी प्यायचं. हा बदल आपल्या अंगवळणी पडायला काही दिवस जावे लागतात. “आता काही आपल्याला अन्न मिळणार नाहीये” असे म्हणून शरीर स्वतःच्या तंत्रात बदल घडवून आणतं. त्या विवक्षित वेळेत नंतर भूक लागणे बंद होते.

आता वेळेची घडी बसवली की काय खायचं हेही ठरवायचं. आपण नियमित कोणते पदार्थ खातो, त्यातलं पौष्टिक सकस काय आहे आणि जंक काय आहे, आपल्याला व्यक्तिशः कशाची गरज आहे, कोणता ऋतू सुरु आहे, कशाची उपलब्धता आहे या सगळ्याचा सारासार विचार करून आपल्याला काय खायचंय ते ठरवायचं.

वजन कमी करायचं तर पहिले भात बंद करायला हवा असं बरेच जण सांगतात. पण भात हे जर तुमचं मुख्य अन्न असेल किंवा पहिल्यापासूनच तुम्हाला भात खाण्याची सवय असेल आणि त्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नसेल तर भात बंद करण्याची खरंच आवश्यकता नाही. फक्त तुम्ही कोणता तांदूळ वापरता, किती प्रमाणात भात खाता ह्याचा विचार नक्कीच करायला हवा. खूप पॉलिश केलेला तांदूळ खाणे उपयोगाचे नाहीच.

तसंच तेल आणि तुपाचंही. फॅट्स असतात म्हणून तेल तूप पूर्ण बंद करणे चुकीचंच. आपल्या शरीराला योग्य त्या प्रमाणात यांची गरज असतेच. फॅट्स असलेल्या अन्नपदार्थांची गरज पचनसंस्थेला असते. अनेक प्रकारचे आवश्यक अन्नघटक त्यातून मिळतात. त्यामुळे आपल्या आहारात यांचा पुरेसा समावेश असायलाच हवा. फॅट्स खाल्ल्याने फॅट्स वाढतात हा एक मोठा गैरसमज आहे.

अंडी, नॉनव्हेज हे जर आपल्या आहाराचा भाग असेल तर ते प्रमाणात खायला काहीच हरकत नाही.

रोज गोड खायची सवय असेल तर ती पण हळूहळू कमी करत जायची. पण अगदी पहिल्या दिवसापासून ‘साखर पूर्ण बंद’ अशी प्रतिज्ञा करायच्या फंदात पडायचं नाही. ते जमत नाही आणि मग चौथ्या दिवशी आपलं अवसान गळून पडत. एखाद्या नाजूक हळव्या क्षणी आपण प्रतिज्ञा मोडतो. चार दिवसाचं गोड एकाच वेळी खाऊन मोकळे होतो. त्याची बोच पुढचे चार दिवस उरी बाळगतो. मग जमत नाही असं म्हणून गोड कमी करण्याचं टाळत रहातो. चहा कॉफीच प्रमाणही असंच हळूहळू कमी करावं लागतं. पण दिड दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने साखर सर्वथा बंद करायचीच हे मात्र ध्यानात ठेवा. ती आरामात होते तुमच्याही नकळत.

आता पुढचा प्रश्न असतो किती खावं. व्यक्तिशः तुमच्या गरजांचा, दैनंदिनीचा, वयाचा वगैरे विचार करून हे प्रमाण ठरवावं लागतं. आणि जस जसं आपल्या शरीराला उपवासाची सवय होऊ लागते, चरबी कमी होत जाते, आपल्या शरीरात बदल घडायला लागतात तसं तसं वेळोवेळो खाण्याचं प्रमाण बदलावं लागतं.

हि पध्द्त नीट काटेकोरपणे पाळली तर आजारांपासून दूर रहायला नक्कीच मदत होते. ज्यांना मुळातच ऍसिडिटीचा त्रास असेल त्यांचा त्रास हळूहळू कमी होत जातो. नीट विचार विनिमय करून ठरवल्याप्रमाणे, वर सांगितलेल्या तिन्ही गोष्टी पाळल्या तर थकवा जाणवत नाही. उलट उत्साही, ताजंतवानं वाटतं. याला व्यायामाची जोड दिली तर अजूनच चांगलं. योग्य पद्धतीनी, आवश्यक तेव्हढा व्यायाम केला तर अजून चांगले फायदे दिसून येतील.

कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीने, स्त्री असो वा पुरुष, योग्य मार्गदर्शनाखाली वर नमूद केलेल्या गोष्टी व्यवस्थित टप्याटप्याने अंमलात आणल्या तर वेट लॉस हे नुसतं स्वप्न न रहाता प्रत्यक्षात त्याची अनुभूती मिळते. पुन्हा नव्याने तारुण्य अनुभवता येतं. सळसळता उत्साह, तंदुरुस्त शरीर आणि प्रफुल्लित मन आपलं आयुष्य बदलून टाकतं. एका नव्या अध्यायाची प्रसन्न सुरुवात होते.

हेच सर्व अगदी सूत्रबद्ध पद्धतीने खास तुमच्यासाठी तुमच्या शरीरप्रकृतीनुसार आखून दिलं तर काय मज्जा येईल ना? त्यासाठी फक्त एक करायचं. खालच्या बटनवर क्लिक करायचं आणि स्वत:साठी एक प्लान निवडायचा..

Please Note: All plans include Food Plan, Exercise Guidance, Special Recipes, Counseling & Troubleshooting, Motivation, Daily Chat Support, Dedicated Life Coach, free access to useful tips and information in format of Podcast, Videos and Articles.

Share your love

2 Comments

Comments are closed.