Wow..! What a transformation..! What a Dedication..! Looking Awesome..! You are Great..! Amazing..! Beautiful..!
गेले काही दिवस सगळीकडूनच कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. बरेच जणांना आश्चर्याचे धक्के बसत आहेत. या सगळ्या कौतुकाने कदाचित अंगावर (पुन्हा) मूठभर मांस चढेल काय असं वाटायला लागलंय. पण आता ते तसं चढलं तरी काळजी नाही कारण जी जीवन शैली (lifestyle) मी आता स्वीकारली आहे त्यामुळे मी बरीच निर्धास्त आहे.
“तू काय केलंस, काय सिक्रेट आहे, कसं काय जमवलं…?” असे प्रश्न तर इतक्या सगळ्यांनी विचारले की मग वाटलं लिहावंच याबद्दल. माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या या अनुभवाबद्दल लिहायलाच हवं.
कॉलेजच्या दिवसांपासूनच व्यायामाची, फिट अँड फाईन राहायची आवड होती. आजूबाजूला दिसणाऱ्या, लग्न झाल्यावर खूप वजन वाढलेल्या स्त्रियांकडे पाहिलं की नेहमीच प्रश्न पडायचा. ‘लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर मी पण अशीच होईन का..?’ तेव्हा कल्पनेनेसुद्धा भीती वाटायची. बापरे खरंच असं झालं तर काय करीन मी…?
संसार सुरु झाला, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढल्या की स्त्रीला स्वतः कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. मुलांची, घराची काळजी करण्यात, सगळ्यांना जपण्यात इतकं गुंतून जातो आपण की त्यापुढे वाढलेलं वजन आणि त्यामुळे ओढवलेली दुखणी, आजारपणं याकडे नेहमीच काणाडोळा केला जातो. पाठ, कंबर, गुडघे, टाचा, इत्यादी इत्यादी, काय काय दुखत असतं. त्या व्यतिरिक्त दम लागणं, बीपी, डायबेटीस, संधिवात, स्पॉन्डीलायटीस, मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स आणि अजून काय काय मागे लागतं ते वेगळंच.
फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष सुद्धा तिशी नंतर सुटलेलं पोट, वाढलेलं वजन, हाताबाहेर गेलेली लाईफ स्टाईल, आजकाल कमी वयातच मागे लागणारी बीपी, डायबेटीस सारखी आजारपणं, स्ट्रेस, डिप्रेशन मग त्यातून येणारी व्यसनं आणि व्यसनातून परत येणारी हतबलता आणि निराशा .. या विषारी चक्राने सगळेच हैराण असतात.
बहुतेक आजारपणांचं कारण असलेलं हे चरबीचं पोतं जे आपण सदासर्वकाळ सोबत वागवत असतो त्याचा प्रत्येकालाच कंटाळा आलेला असतो. ते पोतं उतरवून दूर फेकायचं असतं, पुन्हा तरुणपणी सारखं हलकं फुलकं व्हायचं असतं.
पण जितक्या नकळत हे पोतं अंगावर चढत वाढत गेलेलं असतं तितक्या सहज ते कधीच कमी होत नाही. नकळत कमी होण्याचा तर प्रश्नच नाही.
सुरुवातीला काही वर्ष New Year Resolution म्हणून नव्याचे नऊ दिवस प्रयत्न केले जातात. जे लगेचच “हे तर आपल्या बा च्याने होणार नाही” या वाक्याने तिळगुळाच्या लाडवासोबत स्वाहा होतात.
दैनंदिन व्यापातून व्यायामासाठी भरपूर वेळ काढणं, डाएट प्लॅन स्ट्रीक्टली अंमलात आणणं शक्य नाही, चरबी कमी करण्याची हमी देणारी वेगवेगळी गोळ्या-औषधं फार काळ घेणं वा ती वेगवेगळी उपकरणं वापरणं हे सुद्धा अशक्य आहे या सगळ्याची जाणीव होऊ लागते. मग हळूहळू जे आहे ते आता असंच चालू राहणार हे आपण स्वीकारायला लागतो.. प्राप्त परिस्थितीपुढे हताश होऊन हात टेकतो.
मला पण असंच काहीसं वाटायला लागलं होतं. दुखण्यांचा, निरुत्साही जगण्याचा उबग आला होता. पण मार्गच सापडत नव्हता.
बरंच वाचन केल्यावर वजन कमी करण्याच्या अनेक पद्धतींची माहिती मिळाली. वेगवेगळ्या पद्धतींमधून माझ्यासाठी काय योग्य ठरेल ते सगळं शोधून वेचून बाजूला काढलं. त्यावर बरंच विचामंथन करून, तब्येतीवर वाईट परिणाम होणार नाहीत याची पूर्ण काळजी घेऊन, स्वतःलाच गिनीपिग करून २०१७ मध्ये प्रयोगाला सुरुवात केली.
सगळ्यात आधी रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद केलं. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण पूर्वीप्रमाणेच करत होते. रात्री मात्र फक्त पाणी. पाण्याशिवाय दुसरं काहीही नाही. दूध, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी, फळांचा रस, सरबत यातलं काही म्हणजे काहीच नाही. कोणतंही पेय नाही म्हणजे नाहीच घेतलं. संयम राखला.
सुरुवातीचे आठ दिवस फार चलबिचल झाली. जेवणाची वेळ झाली की काही सुचेनासं व्हायचं. घरातल्यांना जेवायला वाढताना, मुलांना भरवताना अन्नाच्या वासाने पार वेडं व्हायची वेळ यायची. वाटायचं फक्त एकंच घास घ्यावा. काय होणार एवढ्याशाने. पण तो एक घास घेतला तर तितक्यावरचं थांबणं शक्य होणार नाही हे ही समजायचं. उपवासाचे 16 तास पूर्ण केल्यावर दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी कधी तोंडात घास पडतो असं होऊन जायचं. रात्री फक्त पाणी पिऊन पिऊन ते सुरुवातीचे आठ दहा दिवस फार मुश्किलीने ढकलले. पण संकल्प मात्र अजिबात तोडला नाही.
मग हळूहळू शरीराला सवय व्हायला लागली. भुकेची तीव्रता जी सुरुवातीला असह्य होत होती ती आता आटोक्यात यायला लागली. अडीच तीन आठवड्यांनंतर आतून खूप छान वाटायला लागलं. उत्साही वाटायला लागलं. आपल्याला जमतंय हा आत्मविश्वास वाढायला लागला.
सुरुवात करण्यापूर्वी मी शरीराची सगळी मेजरमेंट्स घेऊन ठेवली होती. कारण नुसतं वजन पाहण्यापेक्षा इंचेस सुद्धा पाहणं मला गरजेचं वाटत होतं.
महिन्याभरात मला आता चांगलीच सवय लागली होती या पद्धतीची. त्यामुळे दुसऱ्या महिन्यात भूक असह्य होणं थांबलं होतं. वजन पाहण्याची किंवा इंचेस मोजण्याची मला अजूनही घाई नव्हती. माझा दिनक्रम शांतपणे सुरु होता. फक्त आता मी 30 ते 45 मिनिटं स्ट्रेचिंग आणि काही फ्लोर एक्सरसाईज करायला सुरुवात केली. आणि कटाक्षाने यासाठी उपवासाच्या काळातली वेळंच ठरवली. खाल्यानंतर किमान चार तासांनी व्यायामाला सुरुवात करायचे. हलका फुलका व्यायाम केल्यानंतर ताजंतवानं वाटायचं. अजिबात थकवा यायचा नाही.
याच महिन्यात अजून एक बदल केला. एक दिवसाआड 16 च्या ऐवजी 18 तास उपवास आणि आठवड्यातून एक दिवस 20 तास उपवास करायला लागले.
अडीच महिन्यात इंचेस लॉस जाणवण्या इतपत दिसायला लागला. कपडे सैल व्हायला लागले.
तिसऱ्या महिन्यात माझं दुपारचं जेवण पण पूर्वी पेक्षा थोडं कमी झालं. चहा पिण्याची इच्छा होईनाशी झाली. गोड पदार्थांचं वेड खूपच कमी झालं. कितीही आवडीचा गोड पदार्थ असला तरी पूर्वीच्या मानाने पाव भागच खाऊ शकत होते. अजून खाण्याची इच्छाच होत नव्हती.
आता घरातल्यानी माझ्या समोर रात्री पुरणपोळी खाल्ली काय किंवा पिझ्झा खाल्ला काय मला काहीच वाटेनासं झालं. आता मन इतकं घट्ट झालं होतं आणि शरीराला एवढी सवय झाली होती की अजिबात तोंडाला पाणी सुटायचं नाही. एक तरी घास घ्यावा असं वाटायचं नाही. मनावर ताबा मिळवला तिथेच अर्धी लढाई जिंकली होती.
चार महिन्यात बरंच वजन कमी झालेलं जाणवत होतं. इंचेस लॉस तर उत्तमच होता. कपडे सैल व्हायला लागणं यात जे सुख आहे ते आता पंचपक्वानांनी भरलेल्या ताटात ही नाही, ह्या भावने पर्यंत येऊन पोहोचले होते.
दिवसामागून दिवस जात होते. पाचवा महिना पण पूर्ण झाला. आता पायऱ्या चढून आल्यावर अजिबात दम लागत नव्हता. उलट आता मी पळत पायऱ्या चढू शकत होते. व्यायाम करताना, दिवसभरातली कामं करताना स्टॅमिना उत्तम होता. अंगात उत्साह नुसता सळसळत होता. माझी त्वचा आता पुन्हा छान दिसायला लागली होती. चेहऱ्यावरचे डाग जवळ जवळ गायब झाले होते. केस सुंदर दिसायला लागले होते. माझ्या टाचा कधी काळी असह्य दुखायच्या हे ही आता मी विसरून गेले होते. पाठ आणि कंबरदुखीपण छु झाली होती. मेन्स्ट्रुअल सायकल पूर्ववत झालं होतं. रात्री शांत झोप लागत होती आणि सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटत होतं.
या सगळ्याचा परिपाक म्हणजे माझी चिडचिड कमी झाली. मी आता सतत आनंदी राहू लागले. प्रत्येक समस्येवर न चिडता शांतपणे विचार करून मार्ग शोधू लागले. हातात घेतलेलं कोणतंही काम आता निगुतीने पूर्ण करत होते.
त्याच काळात आम्ही घर शिफ्ट केलं. तेव्हा लग्नातल्या साड्यांचे जपून ठेवलेले ब्लाउज सापडले. ते पुन्हा कधी घालू शकेन की नाही याबद्दल साशंक होते तरी सांभाळून ठेवले होते. अप्पर बॉडी फॅट लॉस बराच जाणवत होता म्हणून ब्लाउज कितपत अंगात शिरत आहे हे बघायला सहज घातले. तर “चक्क सगळे नीट होत होते”. ध्यानीमनी नसताना एकदम बोर्डात पहिली आल्यागत आनंद झाला होता. मग लग्नातली साडी नेसून चक्क घर भर हुंदडले, बागडले, नाचले…
आमच्या अहोंचा पण स्वतः च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मुलं म्हणाली “आई, तू खूप छान दिसतेस…” मग तर काय, उरलेला दिवस जमिनीपासून दोन बोटं वरच तरंगत होते.
इतके दिवस कपाटात सगळ्यात दुर्लक्षित ठिकाणी असलेल्या साड्यांच्या थप्प्या, आता पुन्हा वर आल्या. रोज एक कॉटनची साडी मस्त चापुनचोपुन नेसायची असा उपक्रम हाती घेतला. सगळे आश्चर्याने विचारत होते, “काय, आजकाल एकदम साडी वगैरे.. विचार काय आहे.. पोलिटिक्स वगैरे जॉईन करतेस की काय..?”
आता कॉन्फिडन्स दुप्पट झाला होता आणि जेवण निम्मं. आधी जेवायचे त्यापेक्षाही इतकं कमी जेवून थकवा अजिबात नव्हता. पण लोवर बॉडी फॅट अजून बऱ्याच प्रमाणात जाणवत होतं.
सहावा महिना पण सरला. अचानक एक दिवस माझी बहीण म्हणाली “ताई, साडीत तर तू आता पूर्वीसारखीच छान दिसते आहेस. आता पूर्वीच्या जीन्स पण घालून बघ ना होतात का..”
अख्खी सात वर्षे मी माझ्या जीन्स आणि त्यासोबत अजून काही कपडे जपून ठेवले होते. सगळेच अगदी नवे कोरे. त्यावेळेस केलेलं ते भरपूर सारं शॉपिंग होतं आणि तेव्हाच मी गरोदर असल्याचं लक्षात आलं. मग ते सगळे कपडे नीट पॅक करून असेच ठेवून द्यावे लागले. नवर्याचा पार हिरमोड झाला होता कारण लग्नानंतरची माझ्यासाठी त्याने फार हौसेने केलेली ती पहिलीच भलीमोठी खरेदी होती.
इतक्या वर्षांनी आत्ता त्या जीन्स घालून बघण्याची मला जरा भीतीच वाटत होती. एकतर जीन्स ची सवय मोडलेली. त्यात जीन्स नीट झाली नाही तर विरस होईल आणि मग दोन तीन दिवस असेच निराशेत जातील. मनाला उभारी मिळायला खूप काळ लागतो पण खचून जायला एक क्षणही पुरतो. त्यामुळे फार विचित्र मनस्थिती झालेली.
शेवटी हिम्मत करून जीन्स घालूनच बघायचं ठरवलं. पहिल्या प्रयत्नात विनासायास जीन्स घालता आल्या. अगदी सगळ्या. आणि गम्मत तर त्या पुढे होती. सगळ्या जीन्स कमरेला थोड्या सैल होत होत्या. तिथे त्या अल्टर करून आणाव्या लागणार होत्या.
आता तर अगदी पिसा सारखं हलकं झाल्यागत वाटत होतं. इतके वर्ष जपून ठेवलेल्या सगळ्या जीन्स, ट्राउजर्स, टॉप्स, कुडते आता एकदम मस्त होत होते. ते सगळे कपडे घालून फोटो काढून झाले. एक फॅशन शो पार पडला. आणि माझ्या आयुष्यातला नवा अध्याय सुरु झाला.
वाढलेल्या वजनामुळे, दुखण्यांमुळे, नैराश्याने गमावलेला सगळा आत्मविश्वास मी आज परत मिळवला होता. स्वतः सोबतची लढाई आज पूर्णपणे जिंकली होती.
या संपूर्ण काळात रात्रीचं जेवण बंद करण्याव्यतिरिक्त अजून कोणतीही गोष्ट मी स्वतःवर नाखुषीने लादली नव्हती.
आहार-विहारात जे काही बदल केले ते सगळे टप्प्याटप्प्याने आणि छोट्या-छोट्या प्रमाणात केले. त्यामुळे शरीराला आणि मनाला एकेका गोष्टीची हळूहळू सवय होत गेली. एकदमच सगळ्या गोष्टींचा ताण आला नाही.
वजन कमी करायचं आहे म्हणून अतिउत्साहात अन्नघटकांचा विचार न करता जेवण खूप कमी करणं, साखर एकदम बंद करणं, चहा-कॉफी बंद करणं, भरपूर चालायला जाणं, भरपूर व्यायाम करणं, भात, तूप, तेल किंवा रोजच्या जेवणातला इतर कोणताही अन्नघटक पूर्णपणे बंद करणं, उकडलेल्या भाज्या खाणं, नुसतं सलाड किंवा फळं खाणं, नुसता फळांचा-भाज्यांचा रस पिणं वगैरे वगैरे. असले सगळे प्रयोग एकाच वेळी सुरु केले नाहीत.
एक खूणगाठ मनाशी पक्की होती की हे जास्तीचं वजन एका दिवसात, एका आठवड्यात किंवा एका महिन्यात अचानक वाढलेलं नाही, त्यामुळे सगळे प्रयोग एकदम केले तरीही ते इतक्या कमी वेळात उतरणारही नाही.
आपल्या दिनक्रमात आहार-विहारात अचानक मोठ्या प्रमाणावर बदल केले तर ते आपल्या शरीराला सहन होत नाहीत, मनाला रुचत नाहीत. अशाने चार दिवसातच आपला हुरूप निघून जातो आणि आपण हार मानतो.
हळूहळू शिस्तब्धद्ध पद्धतीने वजन कमी करणे आणि ते करत असताना आपण आपल्या आहार-विहारात जे बदल करत आहोत ते आयुष्यभर टिकवून ठेवणे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे आयुष्यभर करणं शक्य नाही अशा गोष्टी करून पटकन वजन जरी उतरलं तरी त्या गोष्टी करणं थांबवलं की पुन्हा वजनाचा ‘काटा’ रुतायला लागतोच…
म्हणूनच संयम, सातत्य आणि सचोटी हे सगळंच फार महत्वाचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. ते तसंच राहण्यासाठी उत्तम आरोग्य फार आवश्यक आहे.
आज मला मुलांसोबत न थकता खेळता येतं, धावता येतं. चिडचिड न करता त्यांच्यासाठी पुरेसा वेळ देता येतो.
माझ्या चेहऱ्या वरच्या आनंदाचं प्रतिबिंब माझ्या नवऱ्याच्या डोळ्यांत दिसतं… माझ्यातलं सळसळतं चैतन्य त्याला पण ऊर्जा देतं असतं…
सुख सुख म्हणतात ते अजून काय असतं…
हेच सर्व अगदी सूत्रबद्ध पद्धतीने खास तुमच्यासाठी तुमच्या शरीरप्रकृतीनुसार आखून दिलं तर काय मज्जा येईल ना? त्यासाठी फक्त एक करायचं. खालच्या लिंकवर क्लिक करायचं,
तुमचा प्लान निवडा
प्रत्येक प्रोग्राम वैयक्तिक माहितीनुसार तयार केला जातो. आपणास हव्या असलेल्या सुविधांप्रमाणे प्लान निवडा.
Premium
रु. 999
1 month
Personalized Food Chart
4 Follow ups on Phone
Dedicated Personal Coach
coaching & support
Exercise Guidance
Essential
रु. 2499
3 months
Personalized Food Chart
8 Follow ups on Phone
Dedicated Personal Coach
coaching & support
Exercise Guidance
Transform
रु. 4199
6 months
Personalized Food Chart
12 Follow ups on Phone
Dedicated Personal Coach
coaching & support
Exercise Guidance
Please Note: All plans include Food Plan, Exercise Guidance, Special Recipes, Counselling & Troubleshooting, Motivation, Daily Chat Support, Dedicated LifeCoach, free access to useful tips and information in format of Podcast, Videos and Articles.