1) माझे वजन खरंच कमी होईल ना? गॅरंटी आहे का?
उत्तरः दिलेल्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी नीट फॉलो केल्यात तर 100% चांगले रिझल्ट्स नक्कीच दिसतात. आम्ही प्रामाणिकपणे मेहनत घेऊन तुमच्यासाठी प्लॅन तयार करत असतो. तो तुम्ही तितक्याच प्रामाणिकपणे फॉलो करावा म्हणजे नक्कीच फायदा होईल. आम्ही आमच्या प्लॅनची गॅरंटी देऊ शकतो पण तो तुम्ही फॉलो करालच याची गॅरंटी आम्ही कशी देणार?
2) एक महिन्यात किती वजन कमी होतं?
उत्तरः आधुनिक वैद्यकिय शास्त्रानुसार वजन घटण्याचे प्रमाण दर महिन्याला 2 ते 4 किलो असले पाहिजे म्हणजे आरोग्यपूर्ण पद्धतीने हे वजन कमी होऊन काही शारीरीक दुष्परिणाम दिसून येत नाहीत.
3) काही गोळ्या, औषधं देता का?
उत्तरः नाही. वजन कमी करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी आम्ही कोणतीही गोळ्या, औषधं, पावडर, सप्लिमेंट्स अजिबात देत नाही. पूर्णपणे नैसर्गिक पद्धत वापरली जाते.
4) काही फूड सप्लिमेंट किंवा पावडर वगैरे देता का?
उत्तरः नाही. वजन कमी करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी आम्ही काही फूड सप्लिमेंट किंवा पावडर वगैर देत नाही आणि recommend सुध्दा करत नाही. पूर्णपणे नैसर्गिक पद्धत वापरली जाते.
5) ह्या डायट प्लानमुळे काही साईड इफेक्ट होतील का?
उत्तरः नाही. ह्या डायट प्लानमुळे कोणतेही हानीकारक साईड इफेक्ट होत नाहीत. कारण ह्यात आपण कोणतीही मेडिसीन, औषधे, चूर्ण, पावडर, काढा, आयुर्वेदिक, जडीबुटी, सप्लिमेंट वापरत नाही. शक्यतो असे पदार्थ सूट न झाल्याने बर्याच लोकांना त्रास होतो. पण आमच्या प्लानमध्ये आम्ही असे काही घ्यायला सांगत नाही. त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत.
6) प्लॅन संपल्यानंतर पुन्हा वजन वाढतं का?
उत्तरः ९० दिवसाचा प्लॅन आपण योग्य पद्धतीने फॉलो केल्यास तो आपल्या अंगवळणी पडतो. शरीराला त्याची व्यवस्थित सवय होते आणि त्यामुळेच पुढेही तो विनासायास चालू ठेवता येतो. दिलेला प्लॅन आपण कायमस्वरुपी आयुष्यभर वापरु शकता त्यामुळे वजन परत वाढण्याचा धोका राहत नाही.
7) साखर पूर्ण बंद करायची का?
उत्तरः हो. साखर पूर्णपणे बंद करणं अपेक्षित नक्कीच आहे. परंतु पहिल्याच दिवसापासून नाही. तुमच्या प्लॅन मध्ये त्याबद्दल गाईडलाईन्स दिल्या जातात. महिन्यातून एखादा दिवस गोड पदार्थ खाल्ले तर चालतील. मात्र डायबेटीस असेल तर मात्र साखर बंद करावीच लागते.
8) शुगर फ्री किंवा स्टीव्हिया चालेल का?
उत्तरः नाही. या प्लॅन मध्ये शुगर फ्री किंवा स्टीव्हिया सुद्धा चालणार नाही. तीन महिन्यानंतर हे स्वीटनर वापरण्याची तुम्हाला गरज उरणार नाही.
9) भात पूर्ण बंद करावा लागेल का?
उत्तरः नाही. भात हे जर तुमचं मुख्य अन्न असेल किंवा पहिल्यापासूनच तुम्हाला भात खाण्याची सवय असेल आणि त्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नसेल तर भात बंद करण्याची खरंच आवश्यकता नाही.
10) नॉनव्हेज खाणं बंद करावं लागेल का?
उत्तरः नाही. अंडी, नॉनव्हेज हे जर आपल्या आहाराचा भाग असेल तर ते योग्य प्रमाणात खायला काहीच हरकत नाही.
11) चहा किंवा कॉफी घेतली तर चालते का?
उत्तरः चहा किंवा कॉफी पूर्णपणे बंद करणं अपेक्षित नक्कीच आहे. परंतु पहिल्याच दिवसापासून नाही. प्लॅन मध्ये त्याबद्दल गाईडलाईन्स दिल्या जातात. ऍसिडिटी किंवा डोके दुखी वगैरे असेल तर मात्र चहा/कॉफी लगेच बंद करावी लागते. चहा किंवा कॉफी प्याविशी वाटणे हा क्रेविंग चा प्रकार आहे. अॅडिक्शन आहे. त्याची शरीराला गरज नाही. कुठल्याही प्रकारचे अॅडिक्शन-क्रेविंग नाहीसे करणे हाच आपल्या प्लॅनचा भाग आहे. त्यामुळे चहाची सवय असली व त्याशिवाय आपल्याला जमणारच नाही असे आता वाटत असले तरी हळुहळु स्वतःहून चहा प्यावासा वाटणे कमी होत जाते.
12) गुळाचा चहा घेतला तर चालतो का?
उत्तरः नाही. मुळात चहा घेणंच पूर्णपणे टाळणं अपेक्षित आहे. त्यामुळे गुळाचा चहा पण नाही.
13) ‘सकाळी उठल्यावर पहिले फक्त चहा प्यायची सवय आहे’ तर उपाशी पोटी हा पहिला चहा घेतलेला चालेल का?
उत्तरः नाही. तुम्ही सुरुवातीच्या काळात, सवय होईपर्यंत नाश्ता आणि चहा एकत्र घेऊ शकता. पण नुसता चहा प्यायचा नाही.
14) दूध प्यायले तर चालेल का?
उत्तरः हो. देशी गाईचे किंवा म्हशीचे व्होल फॅट दूध (जर काही अॅलर्जी नसेल तर व पचत असेल तर).
परंतु स्किम मिल्क किंवा लो फॅट मिल्क असे प्रकार वापरु नये.
15) दही, ताक, लोणी, तूप, पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ चालतील का?
उत्तरः हो. तूप, लोणी, ताक हे पदार्थ शक्यतो घरगुती पद्धतीने तयार केलेलेच सेवन करावे. फॅक्टरीमेड तूप, लोणी, ताक शक्यतो टाळावेच.
16) गोडाचे पदार्थ, मिठाई पूर्णपणे बंद करायचे का?
उत्तरः हो. टप्याटप्याने कमी करत मग पूर्णपणे बंद. पण महिन्यातून एखादा दिवस किंवा सणासुदीला गोड पदार्थ खाल्ले तर चालतील. आपल्या आवडीच्या हव्या त्या गोड गोष्टी खाव्यात पण महिन्यातून एक किंवा जास्तीत जास्त दोनच वेळा.
17) ग्रीन टी चालेल का?
उत्तरः हो, चालेल पण साखर आणि दुधा शिवाय.
18) ग्रीन टी प्यायलाच पाहिजे का?
उत्तरः नाही. प्यायलाच हवा असे अपेक्षित नाही. तुम्हाला आवडत असल्यास पिऊ शकता.
19) तेल, तूप बंद करावे लागेल का?
उत्तरः नाही.
20) ब्रोकोली, लेटुस, अव्हाकॅडो किंवा इतर कोणत्या परदेशी महागड्या भाज्या, फळे खावी लागतील का?
उत्तरः अजिबात नाही.
21) जेवणा ऐवजी नुसतं सॅलड खाल्लं तर चालेल का?
उत्तरः नाही. सॅलड आणि जेवण दोन्ही योग्य प्रमाणात अपेक्षित आहे. मुख्य जेवणाच्या 25% सॅलड असणे लाभदायक आहे. ह्यापेक्षा जास्तही घेऊ शकता पण कमीत कमी 25% असले पाहिजे. सॅलडमध्ये काय असेल ह्याबद्दल आपल्या प्लॅनमध्ये सविस्तर माहिती दिलेली असेल.
22) हा डाएट प्लॅन फॉलो करत असताना थकवा येतो का?
उत्तरः सांगितल्याप्रमाणे नीट काटेकोर पालन केलं तर अजिबात थकवा येत नाही. उलट उत्साह वाढतो, नवीन उर्जा मिळते व दिवसभर हलकंफुलकं, जोमदार वाटतं. हार्मोन बॅलन्स झाल्याने मरगळ, निराशा दूर निघून जाते.
23) आंबा खाल्ला तर चालतो का?
उत्तरः सिझनल फळं निश्चितच खावीत पण योग्य प्रमाणात. फळे खाण्यास हरकत नाही म्हणून अतिरेक करू नये.
24) व्यायाम केला नाही तरी वजन कमी होईल का?
उत्तरः हो. सुरुवातीच्या काळात व्यायाम केला नाही तरी वजन नक्कीच कमी होईल.
हलका व्यायाम करायला सांगण्याचा आमचा हेतू वेगळा आहे.आपल्या शरीरातली कार्य योग्य पद्धतीने चालवीत यासाठी शरीराला माफक व्यायामाची गरज असते. जो आम्ही वेळच्यावेळी सांगतो. आम्ही फक्त वजन कमी करण्याच्या हेतूने व्यायाम सांगत नाही.
25) अॅसिडिटीचा त्रास होईल का?
उत्तरः नाही. उलट अॅसिडिटीचा जर तुम्हाला आधी पासून त्रास असेल तर तो हळूहळू कमी होऊन पूर्णपणे दूर होण्यास मदत होईल.
26) डोके दुखते का?
उत्तरः क्वचित दुखते एखाद्याचे फार थोड्या काळासाठी. पण त्यावर उपाय असतात. तसेही प्रत्येकाचेच डोके दुखेल असे नाही.
27) थायरॉईड चा प्रॉब्लेम असला तरी वजन कमी होऊ शकते का?
उत्तरः हो. थायरॉईड चा प्रॉब्लेम असला तरी वजन कमी होऊ शकते आणि त्यासोबत थायरॉईडचा प्रॉब्लेम सुद्धा आटोक्यात येऊ शकतो. फक्त त्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो.
28) PCOS/PCOD असेल तर वजन कमी होईल का?
उत्तरः हो. PCOS/PCOD चा प्रॉब्लेम असला तरी वजन कमी होऊ शकते आणि त्यासोबत PCOS/PCOD चा प्रॉब्लेम सुद्धा आटोक्यात येऊ शकतो. फक्त त्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो.
29) डायबेटीस, ब्लड प्रेशर किंवा दोन्ही असल्यास या डाएट प्लॅनचा फायदा होईल का?
उत्तरः हो. नक्कीच फायदा होईल. हे आजार आटोक्यात सुद्धा येतील. पुरेसा वेळ देणं व मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे.
30) हॉटेल मध्ये जेवलं किंवा स्ट्रीट फूड खाल्लं तर चालतं का?
उत्तरः हो. चालेल. ही सूट पंधरा दिवसातून एकदा असेल. त्या दिवशी हवं ते खाऊ शकता.
31) सहा तास झोप पुरेशी आहे का?
उत्तरः नाही. रात्री किमान 8 तास सलग व शांत झोप पूर्ण होणं गरजेचं आहे.
32) ‘जास्त वेळ पोट रिकामं ठेवायचं नसतं’ किंवा ‘दर दोन तासांनी खाल्लं पाहिजे’ असं म्हणतात, मग कसं करायचं?
उत्तरः हे काही गैरसमज आहेत व आधुनिक संशोधनातून ह्याचा फोलपणा जाहीर झाला आहे. आपल्या शरीराला सततच्या इतक्या अन्न पुरवठ्याची गरज नसते. आपण आवश्यकते पेक्षा जास्त प्रमाणात किंवा दिवसभरात थोडं थोडं करून जास्त वेळा खात असतो. यामुळेच अनेक अपायकारक गोष्टींना आपण अजाणतेपणी आमंत्रण देत असतो.
33) मी नोकरी करतो/करते तर मला हा प्लॅन फॉलो करणं शक्य होईल का?
उत्तरः हो. सहज शक्य आहे. प्रत्येकाच्या दैनंदिनीचा, आहारविषयक सवयींचा, गरजांचा विचार करून प्लॅन आखले जाऊ शकतात.
34) फक्त फळं किंवा फक्त कच्चा भाज्याच खाव्या लागतील का?
उत्तरः अजिबात नाही. आपल्याला संपूर्ण समतोल व सर्वसमावेशक आहार घ्यायचा आहे.
35) फक्त फळांचा रस किंवा इतर कुठले ज्यूसेस वगैरे पिऊन राहावं लागेल का?
उत्तरः अजिबात नाही.
36) किती दिवसात फरक जाणवेल? फरक पडायला सुरुवात झालीये हे कसं ओळखायचं?
उत्तरः पहिल्या आठवड्यातच आपल्याला स्वतः मध्ये काही पॉझीटीव्ह बदल दिसायला लागतील. वेट लॉस किंवा इंचेस लॉस दिसायला धीर धरावा लागेल. साधारण पहिल्या चार आठवड्यात तुम्हाला बदल जाणवेल, त्यानंतरच्या चार आठवड्यात घरच्या लोकांना, त्यानंतरच्या चार आठवड्यात मित्रमंडळी व ओळखीच्यांना तुमच्यातला बदल स्पष्ट दिसू लागेल.
37) काहीच फरक नाही पडला तर?
उत्तरः प्लॅन नीट फॉलो केला तर शक्यतो अशी परिस्थिती उद्भवत नाही. तरीही प्रत्येकाचे शरीर वेगळे असल्याने अपेक्षित वजन अपेक्षित वेळेतच कमी होण्याची 100% खात्री देता येत नाही.
38) नित्याचे उपवास केले तर चालतील का?
उत्तरः हो चालतील. त्याबद्दल सविस्तर माहिती प्लॅन मध्ये दिली जाईलच.
39) वजन वाढवायला मदत होऊ शकते का?
उत्तरः हो. होऊ शकते.
40) प्रत्यक्ष भेटायला आलं तर चालेल का?
उत्तरः हो. नक्कीच चालेल. Appointment घेऊन भेटायला येऊ शकता. Personal Consultation Rs.1900 only. पर्सनल कन्सल्टेशनची अपॉइंटमेंट हवी असल्यास “1900” असा मेसेज 7972948428 ह्या नंबरवर व्हॉट्सप करा. पुढील सूचना व्हॉट्सपवर मिळतील.
41) लहान मुलांच्या वजन वाढीबद्दल मार्गदर्शन मिळेल का?
उत्तरः हो, नक्कीच मिळेल.
42) सॅम्पल प्लॅन मिळेल का?
उत्तरः नाही. परंतु आमच्या वेबसाईटवर असलेली आर्टिकल्स वाचल्यास साधारण कल्पना येईल.
43) फक्त टीप्स मिळतील का?
उत्तरः टिप्स मिळणार नाहीत. व्यक्तिशः माहिती मिळाल्याशिवाय कोणत्याही टिप्स देणे योग्य नसते. आपले शरीर ही एक महत्त्वपूर्ण संपत्ती आहे, त्याबद्दलचे निर्णय इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकून घेऊ नये असे आमचे मत आहे. प्रत्येकाचे शरीर व आयुष्य वेगळे असल्याने जनरल टिप्स उपायापेक्षा अपाय करण्याची अधिक शक्यता असते. त्यापेक्षा प्लॅन घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित लाइफस्टाईल जगणे सोयिस्कर आहे.
44) तुमच्याकडे डायटीशियन अधिकृत, अनुभवी आहेत का?
उत्तरः हो. आमच्या टीममध्ये मान्यताप्राप्त संस्थांतून अधिकृत शिक्षण घेतलेले व क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले डायटीशियन्स आहेत.
45) मला फक्त पोटावरची/कमरेवरची/मांड्यांवरची चरबी कमी करायची आहे, माझी बाकी फिगर उत्तम आहे. मग तेवढ्या भागासाठी डायट प्लान सुचवणार का?
उत्तरः वेटलॉस संबंधी अनेक गैरसमज आहेत. त्यापैकी हा एक. शरीराच्या एकाच भागाची चरबी एकदम कमी होत नसते. तसे कोणी मशिन्स वापरुन करतातही पण ते आरोग्यदायी नाही. तसे कमी झालेले वेट परत दुपटीने वाढते.
आमच्या प्रोसेसमध्ये आरोग्य सुधारणे ह्यावर जोर आहे. आरोग्य सुधारले की अतिरिक्त चरबी आपोआप शरीराकडून एनर्जीसाठी वापरली जाऊ लागते. त्यामुळे निश्चिंत राहा, तुमचा डायट प्लान रिलिजीयसली फॉलो करा. वेटलॉस पेक्षाही बरेच फायदे तुम्हाला स्वतःत जाणवू लागतील.
46) प्रत्यक्ष न भेटता, न तपासता, शरीर न बघता केवळ फॉर्ममधल्या माहितीवरुन कसे काय डायट सांगू शकता?
उत्तरः आम्ही कोणतीही मेडीकल ट्रिटमेंट/उपचार देत नाही. शरीरावर केल्या जाणार्या प्रत्यक्ष ट्रिटमेंट साठी प्रत्यक्ष पेशंटचे शरीर बघणे गरजेचे असते.
प्रत्यक्ष भेटीतही आमचे डायटीशियन्स व लाइफस्टाइल एक्स्पर्ट्स, आपली आहारशैली (म्हणजेच खाण्यापिण्याच्या सवयी आणि पदार्थ) आणि जीवनशैली (काम, झोप, आराम, व्यायाम) बदलण्यासाठी, ऑनलाइन फॉर्ममध्ये असलेले प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांच्या उत्तरांतून आवश्यक माहिती मिळते. त्याच उत्तरांवर आधारित आपल्याला मार्गदर्शन केले जात असते मग ते प्रत्यक्ष असो की ऑनलाइन, तुम्हाला त्याचे रिजल्ट्स मिळण्यात फरक पडत नाही.