पौष्टीकतेने भरपूर कडधान्यांची शक्तीवर्धक भेळ!
कडधान्यात भरपूर पोषक तत्त्वे असली तरी सर्व प्रकारची कडधान्ये ही पचायला एकसारखी नसतात. पचायला सर्वात हलके कडधान्य मटकी. मग मूग व चवळी, त्यानंतर उडीद आणि हरभरा. कडू वाल व पावटा ही कडधान्ये पचायला सगळ्यात जास्त कठीण असतात.
100 ग्रॅम कडधान्यामध्ये 17 ते 25 % प्रोटीन्स असतात. आपण शुद्ध शाकाहारी असाल तर आपल्या प्रोटीन्सची गरज पूर्ण करण्यासाठी कडधान्ये एक उत्तम स्रोत आहेत. इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वसाधारण व्यक्तींना माणशी एक वर्षात 17 ते 25 किलो कडधान्य सेवन करणे गरजेचे आहे. म्हणजे आपण आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस तरी आपल्या रोजच्या आहारात कडधान्ये घेतली पाहिजेत.
प्रोटीन्ससोबतच कडधान्यांमध्ये बी विटामीन्स, मिनरल्स व फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. 100 ग्रॅम कडधान्यात थायमीन (जीवनसत्व ब-1) रिबोफलेवीन (जीवनसत्व ब-2) 0.18 ते 0.26 मिलीग्रॅम आणि नायसीन 2.1 ते 2.9 मिलीग्रॅम असतात. कॅल्शियम 76 ते 203 मिलीग्रॅम, आयर्न 7.3 ते 10.2 मिलीग्रॅम, फॉस्फरस 300 ते 433 मिलीग्रॅम या प्रमाणात असते. मात्र सोयाबीनमध्ये 18 ते 20 टक्के फॅट्स असतात. कडधान्यांमध्ये प्रोटीन्स, विटामीन्स, मिनरल्स व फॅट्स यांची एकत्रीत उपलब्धता हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि म्हणूनच कडधान्यांचे आहारातले महत्त्व अनन्यसाधारण आहे.
चला तर मग, आज बनवूयात अशा पौष्टीकतेने भरपूर कडधान्यांची शक्तीवर्धक भेळ. आपल्याला लागणारे जिन्नस म्हणजे मोड आलेली प्रत्येकी अर्धा कप मटकी, मूग. सोबत नीट बारीक चिरलेले प्रत्येकी अर्धा कप टोमॅटो, कांदा, कोबी, कैरी. झालं! हे सगळं छान एका बाउल मध्ये घेऊन मस्त एकत्र करा. त्यात दोन दोन चिमूट काळे मीठ आणि सैंधव मीठ टाका, वरुन एक मिडियम साइज लिंबाचा रस पिळून टाका. चांगले मिक्स करा आणि झाली आपली आरोग्यदायी, शक्तीदायी भेळ तयार. सोबत खायला घ्या पालकाची पाच पाने. हाच आपला आजचा हेल्दी ब्रेकफास्ट!
बघा, एवढी सगळी भेळ तुम्हाला एकट्याला संपवता येत असेल तर काहीच हरकत नाही, पण एखादा जोडीदार शोधलात तर साथ में खाने का मजा तो कुछ और ही हैं!
अशाच रुचकर आणि हेल्दी फूड टिप्ससाठी like करा Betterfast Lifestyle चे Facebook page:
https://www.facebook.com/betterfast/
© Betterfast Lifestyle
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action)