साहित्य:
२ मोठे चिकन लेग पिस (वजन अंदाजे ३५० ते ४०० ग्रॅम), ६-७ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, २ टीस्पून धणे पूड, २ टीस्पून जिरे पूड, ३ टीस्पून कश्मिरी लाल मिरची पूड, १ टीस्पून हळद, २ टीस्पून गरम मसाला किंवा तंदुरी चिकन मसाला, अर्धा कप दही, मीठ चवीनुसार, तेल, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाच्या फोडी.
कृती:
लेग पिस स्वच्छ धुवून त्यावर चाकूने तिरके काप द्या.
आल्याचे तुकडे व लसूण पाकळ्या एकत्र करून त्यात धणे पूड, जिरे पूड, लाल मिरची पूड, हळद, गरम मसाला आणि मीठ हे सगळं साहित्य घाला. आता ते एकत्र कुटून घ्या किंवा मिक्सरवर बारीक करून घ्या.
हे तयार मिश्रण आणि दही चिकन लेग पिसला नीट चोळून घ्या. पिस वर जे तिरपे काप दिले आहेत त्याच्या आत मध्ये पण हे मिश्रण नीट चोळून घ्या. आता मसाला चिकन मध्ये मुरण्यासाठी व्यवस्थित झाकून किमान अर्धा तास ठेवून द्या. अर्ध्या तासापेक्षा जास्त किंवा रात्रभर मुरण्यासाठी ठेवणार असाल तर ते फ्रिज मध्ये ठेवा. फ्रिज मध्ये ठेवल्यास, चिकन पिस भाजण्यापूर्वी, किमान अर्धा तास आधी फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा. चिकन जितके जास्त वेळ मुरेल तितकी छान चव लागते.
भाजण्यासाठी तवा गरम करून त्यावर २ टेबलस्पून तेल घाला. तेल तापले की त्यात चिकन पिस ठेवा. झाकण ठेवून मंद आचेवर १० मिनिटे शिजू द्या.
नंतर पिस उलटून दुसऱ्या बाजूने पुन्हा १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
तयार झालेल्या चिकन लेग पिस वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून लिंबासोबत वाढा.
अशाच हेल्दी फूड टिप्स, रेसीपीसाठी Like करा Betterfast Lifestyle चे Facebook page: https://www.facebook.com/BetterFast
© BetterFAST Lifestyle Consultancy, Nashik.
www.betterfast.in
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action) www.betterfast.in