सहजसोपा वेटलॉस

जिने चढल्यावर थकवा येणं, दम लागणं, कंबर, पाठ, टाचा वगैरे दुखणं, खाली बसणं-उठणं कठीण होणं, वारंवार डोकं दुखणं, ऍसिडिटी चा नेहमी त्रास होणं, चेहऱ्यावर डाग पडणं, मान काळी होणं, डोळ्याखाली काळी वर्तुळ येणं, त्वचा निस्तेज दिसणं, केस रुक्ष होणं, मासिक पाळीशी संबंधित त्रास उद्भवणं, हिमोग्लोबिन कमी असणं, कॅल्शिअमची कमतरता, चरबी वाढणं, शरीर बेढब होणं, रात्री शांत झोप न लागणं, निरुत्साही वाटणं, नेहमी चिडचिड होणं. असं सतत काही ना काही सुरु असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास फारंच खालावलेला असणं.

या अशा सगळ्या समस्यां मधलं काही जर अगदी असह्य झालं तरंच आपण डॉक्टर गाठतो. तेव्हढ्या पुरती औषधं घेतो. जरा बरं वाटलं की ना औषधांचा कोर्स पूर्ण करतो ना तो त्रास मुळापासून उखडून टाकण्याचा विचार करतो.

कधी काही औषधं घेतो, कुणी सांगितलं म्हणून कसले कसले काढे नाहीतर ज्युस घेतो, नाहीतर कच्चा किंवा उकडलेल्या भाज्या वगैरे खातो, क्रॅश डाएट करतो, व्यायाम करतो, जिम लावतो, चालायला जातो, झुंबाला जातो, एरोबिक्स करतो, योगा, प्राणायम, वेगवेगळी यंत्र, पट्टे, लेप एक ना दोन, भारंभार उपाय करायला जातो. त्यातले काही कंटाळून सोडतो, काही वेळे अभावी बंद पडतात, काहींचे साईड इफेक्ट होतात, काही उपायांनी थोडे दिवसात जरा फरक जाणवला तरी हळूहळू तेपण मागे पडतं. किंवा काही उपाय असे असतात जे आयुष्यभर करु शकत नाही. बरेचदा आपले हे प्रयत्न चेष्टेचा विषय होतात आणि आपण अजूनच कोशात जातो.

इतकं सगळं करून ही मग आपण तिथेच असतो जिथून सुरुवात केली किंवा कधी कधी त्यापेक्षा पण वाईट स्थितीत. मग त्यामुळे नाईलाजाने आपण जे आहे ते स्वीकारतो आणि प्राप्त परिस्थितीत आता काही बदल होणार नाही अशी मनाची समजूत घालून आला दिवस ढकलत रहातो.

पण आपली इच्छा अगदी प्रामाणिक असेल, स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा आपल्याला जर एक उत्तम निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपण सजग राहून नक्कीच चांगल्या पर्यायांपर्यंत पोहोचू शकतो. सहज सोप्प्या उपायातून आपला हेतू साध्य करू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनातही प्रत्येकाला आयुष्यभर विनासायास करता येण्यासारख्या गोष्टी शिकून घेऊ शकतो.

काय मग, करायची ना सुरुवात एका नवीन पर्वाला…

समजा, असं काही असलं तर की ज्यात तुम्हाला कोणतेही जास्तीचे कष्ट घ्यायचे नाहीयेत, तुमचा वेळ खर्ची घालायचा नाहीये, पथ्य म्हणून स्पेशल पदार्थ तयार करायचे नाहीयेत, वेट लॉस ची कोणतीही औषधं किंवा गोळ्या घ्यायच्या नाहीयेत, जिम मध्ये जाऊन तासंतास घाम गाळायचा नाहीये, ठराविक वेळी कुठेही हजर रहायचं नाहीये, तुमच्या दैनंदिनीत कुठेही काही अडथळा येणार नाहीये. उलट तुमचे बरेच कष्ट वाचणार आहेत,वेळ वाचणार आहे, उत्साह सळसळणार आहे, सकारात्मकता येणारे, आत्मविश्वास वाढणार आहे.

नक्की काय करायचं???

आता आपण ठरवलं आहेच की आपलं आयुष्य आमूलाग्र बदलायचं आहे तर थोडासा विचार करायचा, आणि काही गोष्टी ठरवायच्या आहेत.

जसे की आपण दिवसातून किती वेळा खातो, काय खातो, कसं खातो, कधी खातो ते…

आठवलं? नाही आठवणार कदाचित, असू देत… आपण फक्त आता एवढंच करू या कि आपलं जेवण खाणं एका विशिष्ट वेळेत बसवूया, दिवसातुन खाण्याच्या जास्तीत जास्त तीन वेळा ठरवूया आणि त्या आपल्या रुटीन ला सूट होईल अशा तर्हेने दिवसातल्या 24 तासापैकी कोणत्या तरी आठ तासांत बसवूया, बाकी सर्व 16 तास केवळ भरपूर पाणी प्यायचं.

बस, इतकंच. सोप्पं आहे ना?

तसं वाटतं तितकं नाही, कारण खूप भूक भूक होईल, पोटात कावळे ओरडून त्रास देतील, डोकं दुखेल, खा खा खावंसं वाटेल. पण पण पण धीर सोडू नका. भूक हि आपत्कालीन परिस्थिती नाही. फक्त सुरुवातीचे चार पाच दिवस हा त्रास आहे, नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की भूक कशी लागत नाही, क्रेविंग कसं होत नाही… मग पुढे सगळं आरामात सोपं होईल.

एकवीस दिवस हे व्रत केले की शरीररुपी देव प्रसन्न होतो. आपल्याला सकारात्मक बदल दिसू लागतात. तसे ते सातव्या दिवसापासून दिसू लागतात पण 21व्या दिवसानंतर आपोआप लाईफ स्टाईल सेट होऊन जाते. जी आपल्याला आयुष्यभर करता येते.

खाण्यापिण्याचं तसं काही बंधन नाही. फक्त ताजे अन्न खावे. शक्यतो साखर कमी करत जावी. बेकरी पदार्थ टाळावेत. एकदम बंदच करा असे नव्हे.

ह्या पद्धतीत कोणतीही बळजबरी नाहीये. आपल्या नेहमीच्या आहारातलं जे असेल ते खा. फक्त आखलेल्या वेळेत आणि त्या विशिष्ट वेळेला खा. अधेमधे सटर फटर खाऊ नका. ब्रेकफास्ट लंच आणि डिनर ह्या तीनच वेळा खाण्याच्या. या तीन वेळी पाहिजे ते पाहिजे तितकं खायचे पण उरलेल्या 16 तासात पाण्याशिवाय काही नाही.

आणखी एक गोष्ट, झोप सर्वात महत्त्वाची. किमान आठ तास झोप घ्यायला हवी हे तर सगळ्यांना माहिती असते पण त्याचे फायदे ती तशी नियमीत घेतल्याशिवाय मिळत नसतात. आणि त्यासाठी कोणतेही कारण देऊ नका. जग इकडचं तिकडे होऊ देत पण आपली आठ तास विनात्रास झोप झालीच पाहिजे असा निर्धार करा. या झोपेमुळे तुमच्यात खूप चांगले बदल घडून येतील. सर्व खाल्लेलं अन्न नीट पचेल, झोप नीट होईल आणि मग याचा परिणाम तुमच्या शरीरात नवी ऊर्जा उत्साह दिसण्यात होईल. अतिरिक्त वजन घटायला लागेल, हा बोनस आहे. पण वजन घटणे हा जरा लॉंगटर्म गोल आहे बरंका. उत्साह ऊर्जा  हे फायदे मात्र लगेच मिळू लागतात. शरीर हलकं हलकं वाटू लागतं.

टीप:  गर्भवती स्त्री किंवा फिडिंग चालू असेल तर हे करू नका.

तुमचा प्लान निवडा

प्रत्येक प्रोग्राम  वैयक्तिक माहितीनुसार तयार केला जातो.  आपणास हव्या असलेल्या सुविधांप्रमाणे प्लान निवडा.

Premium

रु. 999

1 month

Personalized Food Chart

4 Follow ups on Phone

Dedicated Personal Coach

coaching & support

Exercise Guidance

Essential

रु. 2499

3 months

Personalized Food Chart

8 Follow ups on Phone

Dedicated Personal Coach

coaching & support

Exercise Guidance

Transform

रु. 4199

6 months

Personalized Food Chart

12 Follow ups on Phone

Dedicated Personal Coach

coaching & support

Exercise Guidance

Please Note: All plans include Food Plan, Exercise Guidance, Special Recipes, Counselling & Troubleshooting, Motivation, Daily Chat Support, Dedicated LifeCoach, free access to useful tips and information in format of Podcast, Videos and Articles.

Share your love

6 Comments

  1. तनुजा खूपच कौतुकास्पद आहे.फक्त शंका म्हणून विचारते की कार्यक्रम असताना किंवा कोणी रात्री जेवायला बोलावले की हे सोळा तास कसे सांभाळायचे?

    • कमेंटसाठी धन्यवाद. कार्यक्रम किंवा एखादे जेवणाचे निमंत्रण असेल तर नक्कीच स्विकारावे. समजा संध्याकाळी जेवणाचे तुम्ही बंद केले आहे व दुपारचे जेवणच घेत असाल तर त्या विशिष्ट दिवशी संध्याकाळचे जेवण घ्या फक्त. दुपारचे टाळा. पण समजा तसे शक्य होत नसेल म्हणजे दुपारी भुक लागत असेल तर जेवून घ्या आणि संध्याकाळीही जेवा पण थोडंसंच, पोट तुडूंब भरुन नव्हे. आणि समजा कोणी आग्रहाने तुमचे पोट भरेपर्यंत खाऊ घातलेच तर तेव्हा पासून पुढचे किमान १२ तास काही खाऊ नका. हे सायकल परत मूळ रुपात यायला २४ तास पुरेसे. तसेच आठ पंधरा दिवसातून एखाद दिवस असे दोन्ही वेळ खाणे होत असेल तर ठिक आहे. मात्र दर दोन दिवसांनी असे दुहेरी खाण्याचे प्रसंग येत असतील तर त्याप्रमाणे वेळ आखून घ्यावी.

      तुमच्या प्रयत्नांना यश लाभो ही शुभेच्छा. हॅप्पी फास्टींग. बेटरफास्टींग.

Comments are closed.