सॅलड रेसिपीज

सॅलड रेसिपी 1

साहित्य: 2 टेबलस्पून मोड आलेली उकडलेली कडधान्य, 2 टेबलस्पून कच्ची मोड आलेली कडधान्य, 2 टेबलस्पून बारिक चिरलेला टोमॅटो, 2 टेबलस्पून उकडलेले मक्याचे दाणे, 2 टेबलस्पून बारिक चिरलेली सिमला मिरची, 2 टेबलस्पून बारिक चिरलेल गाजर, 2 टेबलस्पून बारिक चिरलेल बीटरूट, 2 टेबलस्पून बारिक चिरलेली काकडी, 3 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप दही, 1 टीस्पून मोहोरीची डाळ, 1 टीस्पून काळी मिरी पूड, 2 टीस्पून सैंधव, 1 टेबलस्पून बारिक चिरलेला पुदिना, 1 टीस्पून ऑरेगानो (ऑप्शनल), 2 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 टीस्पून लिंबाचा रस, पाव टीस्पून काळे मीठ पूड

कृती: मूग, मटकी, हरभरा यासारखी मोड आलेली कडधान्य एकत्र करून उकडून घ्यावीत. थोडी कच्ची बाजूला काढून ठेवावीत.

दही चांगले फेटून घ्यावे. त्यात कांदा, हिरवी मिरची, मोहोरीची डाळ, काळी मिरी पूड, सैंधव, पुदिना, ऑरेगानो, काळे मीठ हे सगळे साहित्य घालून मिश्रण एकजीव करावे.

उकडलेली व कच्ची कडधान्य, सगळ्या कच्चा भाज्या एकत्र करून घ्याव्यात.

त्यात दह्याचे मिश्रण घालून नीट एकत्र करून घ्यावे. आता त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावे. हेल्दी सॅलड तयार.


सॅलड 2
साहित्य: 2 टेबलस्पून बारिक चिरलेला टोमॅटो, 2 टेबलस्पून बारिक चिरलेल गाजर, 2 टेबलस्पून बारिक चिरलेल बीटरूट, 2 टेबलस्पून बारिक चिरलेली काकडी, 2 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा,
अर्धा कप दही, 1 टीस्पून काळी मिरी पूड, 2 टीस्पून सैंधव, पाव टीस्पून काळे मीठ, 2 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 टीस्पून लिंबाचा रस, 2 टेबलस्पून बारिक चिरलेली कोथिंबीर

कृती: दही चांगलं फेटून घ्या. त्यात काळी मिरी पूड, सैंधव, हिरवी मिरची, लिंबाचा रस, काळे मीठ, कोथिंबीर घालून नीट एकत्र करून घ्या.

सगळ्या चिरलेल्या भाज्या एकत्र करून त्यात दह्याचे मिश्रण घाला. वरून थोडी कोथिंबीर घाला.  हेल्दी सॅलड तयार.

सॅलड 3
साहित्य: 1 केळे, 2 टेबलस्पून डाळिंबाचे दाणे, 1 टीस्पून सैंधव, 1 टीस्पून जिरेपूड, पाव कप दही

कृती: केळ्याचे मोठे काप करून घ्या. दही चांगले फेटून घ्या.

केळ्याचे काप, डाळिंबाचे दाणे, व फेटलेले दही एकत्र करून घ्या.

आता त्यात सैंधव व जिरेपूड घालून अगदी हलक्या हाताने सगळं एकजीव करून घ्या.

हेल्दी सॅलड तयार.

सॅलड 4
साहित्य: 1 केळे, 2 टेबलस्पून डाळिंबाचे दाणे, पाव कप बारीक चिरलेल्या पेरूच्या फोडी, अर्धा कप ताजी साय/मलई, अर्धा टीस्पून वेलची पूड, 7-8 काळ्या मनुका, 4-5 बदाम, 1 अंजीर

कृती: साय/मलई चांगली फेटून घ्या.

बदामाचे मोठे तुकडे करून घ्या. अंजिराचे बारिक तुकडे करा.

फळं व सुकामेवा फेटलेल्या साईत घालून हलक्या हाताने एकत्र करून घ्या. वेलची पूड घालून पुन्हा नीट हलवून घ्या. हेल्दी फ्रुट सॅलड तयार.

सॅलड 5
साहित्य: अर्धा कप मोड आलेली उकडलेली कडधान्य, पाव कप मक्याचे दाणे, पाव कप बारिक चिरलेला कांदा, पाव कप बारिक चिरलेला टोमॅटो, पाव कप बारिक चिरलेली कोथिंबीर, 2 टीस्पून सैंधव, पाव टीस्पून काळे मीठ, 1 टीस्पून काळी मिरी पूड, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून खडे मीठ, 2 टीस्पून लिंबाचा रस

कृती: मूग, मटकी, हरभरा यांसारखी मोड आलेली कडधान्य आणि मक्याचे दाणे एका भांड्यात एकत्र करून घ्यावेत. त्यात हळद, लाल मिरची पूड आणि खडे मीठ घालून हे भांडे कुकरमध्ये ठेवावे. दोन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा.

या उकडलेल्या मिश्रणात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, सैंधव, काळे मीठ, लिंबाचा रस, काळी मिरी पूड हे सगळे साहित्य घालून मिश्रण नीट एकत्र करावे.
हेल्दी सॅलड तयार.

सॅलड 6
साहित्य: 1 मध्यम आकाराचा पिकलेला पेरू, पाव कप डाळिंबाचे दाणे, 1 टीस्पून सैंधव, 2 टीस्पून काळी मिरी पूड, पाव कप दही

कृती: पेरूच्या बारिक फोडी करून घ्या.
दही चांगले फेटून घ्या.

पेरुच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, व फेटलेले दही एकत्र करून घ्या.

आता त्यात सैंधव व काळी मिरी पूड घालून अगदी हलक्या हाताने सगळं एकजीव करून घ्या.

हेल्दी सॅलड तयार.