मेयोनीज

साहित्य: 3 अंडी, 1 कप (250ml) तेल ओलिव्ह सनफ्लॉवर/शेंगदाणा तेल किंवा कोणतेही वास नसलेले तेल, 1 टेबलस्पून मोहोरीच्या डाळीची पूड, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून काळी मिरी पूड

कृती: ब्लेंडर मध्ये प्रथम तिन्ही अंडी फोडून टाकावीत. पिवळा व पांढरा असे दोन्ही बलक घ्यायचे आहेत.
त्यावर अर्धा कप म्हणजे निम्मे तेल घालावे. त्यात लिंबाचा रस, मोहोरीच्या डाळीची पूड घालावी आणि 10 सेकंद ब्लेंड करावे.

आता पुन्हा थोडेसे तेल घालावे व 10 सेकंद ब्लेंड करावे. असे 3-4 वेळा थोडे थोडे करतच उरलेले तेल घालून प्रत्येक वेळी 10 सेकंद ब्लेंड करत जावे.

शेवटी काळी मिरी पूड घालून 5 सेकंद ब्लेंड करावे.

घरच्या घरी उत्तम दर्जाचे मेयोनीज तयार.

हे मेयोनीज सॅलड मध्ये ड्रेसिंग म्हणून वापरू शकता तसेच पोळी, भाकरी वर स्प्रेड म्हणून पण वापरू शकता.

तयार मेयोनीज एअरटाईट कंटेनर मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे. आठवडाभरात संपवावे.