बाजरी इडली

ग्लास मध्ये सांबार आहे… इडल्या बाजरीच्या आहेत..!

 

बाजरी इडली प्रमाण:

 

साहित्य:- तीन वाटी बाजरी, दीड वाटी तांदूळ , एक वाटी उडीद डाळ (सालासकट, काळ्या पाठीची असल्यास उत्तम), अर्धी वाटी काबुली चणे/हरभरे/अख्खे मूग,अर्धी वाटी जाडे पोहे15-20 मेथी दाणे

 

कृती:- जाडे पोहे सोडून इतर सगळे साहित्य 4-5 तास वेगवेगळे भिजत ठेवावे. धान्य वाटायच्या वेळी पोहे भिजत घालून वाटावे. सगळं धान्य कमीतकमी पाण्यात बारिक वाटून, हाताने नीट एकत्र करावे. तयार मिश्रण 10-12 तासांसाठी उबदार जागी झाकून ठेवावे.इडली पात्राला तेल लावून 10-12 मिनिटे इडल्या वाफवून घ्याव्यात.——–

 

लाल चटणी:

साहित्य:- पाव कप डाळ्या, 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून खोबऱ्याचा किस, 5 लाल सुक्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 4 टेबलस्पून चिंचेचा कोळ, 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून तिखट लाल मिरची पूड, 1 टीस्पून काश्मिरी मिरची पूड, 1 टेबलस्पून जिरेफोडणी साठी:- जिरे, मोहोरी, उडीद डाळ, कढीपत्ता, हिंगकृती:- प्रथम कोमट पाण्यात लाल मिरच्या अर्ध्या तासासाठी भिजत ठेवाव्यात.नंतर सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. चटणी जितकी पातळ हवी असेल त्यानुसार थोडे थोडे पाणी घालून वाटावे. चटणी एकदम बारीक वाटून झाली की वरून फोडणी घालावी. आंबट-तिखट चटपटीत चटणी तयार

हिरवी चटणी:

साहित्य:- पाव कप सुक्या खोबऱ्याचा किस, पाव कप भाजलेले शेंगदाणे, 3-4 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून मीठ, पाव कप कोथिंबीर, 1 टेबलस्पून जिरे, 4-5 कढीपत्याची पानंफोडणी साठी:- जिरे, मोहोरी, उडीद डाळ, कढीपत्ता, हिंग, हळदकृती:- सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. चटणी जितकी पातळ हवी असेल त्यानुसार थोडे थोडे पाणी घालून वाटावे. चटणी एकदम बारीक वाटून झाली की वरून फोडणी घालावी.