साहित्य:
२ कप मोड आलेले चणे/हरभरे,
दीड कप बारीक चिरलेला कांदा,
१ कप बारीक चिरलेला टोमॅटो,
१ कप बारीक चिरलेला कोबी,
अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर,
पाव कप बारीक चिरलेले बीट,
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,
अर्ध्या लिंबाचा रस,
२ टीस्पून आमचूर पूड,
२ टीस्पून चाट मसाला,
१ टीस्पून सैंधव,
चवीनुसार जाडे मीठ बारीक कुटून घेतलेले
कृती:
मोड आलेले हरभरे/चणे उकडून घ्या.
बारीक कुटून घेतलेले जाडे मीठ उकडतानाच चण्यात घाला.
उकडल्यावर त्यातले पाणी काढून टाका.
आता चण्यात बाकीचे सगळे साहित्य घालून चमच्याने नीट एकत्र करून घ्या.
वर दिलेल्या प्रमाणात साधारण तीन जणांसाठी पोटभर न्याहारी होते.